मुंबई : आर्यन खानला (Aryan Khan) गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आता त्याच्या सुटकेची प्रक्रिया आज म्हणजेच शुक्रवारी (29 ऑक्टोबर) सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर आर्यनला आजची रात्रही तुरुंगात काढावी लागेल आणि त्यानंतर उद्या (30 ऑक्टोबर) रोजी सकाळी त्याची सुटका होईल.
तज्ज्ञांच्या मते, मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या जामीन आदेशाची प्रत (तपशीलवार आदेशाची प्रत किंवा ऑपरेटिव्ह भाग) विशेष एनडीपीएस न्यायालयात जमा करावी लागते. विशेष NDPS न्यायालय आरोपीच्या नावावर ‘रिलीज ऑर्डर’ जारी करते आणि सुरक्षेसाठी जामिनाची रक्कम किंवा वैयक्तिक बाँड तसेच इतर काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करते. हा सुटकेचा आदेश आर्थर रोड कारागृहाबाहेरील जामीन पेटीत ठेवण्यात आला आहे.
सायंकाळी 5 वाजल्यापासून कोर्टाची प्रक्रिया पूर्ण करून जामिनाच्या पेटीत सुटकेचा आदेश टाकला, तर सायंकाळी 7-8 वाजेपर्यंत आर्यन बाहेर येईल. या बॉक्समधून निघालेल्या रिलीझ ऑर्डरच्या आधारे तुरुंग अधिकारी आरोपींना सोडण्याची प्रक्रिया सुरू करतात. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर आरोपीला सोडून दिले जाते.
आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे म्हणाले की, आम्हाला आशा आहे की आम्हाला उच्च न्यायालयाकडून आजच आदेश आणि रजिस्ट्रीची प्रत मिळेल. आदेशाची प्रत मिळताच आम्ही ती, एनडीपीएस न्यायालयात सादर करू. यासोबतच इतर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आर्यनला खानच्या सुटकेचे आदेश मिळतील. आर्यन खान आज संध्याकाळपर्यंत तुरुंगातून बाहेर येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
आर्यन खानला मुंबई हायकोर्टातून जामीन मिळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी हा क्षण साजरा करण्यासाठी त्याच्या बंगल्याबाहेर गर्दी केली होती. जामीन आदेशानंतर, चाहत्यांनी शाहरुख खानच्या निवासस्थान मन्नत बाहेर जमण्यास सुरुवात केली जिथे गर्दी नियंत्रित करण्यासाठी 20 पोलिस तैनात करण्यात आले होते. आर्यनला अटक झाल्यानंतर 20 दिवसांनंतर जामीन मिळाला. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अंमली पदार्थ जप्त केल्याप्रकरणी एनसीबीने आर्यनला अटक केली होती.
साक्षीदार फोडू नये, तपासात अडथळा आणू नये, परवानगी शिवाय शहराबाहेर जाऊ नये, प्रत्येक शुक्रवारी कोर्टात हजर राहावे आदी शर्तीवर त्यांना जामीन देण्यात आला आहे, असं वकिलांनी सांगितलं. मात्र, जामिनाची रक्कम अजून कळली नसल्याचं त्यांनी सांगितलं.
एनसीबीची केस अशी आहे की, आर्यनने एकप्रकारे जाणीवपूर्वक अमलीपदार्थ बाळगले होते. त्याचे अमलीपदार्थ विक्रेत्यांशी संबंध आहेत आणि अटकही वैध आहे. तो कटाचा एक भाग आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळावा अशी मागणी एनसीबीचे वकील अनिल सिंग यांनी केलीय. एनसीबीचा तपास अजून सुरु आहे. आरोपींना जामिनावर सोडलं तर ते साक्षी पुराव्यांविषयी छेडछाड करु शकतात, असा युक्तिवाद एनसीबीचे वकील अनिल सिंग यांच्याकडून करण्यात आला होता.
ड्रग्ज प्रकरणात अडकल्याने अनन्या पांडेच्या करिअरवर टांगती तलवार, ब्रँड व्हॅल्यूवरही मोठा परिणाम!