भयानक पण तितकाच मजेशीर…; राजकुमार रावच्या ‘स्त्री 2’चा टीझर पाहिलात का?
Actor Rajkumar Rao Stree Movie Teaser : राजकुमार राव याच्या स्त्री यासिनेमाचा सिक्वेल येतोय. 'स्त्री 2' या सिनेमाचा टीझर रिलिज झाला आहे. भयानक पण तितकाच मजेदार... असा 'स्त्री 2' सिनेमाचा टीझर आहे. या सिनेमात दाक्षिनात्य अभिनेत्रीदेखील राजकुमारसोबत दिसणार आहे. वाचा...
अभिनेता राजकुमार राव याच्या ‘स्त्री 2′ चा या सिनेमाचा टीझर आउट झाला. मजेदार आणि भयानक अशा स्त्री 2’ चा टीझर आऊट झालाय. ‘स्त्री 2’ मध्ये सर्वाधिक पॉवर-पॅक परफॉर्मर राजकुमार राव पुन्हा विकीच्या भूमिकेत दिसणार असून त्याचे चाहते यासाठी उत्सुक आहेत. बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून विशेष म्हणजे, मॅडॉक फिल्म्सच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुंज्या’ सोबत थेट थिएटरमध्ये हा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. पहिल्या फ्रेमपासून निर्माते हे स्पष्ट करतात की सिक्वेल अधिक मजेदार, भयानक आहे आणि प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी तो सज्ज आहे.
स्त्रीचा टीझर लॉन्च
चित्रपटगृहांमध्ये टीझरचे साक्षीदार असलेले चाहते या चित्रपटासाठी उत्सुक असून राजकुमार रावचा या वर्षातील हा तिसरा चित्रपट आहे आणि चाहत्यांच्या प्रतिक्रियांनुसार हा चित्रपट 2024 हे मधा राजकुमार रावचा ब्लॉकबस्टर ठरणार आहे. राजकुमार रावचे पाठोपाठ रिलीज होत असणारे चित्रपट हे दाखवून देतात की तो कमालीचा अभिनेता आहेच तो त्याच्या ‘श्रीकांत’ चित्रपटात दृष्टिहीन उद्योगपती श्रीकांत बोल्लाच्या भूमिकेत दिसला होता. ज्याला समीक्षकांची प्रशंसा मिळाली होती. तर ‘मिस्टर अँड मिसेस माही’ मध्ये तो क्रिकेटर-कोचच्या भूमिकेत दिसला होता.
View this post on Instagram
श्रद्धा अन् राजकुमार राव पुन्हा स्क्रिन शेअर करणार
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘स्त्री’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 2018 मध्ये आलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन वैविध्यपूर्ण भूमिका ज्यांनी राजकुमार रावला या पुरस्काराच्या मोसमात नक्कीच पसंती दिली आहे. त्यांनी अभिनेत्याची अष्टपैलुत्व सिद्ध केली आहे तसेच बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. खरं तर, ‘स्त्री’ नंतर ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा राजकुमार रावचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आणि आता असे दिसते आहे की ‘स्त्री 2’ पूर्वीचे रेकॉर्ड देखील मोडेल.
View this post on Instagram
पण इथेच न थांबता राजकुमार ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’मध्ये अभिनेता तृप्ती दिमरीसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्याच्या पाइपलाइनमध्ये आणखी काही मनोरंजक प्रकल्प आहेत ज्यांची तो लवकरच घोषणा करेल…