Expensive Car | अर्जुन कपूरने खरेदी केली Land Rover defender, जाणून घ्या या गाडीची किंमत…

बॉलिवूडचा सध्याचा बहुचर्चित अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याच्या घरी एक नवीन वाहन दाखल झाले आहे. त्याला आज त्याच्या नवीन गाडीसह मुंबईत स्पॉट करण्यात आले आहे.

Expensive Car | अर्जुन कपूरने खरेदी केली Land Rover defender, जाणून घ्या या गाडीची किंमत...
अर्जुन कपूर
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 1:16 PM

मुंबई : बॉलिवूडचा सध्याचा बहुचर्चित अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याच्या घरी एक नवीन वाहन दाखल झाले आहे. त्याला आज त्याच्या नवीन गाडीसह मुंबईत स्पॉट करण्यात आले आहे. अभिनेत्याने स्वत:साठी लँड रोव्हर डिफेन्डर (Land Rover Defender) ही जबरदस्त गाडी घेतली आहे. त्यातील काही खास फोटो गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलीकडेच, अभिनेता कार्तिक आर्यनने एक ‘लॅम्बोर्गिनी उरुस’ कार विकत घेतली आहे. काही दिवसांपूर्वी सैफ अली खान देखील नवीन वाहनाची टेस्ट ड्राईव्ह घेताना दिसला होता. परंतु, त्याने अद्याप कोणती कार घ्यायची हे निवडलेले नाही (Arjun Kapoor Bought Land Rover defender car).

अर्जुन कपूरच्या घराबाहेर शानदार ‘लँड रोव्हर डिफेन्डर’ पाहून चाहते देखील वेडे झाले आहेत. या वाहनाची किंमत 1 कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी अनिल कपूरने त्यांच्या वाढदिवशी पत्नी मनिता कपूर यांना मर्सिडीज बेंझ कार भेट म्हणून दिली होती. ज्याची किंमत 1 कोटींपेक्षा जास्त होती.

नुकताच अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या ‘संदीप और पिंकी फरार’ (Sandeep Aur Pinky farar) या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात अभिनेता अर्जुन कपूरसोबत परिणीती चोप्रा, रघुबीर यादव, नीना गुप्ता, अर्चना पूरनसिंग, सतीश शाह, जयदीप अहलावत यांच्यासह इतर अनेक कलाकार झळकले होते. चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

मलायकामुळे चर्चेत!

अभिनेता अर्जुन कपूर आजकाल आपल्या चित्रपटांपेक्षा मलायका अरोराशी असलेल्या नात्यामुळे जास्त चर्चेत आहेत. ते दोघे नेहमी एकत्र पार्टी करताना दिसतात. घटस्फोट झाल्यापासून मलायका अरोरा अर्जुन कपूरला डेट करत आहे. हे दोघेही नेहमी बाहेर जाताना एकत्र दिसतात. नववर्षाच्या निमित्ताने अर्जुन आणि मलायका गोव्यात धमाल करत होते. याआधीही दोघे अनेकवेळा सुटीवर एकत्र गेले होते (Arjun Kapoor Bought Land Rover defender car).

दानशूर अर्जुन

ज्या लोकांना कॅन्सरने ग्रासलं आहे, अशा 100 जोड्यांना अर्जुन कपूरने मदत करण्याचं ठरवलं आहे. कॅन्सर माणसाच्या इम्युनिटीवर खूप वाईटरित्या प्रहार करतो. परंतु, कोरोना व्हायरसच्या काळात इम्युनिटी हा घटक खूपच महत्तवपूर्ण राहिला आहे. ज्यांची इम्युनिटी फारशी चांगली नव्हती अशा लोकांसाठी कोरोनाचा काळ प्रचंड वाईट गेला, असे अर्जुन कपूर म्हणाला होता.

या विषयी सांगताना तो म्हणाला, ‘मी कॅन्सरग्रस्त लोकांना मदत करणारच आहे, परंतु समाजातल्या दानशूर लोकांनाही माझी विनंती असेल की, आपणही आपल्या ऐपतीप्रमाणे अशा गरजूंना मदत करावी. वार्षिक एक लाख रुपये देऊन त्यांच्या आर्थिक परिस्थितीला मी हातभार लावण्याचं ठरवंल आहे. जेणेकरुन ते किमोथेरेपी, रेडिओथेपरी तसंच त्यांच्या दवाखान्याचा खर्च भागवतील’, असं अर्जुन कपूरने सांगितलं.

(Arjun Kapoor Bought Land Rover defender car)

हेही वाचा :

PHOTO | क्लिनिकमध्येही पाठलाग, पापाराझींचे कॅमेरे पाहून भडकला रणबीर कपूर, पाहा फोटो…

Radhe Shyam | पाडव्याच्या मुहूर्तावर ‘राधे श्याम’चे नवे पोस्टर प्रदर्शित, ‘डार्लिंग’ प्रभासचा रेट्रो लूक पाहून चाहते घायाळ!

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.