BAFTA Awards 2021 : पुरस्कार सोहळ्यात ऋषी कपूर-इरफान खानच्या आठवणींना उजाळा, प्रेक्षकही झाले भावूक!

नुकताच 72 ब्रिटीश अ‍ॅकॅडमी फिल्म अवॉर्ड्स (BAFTA Awards 2021) हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात दिवंगत अभिनेते इरफान खान (Irrfan Khan) आणि ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

BAFTA Awards 2021 : पुरस्कार सोहळ्यात ऋषी कपूर-इरफान खानच्या आठवणींना उजाळा, प्रेक्षकही झाले भावूक!
ऋषी कपूर आणि इरफान खान
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 10:31 AM

मुंबई : नुकताच 72 ब्रिटीश अ‍ॅकॅडमी फिल्म अवॉर्ड्स (BAFTA Awards 2021) हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात दिवंगत अभिनेते इरफान खान (Irrfan Khan) आणि ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मेमोरियम सेगमेंट दरम्यान या दोघांचे दोन प्रवास दाखवून त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये या दोन्ही अभिनेत्यांचे निधन झाले होते. दोघांनीही मिळालेली ही श्रद्धांजली त्यांचे चाहते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. हा क्षण शेअर करत सर्व चाहते भावूक होत आहेत. इरफानने गेल्या वर्षी 29 एप्रिलला या जगाचा निरोप घेतला होता. तो तब्बल 2 वर्ष कर्करोगाशी झुंज देत होता. इरफानच्या मृत्यूनंतर दुसर्‍याच दिवशी ऋषी कपूर यांचीही प्राणज्योत मालवली होती (BAFTA Awards 2021 special tribute to late actor Rishi Kapoor and Irrfan Khan).

या दोन कलाकारांव्यतिरिक्त जॉर्ज सेगल, सीन कॉन्नेरी, याफेट कोट्टो, बार्बरा विंडसर, ओलिवा दि, एलन पार्कर, मॅक्स वॉन, किर्क, ख्रिस्तोफर पाल्मर आणि चॅडविक बोसेमन यांनाही आदरांजली वाहिली गेली.

पाहा व्हिडीओ

‘या’ अभिनेत्रीचा विसर

त्याचवेळी, गेम्स ऑफ थ्रोन्स’ची अभिनेत्री डायना रिगचा यावेळी उल्लेख करण्यात आला नाही, यामुळे काही चाहते निराश झाले होते. तिचे नाव विसरल्यानंतर स्पष्टीकरण देताना अकादमीने ट्विट केले की, ‘आम्ही डायना रिग यांचे नाव ऑनलाईन रेकॉर्डमध्ये ठेवली आहे. आम्ही दिवंगत अभिनेत्रीचा तिच्या दमदार कार्याबद्दल गौरव करू. पुढच्या टेलिव्हिजन अवॉर्ड प्रसारणात त्यांचा नक्की सन्मान होईल.’

‘नोमाडलँड’ चित्रपटाचे दिग्दर्शक क्लो झाओ हे या सोहळ्यातील दुसरे चित्रपट निर्माते आहेत, ज्यांना या अकादमी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तसेच, या चित्रपटाने देखील बरेच पुरस्कार जिंकले आहेत. नोमडलँडची अभिनेत्री फ्रान्सिस हिला देखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटसृष्टीसाठीही पुरस्कार देण्यात आला आहे (BAFTA Awards 2021 special tribute to late actor Rishi Kapoor and Irrfan Khan).

प्रेक्षकांची अनुपस्थिती

यावर्षी, कोव्हिडमुळे या कार्यक्रमाचा रंग काहीसा फिका पडला, कारण या सोहळ्यात प्रेक्षक अनुपस्थित होते. याशिवाय अधिक सेलिब्रिटींनीही यात भाग घेतला नाही.

प्रिन्स विलियम्स हे व्हर्च्युअली या शोमध्ये सहभागी होतील, असे म्हटले जात होते. पण, शुक्रवारी त्यांचे आजोबा प्रिन्स फिलिप यांच्या निधनामुळे, ते या शोमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये बाफटाचा पहिला पुरस्कार सोहळा झाला, ज्याचे आयोजन बीबीसी रेडिओ प्रस्तुतकर्ता होते.

प्रियांकाने दाखवली बोल्ड शैली

त्याचवेळी प्रियंका आणि निक देखील या सोहळ्यात सामील झाले. यावेळी प्रियांकाने तिच्या लूकमुळे चाहत्यांची मने जिंकली. आपल्या स्टायलिश लूकचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याशिवाय अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सोहळ्याचा फोटोही शेअर केला होता.

(BAFTA Awards 2021 special tribute to late actor Rishi Kapoor and Irrfan Khan)

हेही वाचा :

Major Teaser : प्रतिक्षा संपली, ‘या’ दिवशी लाँच होणार ‘मेजर’ चित्रपटाचं टीझर

Rhea Chakraborty : ‘सबकुछ भुला दिया’, रिया चक्रवर्तीचा भूतकाळाला बाय-बाय, भविष्याचे वेध

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.