मुंबई : तुलसीदास ज्युनियर (Toolsidas Junior) या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) नुकताच रिलीज झाला आहे. संजय दत्त (Sanjay Dutt), दिवंगत राजीव कपूर (Rajiv Kapoor), आणि बालकलाकार वरुण बुद्धदेव (Varun Buddhadev) यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 4 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांनी बॉलिवूडला अनेक दर्जेदार सिनेमे दिले. त्यांच्याच तुलसीदास ज्युनियर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा सिनेमा एका लहान मुलाच्या आयुष्यावर आधारित आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार, आशुतोष गोवारीकर आणि सुनीता गोवारीकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर मृदूल यांनी या सिनेमाची कथा लिहीली आहे. तसंच दिगदर्शनही केलं आहे. हा सिनेमा येत्या 4 मार्चला प्रदर्शित होणार आहे.
सिनेमाची कथा
तुलसीदास जुनियर हा सिनेमा एका 13 वर्षीय मुलाच्या आयुष्याभोवती फिरतो. जो स्नूकर या खेळात हा लहानगा आपल्या वडिलांच्या पराभवाचा बदला घेतो. हा सिनेमा एक या स्पोर्ट्स ड्रामा आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि आशुतोष गोवारीकर यांनी केली आहे.
प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
तुलसीदास जुनियर या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा ट्रेलर अनेकांना आवडला आहे. कुणी या चित्रपटाची कथा आवडल्याचं म्हटलंय. तर कुणाला आपल्या लाडक्या संजू बाबाची अॅक्टिंग आवडली आहे. या ट्रेलरवर 1 हजारांहून अधिक कमेंट पहायला मिळत आहेत.
दिवंगत अभिनेते राजीव कपूर यांचा अखेरचा शेवटचा सिनेमा
राजीव कपूर यांचा हा शेवटचा चित्रपट आहे. गेल्या वर्षी 9 फेब्रुवारी 2021 ला राजीव कपूर यांचं निधन झालं. राजीव कपूर हे राज कपूर यांचे पुत्र होत. राजीव कपूर यांनी ‘राम तेरी गंगा मैली’, ‘प्रेम गाथा’, ‘हीना’, ‘नाग नागिन’, ‘एक जान है हम’ आणि ‘आ अब लौट चलें’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.
संबंधित बातम्या