अर्जून कपूर म्हणाला मी सिंगल, त्यावर मलायकानं दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाली…

अर्जुन कपूर यांनी स्वतःला 'सिंगल' असल्याचे म्हटल्यानंतर मलायका अरोराची प्रतिक्रिया आता समोर आली आहे.

अर्जून कपूर म्हणाला मी सिंगल, त्यावर मलायकानं दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाली...
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 27, 2024 | 10:08 PM

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झालं असलं तरी दोघेही अधूनमधून चर्चेत असतात. मलायकाचे वडील वारले तेव्हा तिच्या घरी सर्वात आधी अर्जुनच गेला होता. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आताही दोघे चर्चेत आलेत. त्याला कारण अर्जुन कपूर आहे. अर्जुनने मी सिंगल आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. मलायकासोबत इतकी वर्ष अफेयर होतं. तरीही त्याने मी सिंगल आहे, असं म्हटलंय. त्यावर आता मलायकाची प्रतिक्रिया आली नसती तर नवलंच.

सिंघम अगेनच्या प्रमोशनावेळी अर्जुन कपूरने मलायका आणि त्याच्या ब्रेकअपची गोष्ट उघड केली होती. त्यामुळे त्यांच्या फॅन्सचे हृदय तुटले होते. त्यानंतर, मलायका अरोराने तिच्या व्यक्तिगत आयुष्यातील काही गोष्टी उघड करताना, अर्जुन कपूरच्या “मी सिंगल आहे” या विधानावर उत्तर दिलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने अर्जुनला उत्तर दिलंय.

काय म्हणाली मलायका? 

माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सार्वजनिकपणे बोलायला मला आवडत नाही. मी त्याबाबत कधीच काही बोलत नाही. अर्जुनने जे म्हटले आहे, ते त्याचे मत आहे. काय बोलावं आणि काय नाही हा त्याचा अधिकार आहे, असं मलायकाने म्हटलं आहे. प्रत्येकाने पुढे जाऊन त्याच्या जीवनातील नवीन गोष्टी स्वीकाराव्यात आणि त्यासाठी नवीन वर्ष ही एक चांगली वेळ आहे, असंही तिने म्हटलंय.

मुंबईत एक इव्हेंट असताना त्याला मलायकाबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावेळी अर्जुनने नाही, मी सिंगल आहे, आणि मी चांगला आहे, असं शांतपणे आणि हसत उत्तर दिलं होतं. अर्जुन कपूर ‘सिंघम अगेन’ मध्ये एका डेंजर खलनायकाच्या भूमिकेत दिसला. त्याच्यासोबत अजय देवगण, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि करीना कपूर यांसारखे स्टार कलाकार होते. दुसरीकडे, मलायका अरोराने ‘मेरा एक नंबर’ हे आयटम साँग करून सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

चर्चेतील मलायका

मलायका नेहमीच चर्चेत असते. मुंबईत तिने एका रेस्टॉरंटचं उद्घाटन केलं होतं. त्यामुळे ती चर्चेत आली होती. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. ज्यांची तुमच्या आयुष्यात गरज नाही, अशा लोकांना आयुष्यातून काढून टाकणे हेच चांगलं गणित आहे, अशी पोस्ट तिने केली होती. त्यामुळे तिचा इशारा कुणाकडे आहे? अशी चर्चा रंगली होती. तिने अर्जुन कपूरला पुन्हा टोमणा मारल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.

सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.