Chehre Update | अमिताभ-इमरानच्या ‘चेहरे’ला कोरोना पुन्हा फटका! चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा लांबणीवर

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि इमरान हाश्मी (Emraan Hashmi) यांच्या ‘चेहरे’ (Chehre) चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Chehre Update | अमिताभ-इमरानच्या ‘चेहरे’ला कोरोना पुन्हा फटका! चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा लांबणीवर
चेहरे
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 4:09 PM

मुंबई : जगभरात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. मुंबई आणि दिल्ली येथे कोरोनाची परिस्थिती आणखी वाईट होत चालली आहे. आता, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि इमरान हाश्मी (Emraan Hashmi) यांच्या ‘चेहरे’ (Chehre) चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट 9 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. परंतु, ज्या प्रकारे या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे, ते पाहता मेकर्सनी या क्षणी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. इमरान हाश्मीने स्वत: सोशल मीडियावर ही घोषणा केली आहे (Amitabh Bachchan starrer Chehre film release postpone due to increase corona cases).

कोरोनाची वाढती संख्या पाहता आणि थिएटरच्या नव्या मार्गदर्शक सूचनांमुळे इमरानने या चित्रपटाच्या निर्मात्यांनी जाहीर केलेले निवेदन शेअर केलं आहे. त्याने कॅप्शनमध्ये म्हटले की, ‘आता 9 एप्रिलला आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करू शकत नाही आणि पुढच्या सूचनापर्यंत चित्रपटाचे प्रदर्शन स्थगित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि आम्ही तुमच्या प्रेमाबद्दल आभारी आहोत. जेव्हा परिस्थिती सामान्य होईल तेव्हा, आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी थिएटरमध्ये ‘चेहरे’ भेटीस आणू. सर्व लवकरच थिएटरमध्ये भेटू. आपला चेहरा मास्कने झाका आणि सॅनिटायझर वापरण्यास विसरू नका.’

प्रेक्षकांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची!

ही पोस्ट शेअर करताना इमरानने लिहिले की, ‘आमच्या प्रेक्षकांची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वोच्च आहे. आम्हाला आत्तापर्यंत मिळालेल्या प्रेमापोटी आणि समर्थनाबद्दल आम्ही चित्रपट रसिकांचे आभार मानतो. आपण चित्रपटाद्वारे भेटूच, तोपर्यंत तुम्ही सुरक्षित राहा.’

काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, कोव्हिडमुळे आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईवर मोठा परिणाम झाला आहे, ज्यामुळे चित्रपटाचे निर्माते चित्रपट प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊ शकतात. रिपोर्ट्सनुसार, आनंद पंडित यांना होळीनंतर संबंधितांशी बातचीत करून, चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला (Amitabh Bachchan starrer Chehre film release postpone due to increase corona cases).

कोरोनामुळे चित्रपट लांबणीवर

(Amitabh Bachchan starrer Chehre film release postpone due to increase corona cases)

कोरोना साथीच्या रोगामुळे मागील वर्षी देखील ‘चेहरे’ प्रदर्शित होऊ शकला नाही. चित्रपटाची घोषणा 11 एप्रिल 2019 रोजी झाली होती आणि त्याचे शूटिंग 10 मे रोजी सुरू झाले. गेल्या वर्षी 17 जुलै रोजी हा चित्रपट रिलीज होणार होता, पण कोरोनामुळे तेव्हा देखील या चित्रपटाच्या रिलीजला ब्रेक लागला होता.

रिया चक्रवर्तीमुळे चित्रपट चर्चेत!

अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मीशिवाय अभिनेत्री रिया चक्रवर्ती देखील या चित्रपटात आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती या चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजन विश्वात पुनरागमन करत आहे. निर्मात्यांनी रियाला चित्रपटाच्या पोस्टर्स आणि टीझर्समधून हटवले असले, तरी ट्रेलरमध्ये रिया दिसल्यानंतर हा चित्रपट चर्चेत आला होता.

(Amitabh Bachchan starrer Chehre film release postpone due to increase corona cases)

हेही वाचा :

Well done baby : अखेर प्रतिक्षा संपली, पुष्कर जोग आणि अमृता खानविलकरच्या ‘वेल डन बेबी’चा मुहूर्त ठरला

Video | नारळ वाढवून अभिनेत्याच्या फोटोची पूजा, पवन कल्याणच्या ‘वकील साब’च्या ट्रेलर लाँच दरम्यान थिएटरमध्ये राडा!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.