Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Setu | ‘रामसेतु’च्या चित्रीकरणाला ‘या’ दिवशी सुरुवात होणार! कोरोनाला मात दिल्यानंतर अक्षय कुमार कामासाठी सज्ज!

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयावर राज्य करतो. अक्षयच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अक्षय सध्या आपला आगामी ‘राम सेतु’ (Ram Setu) या चित्रपटासाठी चर्चेत आहे.

Ram Setu | ‘रामसेतु’च्या चित्रीकरणाला ‘या’ दिवशी सुरुवात होणार! कोरोनाला मात दिल्यानंतर अक्षय कुमार कामासाठी सज्ज!
अक्षय कुमार
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 2:54 PM

मुंबई : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयावर राज्य करतो. अक्षयच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अक्षय सध्या आपला आगामी ‘राम सेतु’ (Ram Setu) या चित्रपटासाठी चर्चेत आहे. रामसेतुमध्ये अक्षय एका नव्या पात्रातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अशा परिस्थितीत आता त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे (Akshay Kumar upcoming Film Ram setu update shooting will resume soon).

उत्तर प्रदेशात ‘राम सेतु’ची शूटिंग सुरू झाली होती. पण कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. आता निर्मात्यांनी पुन्हा एकदा शूटिंग सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे.

‘रामसेतु’चे पुन्हा सुरु होणार!

‘राम सेतु’च्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमार कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर चित्रपटाचे शूटिंग पूर्णपणे बंद करण्यात आले होते. आता उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. येत्या जूनपासून या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू होणार आहे.

अलीकडेच एक अशी बातमी आली आहे की, चित्रपटाचे शूटिंग 4 जून ते 20 जून दरम्यान सुरू होऊ शकेल आणि निर्मात्यांनी यासाठी एक विशेष योजना तयार केली आहे. आता जवळपास सर्व निश्चित झाले आहे की, 20 जूनपासून पुन्हा एकदा चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी ही चांगली बातमी आहे (Akshay Kumar upcoming Film Ram setu update shooting will resume soon).

अक्षय कुमार सज्ज!

यावरून हे स्पष्ट होते की, कोरोनाला मात दिल्यानंतर आता पुन्हा एकदा खिलाडी कुमारने काम करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे असे म्हटले जात आहे की, या चित्रपटाचे कलाकार आणि इतर क्रू सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये श्रीलंकेला रवाना होतील. चित्रपटाच्या एका महत्त्वाच्या भागाचे चित्रीकरण श्रीलंकेत होणार आहे.

‘राम सेतु’ चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज आणि नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याच ठिकाणी चित्रपटाला मूर्त रूप देण्यासाठी, व्हीएफएक्स टीमने फिल्म सिटीमध्ये लेण्यांचा एक सेट तयार केला आहे, ज्याद्वारे अक्षय ‘राम सेतु’च्या ठिकाणी पोहोचताना दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार एका पुरातत्वज्ञाचे पात्र साकारताना दिसणार आहे. अक्षयकडे ‘रामसेतु’ व्यतिरिक्त ‘बेलबॉटम’, ‘अतरंगी रे’, ‘रक्षाबंधन’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘हाऊसफुल 5’ सारख्या चित्रपटांची रांग आहे.

(Akshay Kumar upcoming Film Ram setu update shooting will resume soon)

हेही वाचा :

Controversy | ‘बबिता जीं’च्या अडचणी आणखी वाढल्या, ‘तो’ वादग्रस्त शब्द वापरल्याने FIR दाखल!

TMKOC | रिअल लाईफ ‘जेठालाल’-‘टप्पू’मध्ये वाद? दिलीप जोशींनी उचलले मोठे पाऊल!

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.