Akshay Kumar | ‘रामलला’चे दर्शन घेऊन अक्षय कुमार करणार ‘राम सेतु’ची सुरुवात, अयोध्येत होणार चित्रीकरण!

अक्षय गेल्या काही दिवसांपासून आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. अलिकडे ‘बच्चन पांडे’चे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर आता तो ‘राम सेतु’मध्ये व्यस्त होणार आहे.

Akshay Kumar | ‘रामलला’चे दर्शन घेऊन अक्षय कुमार करणार ‘राम सेतु’ची सुरुवात, अयोध्येत होणार चित्रीकरण!
राम सेतु
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 2:22 PM

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा सध्या आपल्या परिवारासह सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. कामातून ब्रेक घेत अक्षय मालदीवमध्ये सुट्टी साजरा करत आहे. अक्षय गेल्या काही दिवसांपासून आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. अलिकडे ‘बच्चन पांडे’चे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर आता तो ‘राम सेतु’मध्ये व्यस्त होणार आहे. अक्षय लवकरच या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. अक्षय कुमार रामललाची भेट देऊन या चित्रपटाची सुरूवात करणार आहे (Akshay Kumar will start Ram Setu shoot in ayodhya).

राम सेतुचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा आणि निर्मिती डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केली आहे. रिपोर्ट्सनुसार, 18 मार्च रोजी अक्षय, दिग्दर्शक आणि निर्मात्यासमवेत चित्रपटाच्या मुहूर्त शूटसाठी अयोध्येत जाणार आहे. भगवान राम यांच्या आशीर्वाद घेऊन अक्षय चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

अयोध्येत होणार चित्रीकरण

चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांनी सांगितले की, येत्या काही महिन्यांत चित्रपटाचे 80 टक्के शेड्युल अयोध्येत शूट केले जाईल. त्यानंतरच्या शेड्युलचे शूटिंग मुंबईत होणार आहे. या चित्रपटात अक्षय पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार असल्याचेही दिग्दर्शकाने सांगितले आहे. अक्षयच्या चाहत्यांना ‘राम सेतु’मधील त्याचा नवा लूक आणि नवे पात्र लवकरच पाहायला मिळणार आहे.

या अभिनेत्री मुख्य भूमिकेत

अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘राम सेतु’मध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पहिल्यांदाच या अभिनेत्री अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. निर्माते साजिद नाडियाडवाला या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत (Akshay Kumar will start Ram Setu shoot in ayodhya).

दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटाची घोषणा

जेव्हा, अक्षय कुमारने या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले तेव्हा त्यांने लिहिले होते की, ‘ही दिवाळी म्हणजे भारत राष्ट्राचा आदर्श आणि भगवान श्रीरामाची महान स्मृती, येणाऱ्या युगांपर्यंत भारतीय संस्कृती सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. चला सगळ्या पिढ्यांना रामाशी जोडूया. या प्रयत्नात आमचा एक छोटासा संकल्पही आहे, ‘राम सेतु’, आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.’

अक्षय कुमारने नुकतेच आपल्या आगामी ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्याचा ‘सूर्यवंशी’ही रिलीजसाठी सज्ज झाला आहे. सूर्यवंशीची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट 30 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ज्याचे प्रमोशन अक्षय त्याच्या खास स्टाईलमध्ये करतो आहे. याशिवाय अक्षय ‘बेलबॉटम’, ‘अतरंगी रे’, ‘रक्षाबंधन’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘हाऊसफुल 5’ सारख्या चित्रपटांतून आपले मनोरंजन करणार आहे.

(Akshay Kumar will start Ram Setu shoot in ayodhya)

हेही वाचा :

Suhana Khan | शाहरुखच्या लेकीची मित्र-मैत्रिणींसोबत धमाल पार्टी, पाहा सुहानाचा बोल्ड अंदाज!

Marathi Serial : ठाण्यातील तलावपाळी परिसर आकर्षक रोषणाईने उजळला, महाराष्ट्र पोलिसांना सलाम

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.