Backwaters : केरळमधील बेपत्ता लहान मुलाच्या रहस्यमय कथेवरील ‘बॅकवॉटर्स’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
'सनशाईन स्टुडिओ' निर्मित नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ('Backwaters' on the mysterious story of a missing child in Kerala will hit the screens soon)
मुंबई : ‘सनशाईन स्टुडिओ’ (Sunshine Studios) आता एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केरळमध्ये हरवलेल्या एका मुलावर आधारित हा हिंदी चित्रपट आहे. सनशाईन स्टुडिओ आता बाल तस्करी आणि हरवलेल्या मुलांच्या रहस्यमय जगात डोकावणाऱ्या या आशयघन आणि रहस्यमय चित्रपटाची निर्मिती करून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या थ्रिलरला ‘बॅकवॉटर्स’ (Blackwaters) हे नाव देण्यात आलं आहे. चित्रपटाचं दिग्दर्शक अभिनव ठाकूर यांनी केलं आहे. (Backwaters mysterious story)
‘सनशाईन स्टुडिओ’चं निर्मितीक्षेत्रात पदार्पण
View this post on Instagram
‘सनशाईन स्टुडिओ’ ही वितरक कंपनी पहिल्यांदाच निर्मितीक्षेत्राकडे तिचं पाऊलं उचलत आहे. तब्बल 300 हुन अधिक चित्रपटांचा अनुभव गाठीशी बांधून ही कंपनी नव्यानं निर्मिती क्षेत्राकडे वळली आहे. बॉलिवूड आणि मराठीच नव्हे तर हॉलिवूड चित्रपटांचं वितरण करून या कंपनीनं चित्रपटसृष्टीत स्वतःचा दरारा निर्माण केलाय.
केरळमध्ये हरवलेल्या मुलाची कहानी
2005 मध्ये केरळसारख्या देवांची भूमी मानल्या जाणाऱ्या शहरातून हरवलेल्या राहुल राजू या सात वर्षीय लहान मुलाचा शोध अजूनही लागलेला नाहीये, आज राहुल कुठे आहे हा प्रश्न त्याच्या पालकांना अजूनही सतावतो आहे. राहुल प्रमाणे आजही कित्येक मुलं बेपत्ता झाली असतील आणि त्यांचा शोध कशाप्रकारे घेतला जाईल यावर आधारित चित्रपट हा चित्रपट आहे. अशा चित्रपटाची निर्मिती करणं म्हणजे एक टास्कच आहे. कारण ही सिरीज म्हणजे अपहरण सारख्या गंभीर विषयात डोकावणंच आहे. मात्र अशा जिवंत घटना लोकांसमोर येणंही तितकंच आवश्यक आहे. या सिरीजमध्ये दिल्ली थिएटर अभिनेता सरताझ खरे हा सीबीआय अधिकाऱ्याच्या भूमिकेत महत्वाची भूमिका साकरणार आहे. तर युकेची मॉडेल नीता परानी ही एकाच वेळी अनेक तथ्यांच्या शोधात असणाऱ्या पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट वर्षाच्या अखेरीस केरळमधील अलाप्पूझा येथे चित्रित करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या
Jivalaga : प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा तडका, ‘जिवलगा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Indian Idol 12 : इंडियन आइडलच्या सेटवर आदित्य नारायणला मिळाली बहीण, ‘या’ कलाकाराशी जोडलं नातं