Rhea Chakraborty  | ‘चेहरे’च्या पोस्टरवरून रियाचा चेहरा गायब! अमिताभ आणि इमरान एकटेच करणार प्रमोशन?

चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर नुकताच रिलीज झाला आहे. पण, रिया चक्रवर्तीची झलक अद्याप चाहत्यांना दाखवण्यात आलेली नाही. रिया चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सहभाग घेणार की नाही, याचा निर्णय आता निर्माते घेणार आहेत.

Rhea Chakraborty  | ‘चेहरे’च्या पोस्टरवरून रियाचा चेहरा गायब! अमिताभ आणि इमरान एकटेच करणार प्रमोशन?
चेहरे
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 9:13 AM

मुंबई : अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मीचा चित्रपट ‘चेहरे’ लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. क्रिस्टल डिसूझा, अन्नू कपूर, धृतिमान चक्रवर्ती, रघुबीर यादव, सिद्धांत कपूर, अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी आणि रिया चक्रवर्ती यांच्या ‘चेहरे’ महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर नुकताच रिलीज झाला आहे. पण, रिया चक्रवर्तीची झलक अद्याप चाहत्यांना दाखवण्यात आलेली नाही. रिया चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सहभाग घेणार की नाही, याचा निर्णय आता निर्माते घेणार आहेत (Actress Rhea Chakraborty missing from Amitabh bachchan starrer chehre movie teaser and poster).

स्पॉटबॉयच्या अहवालानुसार, रिया आता जगासमोर यावी, अशी दिग्दर्शक रुमी जाफरेची इच्छा आहे. काही जण म्हणतायत की, ती सर्वांचा सामना करण्यास तयार आहे, तर उर्वरित लोक असे सांगत आहेत की, जर रिया प्रमोशनसाठी लोकांसमोर आली, तर तिला विचित्र प्रश्न विचारले जातील.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती ही चर्चेचा एक भाग बनली आहे. ड्रग्स प्रकरणात रियाला एनसीबीनेही अटक केली होती. 1 महिन्यांपर्यंत तुरूंगात राहिल्यानंतर रिया आता जामीनावर बाहेर आली आहे. रियाची प्रतिमा खराब झाल्यानंतर तिच्या प्रमोशनमध्ये सामील होणार की, नाही याविषयी चर्चा सुरू आहे. कारण, जर ती प्रमोशनचा भाग बनली तर, कदाचित त्याचा चित्रपटावरही परिणाम होऊ शकतो.

दुसरे निर्माते म्हणतात…

जेव्हा चित्रपटाच्या पोस्टर्सवर रियाला जागा दिली जात नव्हती, तेव्हा बर्‍याच चित्रपट निर्मात्यांनी रियाचे समर्थन केले. एका चित्रपट निर्मात्याने म्हटले होते की, ‘मला नक्कीच रियाबरोबर काम करायचं आहे. ती सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे आणि आता लोकांनाही तिला मोठ्या पडद्यावर बघायचे आहे. मला तिच्याबरोबर काम करण्यात काहीच अडचण नाही.’(Actress Rhea Chakraborty missing from Amitabh bachchan starrer chehre movie teaser and poster)

‘चेहरे’चा टीझर :

(Actress Rhea Chakraborty missing from Amitabh bachchan starrer chehre movie teaser and poster)

एनसीबीच्या आरोपपत्रात आले रियाचे नाव

एनसीबीने नुकत्याच दाखल केलेल्या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती हिचे नाव मुख्य आरोपी म्हणून घेण्यात आले आहे. आरोपपत्रात रियाचे नाव समोर आल्यानंतर रियाचे वकील म्हणाले, ‘एनसीबीने रिया चक्रवर्ती यांना या प्रकरणात अडकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. संपूर्ण एनसीबी बॉलिवूडच्या ड्रग प्रकरणाचा खुलासा करण्यात मग्न आहे. दाखल केलेली चार्जशीट निरुपयोगी आहे, जी एनडीपीएस अधिनियम कलमांतर्गत नोंदवलेले अयोग्य पुरावे आणि विधानांच्या आधारे उभे राहिली आहे.’

गूढ-थ्रिलर चित्रपट

‘चेहरे’ हा एक गूढ-थ्रिलर चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन रूमी जाफरी यांनी केले आहे. या वर्षाचा सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपट म्हणून ‘चेहरे’चे नाव घेतले जात आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी व्यतिरिक्त अन्नू कपूर, क्रिस्टल डिसूझा, धृतिमान चक्रवर्ती, रघुबीर यादव आणि सिद्धांत कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित याच्या मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड केली आहे. हा चित्रपट आता 9 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

(Actress Rhea Chakraborty missing from Amitabh bachchan starrer chehre movie teaser and poster)

हेही वाचा :

मसाबाकडून जुन्या आठवणींना उजाळा, विव्ह रीचर्ड्स-नीना गुप्ता यांचे अनसीन फॅमिली फोटो शेअर

Bollywood Corona | मनोरंजन विश्वात कोरोनाची दहशत, बॉलिवूडचे आणखी दोन मोठे कलाकार कोरोनाच्या विळख्यात!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.