Rosie The Saffron Chapter : श्वेता तिवारीच्या लेकीचे मोठ्या पडद्यावर पदार्पण, पाहा चित्रपटाचा जबरदस्त टीझर!

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिची लेक पलक तिवारी (Palak Tiwari) लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. सध्या पलक तिची डेब्यू फिल्म रोझीच्या (Rosie The Saffron Chapter) शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Rosie The Saffron Chapter : श्वेता तिवारीच्या लेकीचे मोठ्या पडद्यावर पदार्पण, पाहा चित्रपटाचा जबरदस्त टीझर!
‘रोझी : द सॅफ्रन चॅप्टर’
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 6:52 PM

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिची लेक पलक तिवारी (Palak Tiwari) लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. सध्या पलक तिची डेब्यू फिल्म रोझीच्या (Rosie The Saffron Chapter) शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आज (1एप्रिल) निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. टीझरमध्ये कोणतेही व्हिज्युअल दाखवले गेले नाहीत. यात केवळ व्हॉईसओव्हर आणि काही मजकूर आहे. टीझर सामायिक करण्याबरोबरच अभिनेता अरबाज खानसुद्धा या चित्रपटात सामील झाला आहे (Actress Palak Tiwari Debut film Rosie The Saffron Chapter teaser release).

टीझरमध्ये व्हॉईसओव्हर येतो ऐकू येतो, ‘अगर भगवान हर जगह होता है तो प्यार भी हर जगह होता है. कहते हैं प्यार में खुली आंख से सपना दिखता है. मेरी मुश्किल ये थी कि मेरा सपना सच हो गया.’ यासह टीझरमध्ये असे लिहिले आहे, ‘जर तुम्हाला एखाद्यावर प्रेम असेल, तर त्यांना मुक्त करा. संपूर्ण जग त्याला आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करेल.’

येथे पाहा रोझीचा टीझर :

View this post on Instagram

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

‘रोझी : द सॅफ्रन चॅप्टर’ हा गुरुग्राममधील एका सत्य घटनेवर आधारित भयपट आणि रहस्यमय गोष्टींनी भरलेला चित्रपट आहे. हा चित्रपट ‘रोझी’च्या व्यक्तिरेखेभोवती फिरत आहे, जी सॅफ्रन बीपीओच्या कर्मचाऱ्यांपैकी एक आहे आणि या बीपीओवर भूत-प्रेताची बाधा असल्याचे बोलले जात आहे (Actress Palak Tiwari Debut film Rosie The Saffron Chapter teaser release).

मोशन पोस्टरही चर्चेत

काही काळापूर्वी रोझी चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करण्यात आले होते. पलक तिवारी हिने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला होता. त्यात असे लिहिले होते की, ‘या क्षणी मला चिंताग्रस्त, उत्साहित, अभिभूत आणि अभिमान वाटतो आहे.’

तब्बल 13 वर्षांनंतर झाली वडीलांशी भेट

पलक तिवारी ही मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांची मुलगी आहे. राजाने अलीकडे बर्‍याच दिवसांनी आपल्या मुलीला भेटले होते. त्यानंतर त्यांनी पलकसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत, एक भावनिक पोस्ट लिहिली होती. राजा चौधरी यांनी पलकसोबतचा सेल्फी पोस्ट करताना लिहिले की, ‘माझ्या आयुष्यातील एक खास क्षण. मी तिला 13 वर्षांनंतर भेटलो.’ एका मुलाखती दरम्यान राजा म्हणाले, ‘जेव्हा मी तिला शेवटच्या वेळी पाहिले तेव्हा ती एक लहान मुलगी होती आणि आता ती खूप मोठी झाली आहे.’

टाईम्स ऑफ इंडियाशी खास बातचीत करताना राजा चौधरी यांनी सांगितले होते की, ‘मी आणि पलक व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे एकमेकांशी जोडले गेले होते. मी तिला रोज गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवायचो, पण आम्ही कधी एकमेकांना भेटलो नाही. मी माझ्या आई-वडिलांसह मेरठमध्ये राहतो पण सध्या काही कामानिमित्त मुंबईला आलो होतो. मी येथे येऊन पलकला फोन केला, ती तिच्या चित्रपटाची रिहर्सल करत होती. तरीही तिने वेळ काढून मुंबईच्या अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये माझी भेट घेतली. जिथे आम्ही जवळपास दीड तास बोललो. मी भूतकाळाबद्दल काहीच बोललो नाही. बाप-लेकीप्रमाणे आमच्यातही भविष्याच्या चर्चा झाल्या.

(Actress Palak Tiwari Debut film Rosie The Saffron Chapter teaser release)

हेही वाचा :

Ratris Khel Chale 3 | ‘शेवंता परत कधी येणार?’ तुम्हालाही जाणून घ्यायचंय उत्तर? मग, लगेचच फोनचा ब्राईटनेस वाढवा!

Bollywood Movies In April | कोरोना लॉकडाऊनचं सावट, तरीही बॉक्स ऑफिसवर नशीब आजमवणार ‘हे’ बॉलिवूड चित्रपट…

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.