अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्या नावाने 50 लाखाला लुटले, अभिनेत्याने आली प्रतिक्रिया

| Updated on: Jul 03, 2024 | 9:59 PM

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्या नावाने एकाला 50 लाखाला ठगवल्याचे प्रकार उघडकीस आला आहे. यावर या अभिनेत्याने स्पष्टीकरण दिले आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ​​याच्या नावाने हा घोटाळा झाला आहे. त्याने या प्रकाराला गंभीरतेने घेतले आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्या नावाने 50 लाखाला लुटले, अभिनेत्याने आली प्रतिक्रिया
sidharth malhotra
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

सोशल मिडीयामुळे अनेकांची खोटी फेसबुक खाती तयार करुन लुबाडल्याच्या घटना अधून मधून उघडकीस आली आहे. आता अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्या नावाने एकाला 50 लाखाला लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणानंतर सिद्धार्थ मल्होत्रा याने एक निवदेन प्रसिद्धीला दिले आहे. आपण आणि आपले कुटुंब अशा प्रकारांमुळे आश्चर्यचकीत झाले. माझ्या चाहत्यांची सुरक्षा सर्वात महत्वाची असल्याचेही त्याने या प्रसिद्धीला दिलेल्या निवदेनात म्हटले आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​याच्या फॅन पेजवरुन एक मॅसेज पोस्ट केला गेला आहे, हा संदेश वाचून घडलेल्या या  प्रकारानंतर सर्वजण हैराण झाले आहेत. सिद्धार्थ याची चाहती मीनू वासुदेवा हीने आपल्याला 50 लाखाचा फटका बसल्याचे म्हटले आहे. तिने तक्रार केली की तिला खोट्या कहाण्या सांगून तिला 50 लाखांचा गंडा घातला आहे. तिला खोटेनाटे सांगून तिची दिशाभूल  करीत फसविले गेले. आपल्याला कोणीतरी सांगितले की सिद्धार्थ याचे प्राण पत्नी कियारा अडवाणी हीच्यामुळे संकटात आहेत अशी कहाणी सांगून तिला फसविल्याचे मीनू वासुदेवा हीने म्हटले आहे. यावर संपूर्ण प्रकरणानंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​याची प्रतिक्रीया आली आहे. माझ्या लक्षात आले की वेगवेगळ्या सोशल फ्लॅटफॉर्मवरुन माझ्या नावाने लोकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आली आहे. यात माझे, माझे कुटुंब आणि माझे फॅन्स असल्याचा दावा करीत काही लोकांकडून पैसे लुबाडल्याचे उघडकीस आले आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा याची पोस्ट –


आपण ही पोस्ट वाचणाऱ्या प्रत्येकाला सांगू इच्छितो की मी, माझे कुटुंब आणि माझी टीम अशा प्रकारांना पाठींबा देत नाही. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की जर तुम्हाला सोशल साईटवरुन कोणताही संशयास्पद पैशांची मागणी करणारा संदेश माझे नाव घेऊन केला तर त्याला प्रतिसाद देऊ नका. सावधगिरी बाळगा आणि चुकीची माहिती पसरवू नका. त्यानंतर चाहत्यांबद्दल बोलताना सिद्धार्थ म्हणाला, की माझे फॅन्स हेच माझी सर्वात मोठी ताकद आहे आणि फॅन्सची सुरक्षा आणि विश्वास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.