Aishwarya Rai : ऐश्वर्या रॉय बोललेली खोटं?, दिग्दर्शकांनी पत्ता कट करत करीनाला घेतलेलं चित्रपटात!
ऐश्वर्यावर एक वेळ अशी आलेली की तिनं चित्रपटात लीड रोल मिळवण्यासाठी डायरेक्टशी खोटं बोलली होती. पण नंतर डायरेक्टरला जेव्हा खरं समजलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सौंदर्यामुळे तिचे लाखो दिवाने आहेत. सौंदर्यासोबतच ऐश्वर्याने तिच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. सध्या ऐश्वर्या ‘पोन्नियन सेल्वन 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण, तुम्हाला माहितीये का ऐश्वर्यावर एक वेळ अशी आलेली की तिनं चित्रपटात लीड रोल मिळवण्यासाठी डायरेक्टशी खोटं बोलली होती. पण नंतर डायरेक्टरला जेव्हा खरं समजलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती.
ऐश्वर्या चित्रपटात लीड रोल मिळवण्यासाठी चक्क डायरेक्टशी खोटं बोलली होती. तिनं डायरेक्टरपासून तिच्या प्रेग्नेंसीची बातमी लपवली होती. मधुर भांडारकर यांच्या ‘हिरोईन’ या चित्रपटात लीड रोल मिळवण्यासाठी ऐश्वर्यानं तिची प्रेग्नेंसीची बातमी लपवली होती. पण जेव्हा तिच्या प्रेग्नेंसीबाबत सर्वांना समजलं तेव्हा एकच खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, 2011 साली मधुर भांडारकर त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘हिरोईन’ या चित्रपटावर काम करणार होते. त्यावेळी या चित्रपटासाठी ऐश्वर्याला कास्ट करण्यात आलं होतं. ऐश्वर्यासोबतच या चित्रपटात अन्य काही अभिनेत्रींनाही कास्ट करण्यात आलं होतं. तसंच चित्रपटात एडल्ट सीन देखील दाखवण्यात येणार होते. पण, त्यानंतर असं काही झालं की मधुर भांडारकर यांच्या पायाखालची जमीन सरकली होती.
या चित्रपटाचं शूटिंग सुरू झाल्यानंतर मधुर भांडारकर यांना ऐश्वर्याच्या प्रेग्नेंसीबाबत समजलं. त्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला होता. मधुर भांडारकर यांना ऐश्वर्याच्या प्रेग्नेंसीची बातमी ही माध्यमांकडून समजली होती. त्यानंतर ते ऐश्वर्यावर इतके नाराज झाले होते की त्यांनी थेट तिला ‘हिरोईन’ चित्रपटातून बाहेर काढलं आणि तिच्या जागी करिना कपूरला घेतलं.
ऐश्वर्याबाबत काय म्हणाले होते मधुर भांडारकर?
एका मुलाखतीत मधुर भांडारकर म्हणाले होते की, ‘हिरोईन’ चित्रपटाची शूटिंग होऊन 8 दिवस झाले होते. त्यावेळी माझी असोसिएट डायरेक्टर पाय घसरून पडली आणि तिला चांगलंच लागलं होतं. पण, जेव्हा मी ऐश्वर्याला पाहतो तेव्हा वाईट वाटतं, कारण त्या असोसिएट डायरेक्टरच्या जागी जर ऐश्वर्या असती तर मी स्वतःलाही माफ करू शकलो नसतो. सोबतच चित्रपटात स्मोकींगचे सीन देखील होते. पण प्रेग्नेंट महिलांसाठी ते योग्य नाहीये. तसंच जेव्हा आम्हाला समजलं की ऐश्वर्या चार महिन्यांची प्रेग्नंट आहे तेव्हा आम्हाला मोठा धक्का बसला होता.