Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alia Bhatt | ‘पॅशनेट अबाऊट वर्क’, कोरोना चाचणी निगेटिव्ह येताच कामावर परतली आलिया भट्ट!

आलिया भट्टचा कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आल्यावर, ती पुन्हा एकदा कामावर परतली आहे. आलियाने कोरोना रिपोर्ट नकारात्मक असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले.

Alia Bhatt | ‘पॅशनेट अबाऊट वर्क’, कोरोना चाचणी निगेटिव्ह येताच कामावर परतली आलिया भट्ट!
आलिया भट्ट
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 1:12 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आल्यानंतर चित्रपटाचे शूटिंग काही दिवसांसाठी थांबवण्यात आले होते. त्यानंतर आलिया भट्टनेही स्वत:ला क्वारंटाईन केले होते. मात्र, आता आलिया भट्टचा कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आल्यावर, ती पुन्हा एकदा कामावर परतली आहे. आलियाने कोरोना रिपोर्ट नकारात्मक असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले. तसेच, आता पुन्हा कामावर परतण्याविषयी देखील तिने माहिती दिली आहे (Actress Alia Bhatt returns on set after tested corona negative).

आलिया भट्ट हिने पोस्ट शेअर करताना लिहिले की, ‘मी तुमच्या सर्वांचे प्रेम आणि काळजीचे संदेश वाचत होते. माझा कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आला आहे आणि मी काही दिवस क्वारंटाईन होते आणि डॉक्टरांशी बोलल्यानंतर मी पुन्हा कामावर परतत आहे. सर्व शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद. मी स्वत:ची काळजी घेत आहे आणि सुरक्षित आहे. आपण सर्वांनी देखील तेच केले पाहिजे. तुम्हा सगळ्यांना खूप खूप प्रेम.’ आपल्या सर्वांना माहित आहे की, आलिया तिच्या कामाबद्दल किती पॅशनेट आहे. तिला आपल्या कामाबद्दल बेफिकीर राहायला अजिबात आवडत नाही.

रणबीर कपूरही कोरोना पॉझिटिव्ह

आलियाचा बॉयफ्रेंड अभिनेता रणबीर कपूर देखील कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आलिया भट्ट घाबरली आहे. रणबीर लवकरात लवकर ठीक व्हावा, अशी तिची इच्छा आहे. शिवरात्रीनिमित्त आलिया रात्री उशिरा मंदिरात पोहोचली होती. यावेळी तिने रणबीर लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केली. यावेळी तीचा आणि रणबीरचा मित्र अयान मुखर्जी देखील आलियासमवेत होता. यावेळी आलियाने रेड कलरचा सूट परिधान केला होता.

इतकेच नाही तर, यादरम्यान जेव्हा पापाराझीने आलियाला विचारले की तुम्ही काही खास मागणे मागितले का? यावर अभिनेत्रीने लगेच उत्तर दिले, होय, पण मी सांगणार नाही! आता या निमित्ताने आलियाने रणबीरच्या तब्येतीच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली असावी (Actress Alia Bhatt returns on set after tested corona negative).

रणबीरशिवाय वाढदिवस साजरा करणार नाही!

जेव्हापासून रणबीर आणि आलिया रिलेशनशिपमध्ये आले आहेत, तेव्हापासून आलिया दरवर्षी त्याच्यासोबतच वाढदिवस साजरा करते. या वेळी रणबीरची तब्येत ठीक नसल्यामुळे असे वृत्त येते आहे की, आलियाने 15 मार्च रोजी आपला वाढदिवस साजरा करू नये, किंवा आपल्या सोबत केवळ कुटुंबच असावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

आलिया रणबीरपासून दूर असली तरीही ती त्याची काळजी घेत आहे. अलीकडेच आलियाने रणबीरच्या कोरोना रिपोर्टनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होते, ज्यात असे लिहिले होते की, ‘आपण ज्या गोष्टीतून जात आहोत, त्यातून आपण आणखी मजबूत होत आहोत’.

(Actress Alia Bhatt returns on set after tested corona negative)

हेही वाचा :

सोनू सूदच्या ‘त्या’ ट्विटवर संतापले नेटकरी! सोशल मीडियावर ट्रेंड केला #WhoTheHellAreUSonuSood 

Radhe Shyam | महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ‘राधे-श्याम’चे नवे पोस्टर प्रदर्शित, पाहा पूजा-प्रभासचा रोमँटिक अंदाज

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.