Adipurush | ‘बाहुबली’ प्रभासच्या चित्रपटात ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची एंट्री, साकारणार महत्त्वाची भूमिका!

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali khan) आणि ‘बाहुबली’ प्रभास (Prabhas) यांचा आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’ हा घोषणा झाल्यापासून चर्चेचा एक भाग ठरला आहे.

Adipurush | ‘बाहुबली’ प्रभासच्या चित्रपटात ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची एंट्री, साकारणार महत्त्वाची भूमिका!
प्रभास
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 10:37 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali khan) आणि ‘बाहुबली’ प्रभास (Prabhas) यांचा आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’ हा घोषणा झाल्यापासून चर्चेचा एक भाग ठरला आहे. ओम राऊतच्या या चित्रपटात प्रभास ‘भगवान श्रीराम’ आणि सैफ अली खान ‘लंकेश’ अर्थात ‘रावणा’च्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरू आहे. नुकतीच क्रिती सेनॉनची या चित्रपटामध्ये वर्णी लागली आहे. आता या चित्रपटात आणखी एका बड्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे, याची माहिती नुकतीच समोर आली आहे (Actress Kajol Devgan Will be seen in Prabhas starrer film Adipurush).

अलीकडेच, सर्व चर्चांना पूर्णविराम देत, निर्मात्यांनी अभिनेत्री कृती सेनॉन ‘आदिपुरुष’मध्ये सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आता प्रभासच्या या मेगा बजेट पॅन इंडिया चित्रपटामध्ये अभिनेत्री काजोलही (Kajol) दाखल झाली आहे.

काजोल साकारणार महत्त्वाची भूमिका!

बातमीनुसार, प्रभासच्या या चित्रपटात काजोल खूप महत्वाची भूमिका साकारणार आहे. मात्र, या चित्रपटात काजोलची भूमिका काय असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.या निर्मात्यांनी काजोलची भूमिका अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे. प्रभासच्या प्रयत्नांमुळे काजोल चित्रपटाचा भाग होणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रभास आता काजोलसोबत या चित्रपटात काम करण्याची तयारी करत आहे. जर चित्रपटात काजोलची मोठी एंट्री असेल, तर त्याचा चित्रपटाला बराच चांगला फायदा होणार आहे. या चित्रपटात काजोल अतिशय खास भूमिकेत दिसणार असल्याचे कळते आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत करणार आहेत. यापूर्वी त्याने गेल्या वर्षी अजय देवगण स्टारर ‘तान्हाजी’सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला होते. जो पडद्यावर सुपरहिट झाला (Actress Kajol Devgan Will be seen in Prabhas starrer film Adipurush).

म्हणून दीपिका दिसणार नाही!

या पूर्वी ‘आदिपुरुष’ या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण झळकणार होती. चित्रपटाच्या दिग्दर्शकाची पहिली पसंती दीपिका पदुकोण होती. पण, नंतर असे सांगितले जात होते की, दीपिका आणि प्रभासने नाग अश्विनच्या चित्रपटाला आधीपासूनच साईन केले होते. अशा परिस्थितीत दोघांनाही बॅक-टू-बॅक एकत्र चित्रपटात दिसायचे नाही. दीपिकाने हा चित्रपट सोडल्यामुळे क्रितीला मोठा फायदा झाला. आता क्रिती या मोठ्या चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे. प्रभास आणि सैफसोबत क्रितीचा हा पहिलाच चित्रपट आहे.

क्रितीची पोस्ट

आदिपुरुषच्या सेटवर आग

काही दिवसांपूर्वी आदिपुरुषच्या सेटवर आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आणि संपूर्ण क्रोमा सेट जळून खाक झाला. निर्मात्यांना मोठा तोटा सहन करावा लागला होता.

सैफ-आदिपुरुष आणि वाद

आदिपुरुषच्या घोषणानंतर हा चित्रपट सतत चर्चेचा एक भाग बनला आहे. अभिनेता सैफ अली खानने रावणाच्या पात्राचे विश्लेषण सिद्ध करतानाच वाद निर्माण करणारे काही वक्तव्य केले होते. एका मुलाखती दरम्यान त्याने रावणाच्या पात्राचे महत्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले होते की, लक्षमणाने रावणाची बहीण शूर्पणखाचे नाक कापल्याने रावणाने सीतेचे अपहरण केले, हे न्याय्य आहे आणि तेच ते चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करतील. सैफ अली खानच्या विधानानंतर बरेच वादंग झाले. मात्र, नंतर सैफनेही त्यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती.

(Actress Kajol Devgan Will be seen in Prabhas starrer film Adipurush)

हेही वाचा :

Arshi Khan : राखी सावंतनंतर आता बिग बॉस फेम अर्शी खानचं स्वयंवर, वाचा सविस्तर

Chehre Vs The Big Bull : पहिल्यांदाच बाप-लेक आमने-सामने, कोण मारणार बाजी अमिताभ बच्चन की अभिषेक?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.