मुंबई : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) जामिनावर आज (11 ऑक्टोबर) न्यायालयात सुनावणी होणार आहे. आर्यन खानचे वकील अमित देसाई, सतीश मानशिंदे आणि शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा ददलानी न्यायालयात पोहोचले आहेत. तर, दुसरीकडे एनसीबी टीम देखील न्यायालयात पोहोचण्यासाठी निघाली आहे.
न्यायालय आणि न्यायालयात उपस्थित आर्यन खानचे वकील जामीन अर्जावर एनसीबी आपला जबाब कधी दाखल करेल याची वाट पाहत आहे. आजच्या सुनावणीत आर्यन खान व्यतिरिक्त, नुपूर सारिका, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, श्रेयस नायर, अविन साहू, आचित आणि मोहक जसवाल यांच्या जामीन अर्जांवर सुनावणी होणार आहे.
ड्रग्ज प्रकरणात अडकलेला आर्यन खान सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. त्याच्या जामिनावर, त्याचे वकील गेल्या अनेक दिवसांपासून कठोर परिश्रम घेत आहेत. परंतु, प्रत्येक वेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) काही ना काही पेचात अडकवत आहे. 11 ऑक्टोबर रोजी सत्र न्यायालयात आर्यनचा जामीनही रद्द करण्यात आला. आता त्याच्या जामिनासंदर्भात काय निर्णय होईल, याची प्रत्येकजण वाट पाहत आहे.
आतापर्यंत सतीश मानशिंदे हे आर्यन खानचा खटला लढत होते, पण आता शाहरुख खानने या खटल्यासाठी ज्येष्ठ वकील अमित देसाई यांची नेमणूक केली आहे. सतीश मानशिंदे यांच्यासह 11 ऑक्टोबर रोजी सत्र न्यायालयात अमित देसाई देखील दिसले होते. आत आर्यनच्या जामिनासाठी अमित देसाई लढणार आहेत.
11 ऑक्टोबर रोजी एनसीबीने सत्र न्यायालयात आर्यनच्या जामिनाबाबत बुधवारपर्यंत वेळ मागितला होता. आर्यनचे वकील अमित देसाई आणि सतीश मानशिंदे हे दोघेही सकाळी साडेदहा वाजता न्यायालयात पोहोचले. पण एनसीबीचा खटला लढणारे विशेष सरकारी वकील ए.एम. चिमळकर म्हणाले की, तपास सुरू असल्याने पुरावे गोळा करण्यासाठी त्यांना वेळ लागत आहे. युक्तिवादानंतर न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी एनसीबीला उत्तर दाखल करण्यासाठी बुधवार, 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत वेळ दिला होता. सुनावणी दुपारी 2:45 वाजता होणार आहे.
आतापर्यंत, NCB ने या प्रकरणात अनेक लोकांची चौकशी केली आहे आणि त्यांचा तपास अजूनही सुरू आहे. 9 ऑक्टोबर रोजी एनसीबीने आर्यन खानच्या ड्रायव्हरची 12 तास चौकशी केली होती. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाने आर्यन आणि अरबाज मर्चंटला क्रूझ टर्मिनलवर सोडण्याची कबुली दिली होती. आर्यन आणि त्याच्या मित्रांच्या हालचालींबाबतही चालकाची चौकशी करण्यात आली होती.