बॉलिवू़ड स्टार अक्षय कुमार आणि ट्विंकल लग्नाआधी 2 वर्षे लिवइनमध्ये, डिंपलने का दिला असा सल्ला? जाणून घ्या
बॉलिवूडमध्ये रुपेरी पडद्यावर दिसणाऱ्या काही जणांनी खऱ्याखुऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधली आहे. यात बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचंही नावं येतं. पण या दोघांचं लग्न होण्यापूर्वी डिंपलने मुलगी ट्विंकल हीला अजब सल्ला दिला होता, जाणून घ्या त्याबाबत
मुंबई : अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना बॉलिवूडमधील एक बेस्ट कपल म्हणून गणलं जातं. या दोघांच्या लग्नाला 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. अक्षय आणि ट्विंकल या दोघांची पहिली भेट एका मॅगनीजच्या शूट दरम्यान झाली होती. अक्षय कुमार जेव्हा शूटसाठी सेटवर पोहोचला तेव्हा पहिल्या नजरेतच ट्विंकलच्या प्रेमात पडला होता. त्यानंतर या दोघांनी इंटरनॅशनल खिलाडी चित्रपटात एकत्र काम केलं आणि दोघं एकमेकांजवळ आले. दोघांमध्ये गप्पा रंगू लागल्या आणि घट्ट मैत्री झाली. त्यानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि डेट करू आणि अक्षय कुमार याने लग्नाची मागणी घातली. पण ट्विंकलची आई डिंपल हीला अक्षयबाबत गैरसमज होता आणि त्यासाठी तिने तिला अजब सल्ला दिला होता. दोघांना दोन वर्षे लिवइन मध्ये राहण्याचा सल्ला डिंपलने दिला होता. याबाबत खुलासा खुद्द ट्विंकल खन्ना हीन कॉफी विथ करण शो मध्ये केला आहे. याचा पुनरुच्चार ट्विंकलने पुन्हा एकदा ट्वीक इंडिया सेशनमध्ये मसाबा गुप्ता हीच्याशी बोलताना केला आहे.
काय सांगितलं होतं आई डिंपलने
“अक्षयच्या प्रपोजनंतर मी वडीलांशी बोलले. तेव्हा त्यांनी योग्य ती चौकशी करून लग्नास होकार दिला. पण आईने मला सल्ला दिला की दोन वर्षे लिवइन मध्ये राहा. जर दोघांमध्ये संबंध चांगला राहतात तर लग्न करा. मी लग्न केलं आहे आणि मला माहिती आहे की नात्यात कशा पद्धतीने बदल होतो ते.”, असं ट्विंकल खन्ना हीने सांगितलं. “आईने मला आणि माझ्या बहिणीला एकटीने सांभाळलं आहे. तिला याबाबत माहिती आहे. त्यामुळेच तिने असा सल्ला दिला.”, असंही ट्विंकल खन्ना हीने पुढे सांगितलं. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी 2001 मध्ये लग्न करत संसाराला सुरुवात केली. या जोडप्याला दोन मुलं असून त्यांची नावं आरव आणि नितारा अशी आहेत.
लग्नाचा ट्विंकल खन्ना हीच्या मेला चित्रपटाशीही संबंध
अक्षय कुमार ट्विंकल खन्नाच्या प्रेमात पार बुडाला होता. कोणत्याही परिस्थितीत लग्न करायचं होतं. ट्विंकलने लग्न करण्यापूर्वी एक अट ठेवली होती. ट्विंकल खन्ना हीचा मेला चित्रपट रिलीज होणार होता. जर मेला चित्रपट पडला तर मी लग्न करेन असं तिने सांगितलं होतं. तेव्हा अक्षय कुमार याला वाटलं की आता काय आपलं लग्न होत नाही. पण मेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आणि दोघांनी 2001 मध्ये लग्न केलं.