हटके लव्हस्टोरी ते लग्नाची बेडी… रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम अखेर विवाहबद्ध
अभिनेत्री लिन लैशराम आणि अभिनेता रणदीप हुड्डा अखेर विवाहबद्ध झाले आहेत. अनेक वर्षापासून दोघेही रिलेशनशीपमध्ये होते. अखेर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि आज एकमेकांना वरमाला घालत लग्नाची गोड बातमीही दिली. दोघांनी पारंपारिक पद्धतीने लग्न केलं आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघांनाही त्यांच्या फॅन्सकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
इंफाळ | 29 नोव्हेंबर 2023 : अभिनेता रणदीप हुड्डा अखेर त्याची गर्लफ्रेंड लिन लैशराम हिच्याशी विवाहबद्ध झाला आहे. आज दोघांनीही सातफेरे घेत एकमेकांना जन्मोजन्मी साथ देण्याची शपथ घेतली. या दोघांच्या लग्नाचा पहिला फोटोही व्हायरल झाला आहे. दोघांनीही मैतेई समाजाच्या रितीरिवाजानुसार लग्न केलं. 27 नोव्हेंबर रोजी दोघेही लग्नासाठी मणिपूरची राजधानी इम्फाळला आले होते. या ठिकाणी दोघांनी प्री वेडिंग शूट केलं होतं. त्यांचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले होते. आज अखेर दोघांनी दोघांना जन्मोजन्मीची साथ दिली आहे.
गेल्या काही वर्षापासून रणदीप हुड्डा आणि लिन यांच्या रिलेशनशीपची चर्चा होती. त्याची मीडियातही चर्चा होत होती. रिलेशनशीपची माहिती उघड झाल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. रणदीप हा 47 वर्षाचा आहे. तर लिन ही 37 वर्षाची आहे. दोघांमध्ये 10 वर्षाचे अंतर आहे. आज दोघेही विवाह बंधनात अडकले. यावेळी त्यांचे जवळचे मित्र आणि नातेवाईक असा मोजकाच परिवार उपस्थित होता. सध्या सोशल मीडियावर या दोघा कपल्सचे फोटो ट्रेंड करत आहेत. तर त्यांचे फॅन्स त्यांना लग्नाच्या शुभेच्छाही देताना दिसत आहेत.
पारंपारिक पद्धतीने लग्न
दोघांनाही पारंपारिक पद्धतीने म्हणजे मैतई समाजातील रितीरिवाजानुसार लग्न केलं आहे. या दोघांच्या लग्नाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रणदीप मैतेई संस्कृतीच्या पद्धतीनुसार नवरदेव बनला आहे. त्याने सफेद धोती आणि कुर्ता परिधान केला आहे. डोक्यावर पगडी आहे. दोघेही लग्नाचे विधी पार पाडताना दिसत आहेत. तर नवरी बनलेली लिन प्रचंड सुंदर दिसत आहे. लिनने सिंपल लूकवर सोन्याचे दागिने घातले आहेत. दोघेही एकमेकांना सफेद रंगाची वरमाला घालताना दिसत आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाले आहेत. फोटोतील तिच्या दागिन्यांची जोरदार चर्चा सुरू आहे.
कोण आहे लिन?
लिन प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती एक बिझनेस वुमनही आहे. या मल्टिटॅलेंटेड अभिनेत्रीने सिनेमा क्षेत्रात आपली वेगळी ओळख तयार केली आहे. लिनने अनेक बड्या अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. प्रियंका चोपडासह करिना कपूरपर्यंतच्या अनेक अभिनेत्रींसोबत तिने काम केलं आहे. सोशल मीडियावर तिचे 93 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.
हटके लव्हस्टोरी
लिन आणि रणदीपची लव्ह स्टोरी हटके आहे. दोघांची भेटही फिल्मीच आहे. एका थिएटरमध्ये दोघांची पहिली भेट झाली होती. त्यावेळी दोघे चांगले मित्र होते. नसिरुद्दीन शाह यांच्या मोटली नावाच्या एका थिएटर ग्रुपमध्ये भेटल्याचं लिन हिचं म्हणणं आहे. त्यावेळी रणदीप आपल्याला सीनिअर होता, असंही ती सांगते.