बॉलिवूडमध्ये ‘स्टारकिड्स’ची भरणा, आता सलमानच्या घरातील ‘या’ व्यक्तीला लाँच करणार सूरज बडजात्या!

सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नवीन स्टार किड्सच्या पदार्पणाची चर्चा सुरू आहे. या यादीत आता आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे, ती म्हणजे सलमान खानची भाची अलिझा अग्निहोत्री.

बॉलिवूडमध्ये ‘स्टारकिड्स’ची भरणा, आता सलमानच्या घरातील ‘या’ व्यक्तीला लाँच करणार सूरज बडजात्या!
अलिझा अग्निहोत्री
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 2:36 PM

मुंबई : सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नवीन स्टार किड्सच्या पदार्पणाची चर्चा सुरू आहे. या यादीत आता आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे, ती म्हणजे सलमान खानची भाची अलिझा अग्निहोत्री (Alizeh Agnihotri). प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सूरज बड़जात्या यांचा मुलगा अवनीश बड़जात्याच्या आगामी चित्रपटाद्वारे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याचवेळी, राजवीर देओल (Rajveer Deol) (बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा धाकटा मुलगा) देखील या चित्रपटाद्वारे पदार्पण करताना दिसणार आहे. तो या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे (Alizeh Agnihotri niece of salman khan debuying in Bollywood soon).

सूत्रांच्या माहितीनुसार, अलिझाचा हा चित्रपट अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर फिल्म ‘ये जवानी है दिवानी’शी साधर्म्य दाखवणारा असेल. ज्यामध्ये यंगस्टर्सचे आयुष्य आणि प्रेमाची नवी परिभाषा दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, अद्याप चित्रपटाच्या नावाविषयी काहीही घोषणा करण्यात आलेली नाही. प्रत्येकजण या चित्रपटाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहे.

सलमानची कारकीर्द घडवण्यात सूरज यांचा हात!

‘विवाह’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ यासारखे हिट चित्रपट बनवणारे प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक सूरज बड़जात्या यांच्या ‘हम आपके हैं कौन’, ‘मैंने प्यार किया’, ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटांनी सलमान खानच्या कारकीर्दीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राजश्री प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतरच सलमानला इंडस्ट्रीमध्ये विशेष ओळख मिळाली होती. अशा परिस्थितीत सूरज आता सलमानच्या भाचीच्या कारकीर्दीला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो (Alizeh Agnihotri niece of salman khan debuying in Bollywood soon).

सलमानच्या ‘खान’ घराण्यातील नातवंड

अलिझा अग्निहोत्री ही अतुल अग्निहोत्री आणि सलमान खांची बहिण अल्विरा खान यांची मुलगी आहे. ती खान कुटुंबाची नात आहे. बॉलिवूडमध्ये अलिझाच्या पदार्पणाच्या बातम्या बर्‍याच काळापासून येत होत्या. तिचे नाव याआधी सलमान खानच्या ‘दबंग 3’साठी समोर येत होते. मात्र, ही केवळ अफवा असल्याचे नंतर उघडकीस आले.

दोन वर्षे अडकला होता चित्रपट

सनी देओलचा मोठा मुलगा करण देओलनंतर त्यांचा धाकटा मुलगा राजवीर देओल (Rajveer Deol) देखील चित्रपटाच्या विश्वात पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. बातमीनुसार, राजवीर आणि अलिझा ज्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे, त्या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बड़जात्याचा मुलगा अवनीश बडजात्या करणार आहे. अवनीश याचीसुद्धा ही डेब्यू फिल्म असणार आहे, जी गेल्या दोन वर्षांपासून अडकलेली होती. काही कारणास्तव, प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकले नव्हते. पण, लवकरच याची अधिकृत घोषणा होईल, असे म्हटले जाते.

(Alizeh Agnihotri niece of salman khan debuying in Bollywood soon)

हेही वाचा :

Gauri Khan | गौरी खानचा ग्लॅमरस अंदाज, शाहरुख खानच्या पत्नीचे ‘हे’ फोटो पाहून चाहतेही म्हणाले ‘व्वा!’

Neha Khan | आई मराठी, मुस्लीम वडिलांच्या तिसऱ्या बायकोची मुलगी, ‘देवमाणूस’फेम नेहा खानची संघर्षगाथा

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.