‘कोको’ हरवलाय, शोधून देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस! ‘मुन्ना मायकल’ फेम अभिनेत्रीची घोषणा

‘मुन्ना मायकल’ फेम अभिनेत्री निधी अग्रवाल (Nidhhi Agerwal) हिच्याकडे देखील गोल्डन रिट्रीव्हर जातीचा एक पाळीव श्वान आहे. तिने या श्वानाला ‘कोको’(Coco) असे नाव दिले आहे.

‘कोको’ हरवलाय, शोधून देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस! ‘मुन्ना मायकल’ फेम अभिनेत्रीची घोषणा
निधी अग्रवाल
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 10:45 AM

मुंबई : कलाकार आणि त्यांचं पाळीव प्राण्यांबद्दलचं प्रेम तसं सर्वश्रुत आहे. अनेक कलाकारांकडे कुत्रे, मांजरी, घोडे असे पाळीव प्राणी आहेत. ‘मुन्ना मायकल’ फेम अभिनेत्री निधी अग्रवाल (Nidhhi Agerwal) हिच्याकडे देखील गोल्डन रिट्रीव्हर जातीचा एक पाळीव श्वान आहे. तिने या श्वानाला ‘कोको’(Coco) असे नाव दिले आहे. मात्र, नुकताच हा ‘कोको’ हरवला आहे. त्याला शोधून काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु झाले आहेत (Actress Nidhhi Agerwal pet dog coco missing 1 lakh rupees award announces to find dog).

‘मुन्ना मायकेल’ फेम अभिनेत्री निधी अग्रवाल हिने आपल्या पाळीव कोकोचा शोध घेण्यात मदत करणाऱ्या व्यक्तीला 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. टॉलीवूड नेटच्या वृत्तानुसार, निधीचा पाळीव श्वान ‘कोको’ काल तिच्या बंगळूरमधील घरातून बेपत्ता झाला होता.

सोशल मीडियावर शेअर केली माहिती

याबद्दल माहिती शेअर करत, इस्मृत शंकर फेम या अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये निधीने तिच्या या ‘कोको’ची माहिती शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये निधी म्हणते, “गोल्डन रिट्रीव्हर. त्याच्या गळ्यात गुलाबी कॉलर घातला आहे ज्यावर डायमंड स्टड्स आहेत, याने तो सहज ओळखला जाऊ शकतो. तसेच हृदयविकाराचा त्रास असलेला हा 8 वर्षांचा वृद्ध कुत्रा असल्याचेही तिने नमूद केले आहे. तिने असेही म्हटले आहे की, कोको अत्यंत शांत आणि फ्रेंडली आहे.”

कोकोला आदल्या दिवशी सकाळी 7:27 वाजता देवट प्लाझा, रेसिडेन्सी रोड, शांतला नगर, अशोकनगर बेंगळुर जवळ शेवटचे पाहिले गेले होते. जो कोणी तिला कोको शोधण्यास मदत केली त्याच्यासाठी निधीने बक्षीस म्हणून 1 लाख रुपयांची घोषणा केली आहे (Actress Nidhhi Agerwal pet dog coco missing 1 lakh rupees award announces to find dog).

पाळीव प्राण्यांबद्दल अतिशय प्रेम

निधीचे तिच्या पाळीव प्राण्यांशी अतिशय जवळचे नाते आहे आणि ती तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर या पाळीव प्राण्यांचे बरेच व्हिडीओ शेअर करत असते.

वर्क फ्रंट बद्दल बोलायचे तर, निधी अग्रवाल येत्या काळात पॉवर स्टार पवन कल्याणबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. माखिलथीरुमेनि दिग्दर्शित उद्यानितीबरोबर तिचा आणखी एक चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

(Actress Nidhhi Agerwal pet dog coco missing 1 lakh rupees award announces to find dog)

हेही वाचा :

‘रंगीला’नंतरच्या एका वक्तव्यामुळे आमीर-राम गोपाल वर्माच्या नात्यात आले होते वितुष्ट, वाचा पुढे काय झालं…

‘माणूस ते संत’ दैवी प्रवास, पुन्हा एकदा अनुभवता येणारा ‘तुकारामां’ची गाथा!

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.