Nitin Desai | बॉलिवूडला देखाव्यांचं सौंदर्य देणारा मराठी कलादिग्दर्शक हरपला

नितीन देसाईंच्या कामाची ख्याती त्यांच्यासारखीच दूरवर पसरलेली. गल्ली ते दिल्लीत भव्य देखावा म्हंटलं की देसाईच.. दिल्ली दरबारी महाराष्ट्राचा दिमाखदार देखावा साकारणारे दुसरे तिसरे कुणी नसून नितीन देसाईच होते. या

Nitin Desai | बॉलिवूडला देखाव्यांचं सौंदर्य देणारा मराठी कलादिग्दर्शक हरपला
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 11:21 PM

मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : नितीन देसाई हे कलाक्षेत्रातील मोठं नाव, नितिन देसाई यांनी स्वत:ला संपवल्याची बातमी आली आणि सर्वांनाच धक्का बसला. सिनेसृष्टीत हुबेहुब सेट उभारणारा, इतिहास डोळ्यासमोर आणणारा, हा कला दिग्दर्शक असा कसा सर्वांना सोडून गेला. कलाक्षेत्रातील दिग्दर्शनात नितीन देसाई हे नाव कितीही मोठं असलं, तरी ते कायम सर्वांशी वागले ते कॉमन मॅन सारखेच. नितीन देसाई यांचं निधन हा सिनसृष्टीसाठी मोठा धक्का आहे. ते आर्थिक विवंचनेत होते, त्यातून त्यांनी हे पाऊल उचललं असं म्हटलं जात असलं, तरी त्यांनी असं करायला नको होतं, हे सर्वांनाच वाटतंय.

नितीन देसाई यांच्या नावाने त्यांनी कर्जतला एनडी स्टुडिओ काढला. औरंगजेबच्या दरबाराचा ते हुबेहुब दृश्य एनडी स्टुडिओतलंच, ऐतिहासिक चित्रपटांसाठी एनडी स्टुडिओ वरदान ठरला. पण नितिन देसाई यांनी आत्महत्या केली ती एनडी स्टुडिओतच. नितीन देसाई आणि लालबागचा राजा यांच्यात एक मोठं नातं होतं.

जिथे आयुष्याला उभारी मिळावी म्हणून रंगमंच थाटला, आपल्याच हाताने एक एक गोष्ट सजवली तिथेच स्वतःचे जीवन संपवले. खरं तर नितीन देसाई हा जमीनीवरचा माणूस, मुंबईतील बीडीडी चाळीत मराठी मध्यमवर्गीय घरात नितीन देसाई यांचा जन्म. घरच्यांना वाटलं मुलगा डॉक्टर, इंजीनिअर होणार, पण देसाई कला क्षेत्राकडे वळले. संजय लीला भन्साळी सारख्या मोठ्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम करत असताना त्यांचं मुंबईशी असलेलं नातं त्यांनी कायम जपून ठेवलं ते लालबागच्या राजामुळे… नितिन देसाई २००८ पासून लालबागचा राजाचा भव्य सेट उभारत होते. लालबागचा राजाच्या सेटला आणखी ऐश्वर्याची चमक आणि मुंबईकरांना ती झलक दाखवली ती नितीन देसाई यांनी.

लालबागच्या राजाच्या सेवेसाठी यावर्षीही ते आणि त्यांची टीम काम करत होती. रविवारी म्हणजे ३० जुलैला त्यांनी सेटवर भेट दिली, त्यांच्या टीमला कामाची आखणी करून दिली. लालबागच्या राजाच्या मंडळातील कोणालाही वाटलं नव्हतं, देवादारी देसाईंची ही शेवटची भेट असेल. लालबागच्या राजाच्या सेटचं जवळपास 50 टक्के काम झालं असल्याची माहिती मंडळाने दिलीय, तसेच कधी न भरून काढणारी पोकळी निर्माण झाल्याचंही ते म्हणाले.

नितीन देसाईंच्या कामाची ख्याती त्यांच्यासारखीच दूरवर पसरलेली. गल्ली ते दिल्लीत भव्य देखावा म्हंटलं की देसाईच.. दिल्ली दरबारी महाराष्ट्राचा दिमाखदार देखावा साकारणारे दुसरे तिसरे कुणी नसून नितीन देसाईच होते. यावर्षी रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या देखाव्याचंही काम त्यांनी पाहिलं. त्यांनी शिवकालीन मालिकांमध्ये जबरदस्त देखाव्यामुळे जिवंतपणा आणला.. अनेक सरकारी कामाचं आयोजनदेखील देसाई करायचे, उदाहरण सांगायचं झालंय तर 2019 चा उद्धव ठाकरे यांचा शपथविधी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील टेंभीनाक्याच्या देवीचा भव्य सेटदेखील त्यांच्याच संकल्पनेतून साकारला गेला.

‘जोधा अकबर’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’ ‘प्रेम रतन धन पायो’ यांसारख्या सुपरहिट सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं. त्यांना 4 वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, तर 3 वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवलाय. त्यांनी आजवर 250 जाहिरात चित्रपट, 180 चित्रपट आणि सुमारे 100 टीव्ही शोमध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम केलंय. तसेच भारतातील सर्वात मोठा चित्रपट सेट बनवण्याचा विक्रमही त्यांच्या नावे आहे.

कामाची न संपणारी कारकीर्द, अशक्य शक्य करण्याची ताकद ठेवणारे आणि उमद्या मनाचा कलाकार आपण गमावला. नितीन देसाईंविषयी बोलताना सगळ्यांचं एक उद्गार होतं. नितीन देसाई खास होते, दिलदार होते. त्यांच्याशी बोलणं व्हायचं पण बोलतं करू शकलो नाही. त्यांना ज्या विषयावर चर्चेची गरज होती त्या विषयावर बोलू शकलो नाही. कामानिमित्तानं नितीन देसाई अनेकांच्या संपर्कात असायचे, यातले त्यांचे काही खास आवडीचेही असतील.

काही माणसं खास असतात. आपण या खास माणसांची विचारपूसही करतो. पण त्या व्यक्तीला बोलतं करायला विसरतो. कदाचित कोणी बोलतं केलं असतं तर ते मनमोकळेपणाने बोलू शकले असते. कदाचित आजचा दिवस त्यांच्यासाठी आणि सिनेसृष्टीसाठी काहीसा वेगळा असता.

अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.