‘5G’ तंत्रज्ञानाविरोधात अभिनेत्री जुही चावलाने दाखल केली केस, न्यायालयात सुनावणी सुरु!

भारतात लवकरच ‘5 जी’ तंत्रज्ञान लागू होणार आहे. ज्याचा पर्यावरणासह लोकांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत हे तंत्रज्ञान भारतात लागू होण्यापूर्वी अभिनेत्री जुही चावला हिने ‘5 जी’ विरोधात तक्रार दाखल केली आहे.

‘5G’ तंत्रज्ञानाविरोधात अभिनेत्री जुही चावलाने दाखल केली केस, न्यायालयात सुनावणी सुरु!
जुही चावला
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 12:45 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जूही चावला (Juhi Chawla) सोशल मीडियावरून चाहत्यांना पर्यावरणाबाबत सतत सजग करत असते. ती सोशल मीडियावर नेहमी पर्यावरणाविषयीच्या पोस्ट्सही शेअर करत असते. भारतात लवकरच ‘5 जी’ तंत्रज्ञान लागू होणार आहे. ज्याचा पर्यावरणासह लोकांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत हे तंत्रज्ञान भारतात लागू होण्यापूर्वी अभिनेत्री जुही चावला हिने ‘5 जी’ विरोधात तक्रार दाखल केली आहे. आज (31 मे) न्यायालयात या केसवर पहिली सुनावणी होणार आहे (Actress Juhi Chawla files case against 5G technology in India).

टेलिकम्युनिकेशन उद्योग भारतात ‘5 जी’ तंत्रज्ञान आणण्याची तयारी करत आहे, त्यामुळे पृथ्वीवर कोणताही मनुष्य, प्राणी, पक्षी आरोग्यदायी जीवन जगू शकणार नाहीत. आजच्या तुलनेत आरएफ रेडिएशन 10-100 पट वाढेल. या ‘5 जी’ तंत्रज्ञानामुळे पृथ्वीच्या इकोसिस्टमचा मानवी जीवनावरही वाईट परिणाम होईल, असे यात म्हटले आहे. जुही स्वतः पर्यावरणाविषयी अतिशय जागरूक आहे. ती सध्या मुंबईपासून जवल्न असलेल्या एका ठिकाणी ऑर्गेनिक शेती करत आहे.

अभ्यास आणि वैद्यकीय ​​पुराव्यांनुसार यामुळे बरेच लोक आजारी पडले आहेत. तर बर्‍याच लोकांचे डीएनए, सेल्स आणि ऑनगोन सिस्टमचे नुकसान झाले आहे. ज्यामुळे बरेच मोठे रोग देखील होऊ शकतात.

आम्ही विरोधात नाही, पण…

याविषयी बोलताना जूही चावला म्हणाली की, आम्ही प्रगत तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या विरोधात नाही. आम्हाला नवीन तंत्रज्ञान देणारी नवीनतम उत्पादने वापरण्यात आनंदच होणार आहे. अगदी वायरलेसच्या क्षेत्रातही.. तथापि, आम्ही देखील अशा अडचणीत आहोत की, जेव्हा आम्ही स्वतः वायरलेस गॅझेट्स आणि नेटवर्किंग सेल टॉवर्सद्वारे आरएफ रेडिएशनवर संशोधन आणि अभ्यास केला, तेव्हा आम्हाला कळले की, ही किरणे लोकांसाठी अत्यंत हानिकारक आहेत आणि त्यांच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात.’(Actress Juhi Chawla files case against 5G technology in India)

महत्त्वाच्या मुद्द्याकडे न्यायालयाचे लक्ष जावे हा हेतू!

जूही चावलाचे प्रवक्ते यांनी शेअर केलेल्या निवेदनामध्ये, ते दाखल करत असलेल्या केस विषयी सांगताना म्हणाले की, याप्रकरणी कोर्टाचे लक्ष या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधले जावे हे यामागचे उद्देश्य आहे. जेणेकरुन ते आहे सिद्ध करू शकतील की, 5 जी तंत्रज्ञान मनुष्य, प्राणी आणि पक्ष्यांसाठी किती सुरक्षित आहे. त्यांनी यावर संशोधन केले पाहिजे आणि त्यानंतरच ‘5 जी’ तंत्रज्ञान भारतात येणे सुरक्षित असेल की, नाही हे ठरवले पाहिजे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊनच त्यांनी या संदर्भात निर्णय घ्यावा.

(Actress Juhi Chawla files case against 5G technology in India)

हेही वाचा :

वडिलांच्या मृत्यूला रुग्णालयच जबाबदार, अभिनेत्री संभावना सेठकडून रुग्णालयाविरोधात कायदेशीर कारवाई!

Joe Lara | ‘टार्झन’ फेम अभिनेत्याचा विमान अपघातात मृत्यू, पत्नीसमवेत आणखी पाच जणांचा बळी

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.