अंडरवर्ल्डशी थेट कनेक्शन, एका कॉलवर मिळायचे चित्रपट, आता अध्यात्माच्या मार्गाला लागलीय ममता कुलकर्णी!

बॉलिवूडमध्ये अशा बर्‍याच नायिका आल्या, ज्यांनी बॉलिवूडमध्ये बरेच नाव कमावले आणि अचानक या इंडस्ट्रीला निरोप देऊन निघून गेल्या. या यादीत ममता कुलकर्णी (Actress Mamta Kulkarni )हिचे नावही अग्रक्रमी आहे.

अंडरवर्ल्डशी थेट कनेक्शन, एका कॉलवर मिळायचे चित्रपट, आता अध्यात्माच्या मार्गाला लागलीय ममता कुलकर्णी!
ममता कुलकर्णी
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 9:02 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा बर्‍याच नायिका आल्या, ज्यांनी बॉलिवूडमध्ये बरेच नाव कमावले आणि अचानक या इंडस्ट्रीला निरोप देऊन निघून गेल्या. या यादीत ममता कुलकर्णी (Actress Mamta Kulkarni )हिचे नावही अग्रक्रमी आहे. अभिनेत्रीने ‘तिरंगा’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 1992मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये हिट झाल्यानंतर ती ‘आशिक आवारा’, ‘वक्त हमारा है’, ‘दिलबर’ यासारख्या अनेक चित्रपटांत काम केले (Actress Mamta Kulkarni underworld connection and her film career).

बॉलिवूडपूर्वी ममताने तमिळ चित्रपटांमध्येही काम केले होते. 1991मध्ये तिने ‘नंबरगल’ नावाच्या तमिळ चित्रपटाद्वारे सिनेमाच्या जगात प्रवेश केला होता. ममताने 1991 ते 2003 या काळात अनेक चित्रपटात काम केले. अगदी बांगलादेशी चित्रपटांतही तिने अभिनय केला होता. पण, दरम्यानच्या काळात अभिनेत्री अंडरवर्ल्डमध्ये आणि ड्रग्सच्या दलदलीत वाईटरित्या अडकली होती.

ममताचा जन्म मुंबईत झाला. जिथे तिचा बॉलिवूडच्या अतिशय चर्चित अभिनेत्रींच्या यादीत समावेश झाला. आपल्या कारकिर्दीत तिने बॉलिवूडच्या प्रत्येक मोठ्या स्टारबरोबर काम केले. तिने राज कुमार आणि नाना पाटेकर यांच्यासह ‘तिरंगा’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट अजूनही बर्‍याच वेळा टीव्हीवर दाखवला जातो आणि लोकांनाही तो खूप आवडतो.

जितकी बोल्ड तितकेच वाद

25 वर्षांपूर्वी भारत आज इतका आधुनिक नव्हता. यामुळे ममता अनेकदा वादात सापडत होती. 1993 मध्ये अभिनेत्रीने स्टारडस्ट मासिकासाठी टॉपलेस फोटोशूट केले होते. हे मासिकाचे प्रकाशित होताच बर्‍यापैकी खळबळ उडाली होती. यानंतर तिला 15 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. त्यावेळी या मासिकाच्या प्रती ‘काळा बाजार’ करून विकल्या गेल्या. त्या काळात अभिनेत्रीची खूप चर्चा होती आणि ती आपल्या स्टाईलने प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढवत होती (Actress Mamta Kulkarni underworld connection and her film career).

ममताचे वैयक्तिक आयुष्य

ममता कुलकर्णी बद्दल असं नेहमीच म्हटलं जात होतं की, तिने विकी गोस्वामी या अंडरवर्ल्ड ड्रग माफियाशी लग्न केले. परंतु, अभिनेत्रीने याचा कधी उल्लेख केला नाही आणि नेहमीच ती केवळ एक अफवा असल्याचे म्हटले गेले. असं म्हणतात की ममता विकी सोबत 10 वर्ष दुबईत राहत होती. त्याचबरोबर असेही म्हटले जात होते की, तिने तिच्या पतीसह मिळून अनेक बेकायदेशीर कामेही केली.

2016 मध्ये ममता कुलकर्णी आणि तिचा नवरा विक्की गोस्वामी यांना केनिया विमानतळ येथे अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. पण नंतर त्यांना सोडण्यात आले. असे म्हटले जाते की, तिला चित्रपटात काम मिळावे म्हणून अंडरवर्ल्ड मधून फोन यायचे.

अध्यात्माकडे वळली ममता कुलकर्णी

या सर्वानंतर जेव्हा ममता आयुष्याला कंटाळली, तेव्हा तिने एक पुस्तक लिहिले. या पुस्तकाचे नाव आहे ‘ऑटोबायोग्राफी ऑफ एन योगिन’. सध्या ती इंडस्ट्रीपासून खूप दूर गेली आहे. सध्या ती साध्वी बनून अध्यात्माकडे वळली आहे.

(Actress Mamta Kulkarni underworld connection and her film career)

हेही वाचा :

प्रत्येक डॉक्टर देव नसतो… वडिलांच्या मृत्यूला रुग्णालयच जबाबदार; अभिनेत्री संभावना सेठ लालबूंद

PHOTO | वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी ‘आजी’ बनली हृतिक रोशनची ‘ही’ अभिनेत्री, नातीचे फोटो केले सोशल मीडियावर शेअर!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.