Abhishek Bachchan | ऐश्वर्याला चित्रपट करू दे, तू मुलगी सांभाळ हे ऐकताच अभिषेक बच्चन संतापला, ट्रोलर्सची बोलती बंद करत म्हणाला…

| Updated on: Apr 30, 2023 | 10:07 PM

ऐश्वर्या राय हिचा पोन्नियिन सेल्वन 2 हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ऐश्वर्या राय हिचा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाल करताना दिसतोय. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय हिच्या भूमिकेची काैतुक केले जात आहे. चाहते ऐश्वर्या राय हिला अभिनय करताना पाहून आनंदी झाले आहेत.

Abhishek Bachchan | ऐश्वर्याला चित्रपट करू दे, तू मुलगी सांभाळ हे ऐकताच अभिषेक बच्चन संतापला, ट्रोलर्सची बोलती बंद करत म्हणाला...
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिचा पोन्नियिन सेल्वन 2 हा चित्रपट 28 एप्रिल रोजी रिलीज झालाय. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय हिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. अवघ्या दोन दिवसांमध्ये चित्रपटाने जवळपास 100 कोटींची कमाई केलीये. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर (Box office) धमाल करताना दिसत आहे. साऊथमध्ये या चित्रपटाला जबरदस्त असे प्रेम प्रेक्षकांचे मिळताना दिसत आहेत. बाॅलिवूडचे चित्रपट खास धमाल बाॅक्स आॅफिसवर करू शकत नसतानाच ऐश्वर्या राय हिचा पोन्नियिन सेल्वन 2 चित्रपट (Movie) तूफान अशी कामगिरी करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे लोकांना ऐश्वर्या राय हिचा अभिनय आवडलाय.

गेल्या काही वर्षांपासून ऐश्वर्या राय ही चित्रपटांपासून दूर होती. चाहते सतत तिच्या पुरागमनाची वाट पाहत होते. शेवटी ऐश्वर्या राय हिने पोन्नियिन चित्रपटाच्या माध्यमातून पुनरागमन केले आहे. ऐश्वर्या राय हिला अभिनय करताना पाहून चाहते खुश झाले आहेत. सर्वत्र ऐश्वर्या राय हिच्या अभिनयाचे काैतुक केले जात आहेत.

ऐश्वर्या राय हिच्या अभिनयाचे काैतुक करत सोशल मीडियावर एका चाहत्याने अभिषेक बच्चन याला टार्गेट करत थेट म्हटले की, अभिषेक बच्चन आता तुम्ही मुलीची काळजी घ्या आणि ऐश्वर्या राय हिचा चित्रपट साईन करू द्या…या कमेंटवर थेट अभिषेक बच्चन याने रिप्लाय करत जोरदार उत्तर देत चाहत्याची बोलती बंद केलीये.

अभिषेक बच्चन याने लिहिले की, चित्रपट साईन करण्यासाठीच नाही तर इतक कोणत्याच कामासाठी माझी परवानगी घेण्याची गरज ही ऐश्वर्या राय हिला अजिबात नाहीये आणि तिचे सर्वात आवडते काम अभिनय करण्यासाठी तर नाहीच…आता अभिषेक बच्चन याने केलेला या कमेंटची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

पोन्नियिन सेल्वन 2 ने पहिल्या दिवशी 24 कोटींची कमाई केली आहे. शनिवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 28.50 कोटींची कमाई केली आहे. पोन्नियिन सेल्वन 2 ने अवघ्या दोन दिवसांत जगभरात 110 कोटींची कमाई केली आहे. ऐश्वर्या राय हिच्या या चित्रपटाला चाहत्यांचे जबरदस्त प्रेम मिळताना दिसत आहे. अभिषेक बच्चन याने ऐश्वर्या राय हिचा पोन्नियिन सेल्वन 2 हा चित्रपट नुकताच बघितला आहे.