अभिनेत्रीने कुटुंबाच्या विरोधात जात केले लग्न, घटस्फोटानंतर म्हणाली, मला कधीच…
अभिनेत्री श्वेता तिवारी हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. श्वेता तिवारी ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच श्वेता तिवारीने मोठा खुलासा केला होता. आता तिने तिच्या लग्नाबद्दलही मोठा खुलासा केलाय.
अभिनेत्री श्वेता तिवारी ही सतत चर्चेत असते. श्वेता तिवारीने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. श्वेता तिवारीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना श्वेता तिवारी ही दिसते. काही दिवसांपूर्वीच श्वेता तिवारी हिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे हे श्वेता तिवारीकडून करण्यात आले. श्वेता तिवारीने स्पष्ट केले की, ती आता कोणत्याही टीव्ही मालिकांमध्ये काम करणार नाहीये. एकतर घरी मुलांना वेळ द्यावा लागतो आणि शूटिंगचे लोकेशन दूर असते. हेच नाही तर रविवारीही शूटिंगला सुट्टी नसल्याने आपण मालिकांमध्ये काम करणार नसल्याचे श्वेता तिवारीकडून स्पष्ट करण्यात आले.
श्वेता तिवारी ही फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर कायमच तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिने काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. पलकच्या बॉलिवूड पर्दापणासाठी श्वेता तिवारी हिने खूप जास्त परिश्रम घेतल्याचे सांगितले जाते. अनेक चित्रपट निर्मात्यांना श्वेता भेटली होती. शेवटी श्वेताच्या मुलीला चित्रपटात काम करण्याची संधी ही सलमान खान याने दिली.
नुकताच श्वेता तिवारी हिने एक मुलाखत दिलीये. श्वेता तिवारी ही यावेळी तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसली. श्वेता तिवारी म्हणाली की, माझ्या कुटुंबात मी पहिली आहे, जिने लव्ह मॅरेज केले. माझ्या लग्नाला खूप जास्त विरोध माझ्या कुटुंबियांचा होता. घरच्यांच्या विरोधात जात श्वेता तिवारी हिने 1998 मध्ये राजा चाैधरी याच्यासोबत लग्न केले. मात्र, लग्नाच्या नऊ वर्षांनंतर दोघांचे रस्ते वेगळे झाले.
2013 मध्ये श्वेता हिने अभिनव वर्मा याच्यासोबत लग्न केले. 2019 मध्ये अभिनवसोबतही श्वेताने घटस्फोट घेतला. पलक तिवारी ही राजा चाैधरी आणि श्वेताची मुलगी आहे. रियांश हा श्वेता तिवारी आणि अभिनव वर्माचा मुलगा आहे. श्वेता आता आपल्या दोन्ही मुलांसोबत आयुष्य जगते. श्वेता तिवारी म्हणाली की, राजासोबत घटस्फोट घेणे माझ्यासाठी खरोखरच अवघड होते.
कारण माझ्या मुलीच्या डोक्यावरील वडिलांचा हात जावा असे मला कधीच वाटत नव्हते. मात्र, ज्यावेळी माझा आणि राजाच्या घटस्फोट झाला, त्यावेळी मला समजले की, कधीही हॅप्पी फॅमिली असणे आवश्यक आहे. कुटुंबाच्या नावाखाली मरून जगण्याच काहीच अर्थ नाही. श्वेता तिवारी ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. एका अभिनेत्यासोबत श्वेता तिवारी हिचे नाव गेल्या काही दिवसांपासून जोडले जात आहे.