भूतानचा माजी सैनिक संगय शेल्ट्रिम सलमानचा चाहता, थेट मिळवली ‘राधे’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका!  

‘मला अजूनही आश्चर्याचा धक्का बसलेलाच आहे. ‘राधे’चा ट्रेलर सुरू झाल्यापासून मी फक्त प्रत्येक क्षणांचा आनंद घेत आहे,” असे भूतानचे माजी सैन्य अधिकारी संगय शेल्ट्रिम (Sangay Tsheltrim) सांगतात.

भूतानचा माजी सैनिक संगय शेल्ट्रिम सलमानचा चाहता, थेट मिळवली ‘राधे’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका!  
संगय शेल्ट्रिम
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 3:30 PM

मुंबई : ‘मला अजूनही आश्चर्याचा धक्का बसलेलाच आहे. ‘राधे’चा ट्रेलर सुरू झाल्यापासून मी फक्त प्रत्येक क्षणांचा आनंद घेत आहे,” असे भूतानचे माजी सैन्य अधिकारी संगय शेल्ट्रिम (Sangay Tsheltrim) सांगतात. संगय ज्यांनी ‘राधेः युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे सलमान खाननी त्यांना ही संधी दिली होती, ज्याने त्यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीचे दरवाजे उघडले. एका प्रसिद्ध वेबसाईटशी खास बातचीत करताना, भूतानमधील रहिवासी असलेल्या संगयने आपला प्रवास आणि ‘सलमान सर’ यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल सांगितले (Bhutan ex army officer Sangay Tsheltrim got role in Radhe).

आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉडीबिल्डींग स्पर्धांमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असल्याने संगय यांनी  2013मध्ये सैन्यातून ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. असंख्य पुरस्कार जिंकल्यानंतर त्यांनी आपल्या गावी जिम सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि अभिनय देखील सुरू केला. ओटीटी चित्रपटासाठी फिल्ममेकर हैदर खान यांच्याशी चर्चेसाठी संगय मुंबईत आले. एका रात्री त्यांनी संगयला सांगितले की, ते दबंगच्या सेटवर सलमान खानला भेटायला जाणार आहेत आणि त्यांना यायला आवडेल का, असेही विचारले. भूतानमध्ये देखील सलमान हा सर्वात मोठा सुपरस्टार आहे. अशा कलाकाराला व्यक्तिशः पाहणे त्यांचे स्वप्न होते. जवळपास 500हून अधिक लोकांचा एक मोठा सेट पाहून तो खूप प्रभावित झाला.

चक्क सलमानने वेळ दिला!

त्यावेळी सेटवर नाईट शूट असल्याचे संगयने सांगितले आणि सलमानने चक्क त्याला शूटिंगमधून बाजूला होता थोडा वेळ दिला. सलमाने त्याला डिनर आणि चहाची ऑफरही दिली आणि त्याने नकार दिल्यावर सलमानने “प्रोटीन शेक?” घेणार का असे देखील त्याने विचारले. सलमानने त्याच्याशी ‘फिटनेस आणि बॉडीबिल्डिंग’ या विषयावर गप्पा मारल्या. “तो बसून माझ्याशी एका तासापेक्षा जास्त वेळ बोलला. अनोळखी व्यक्तीला आदर आणि प्रेम देणं हे पाहून खूप आनंद झाला,”  असे संगय यांनी सांगितलं (Bhutan ex army officer Sangay Tsheltrim got role in Radhe).

कॉल येताच केली बॅग पॅक!

त्या भेटीनंतर दोन महिन्यांनंतर हैदर खानने पुन्हा त्याला फोन केला आणि यावेळी सलमान खानकडे त्याच्यासाठी ऑफर असल्याचे सांगितले. त्याने ताबडतोब आपल्या बॅग पॅक केल्या आणि संगय परत मुंबईला आला. त्याने सलमान आणि ‘राधे’ टीमची भेट घेतली आणि आपली भूमिका जाणून घेतली. संगयने या चित्रपटात ‘लोटा’ नावाच्या एक खलनायकाची भूमिका केली आहे, जो रणदीप हूडाच्या टोळीचा भाग आहे. या भुमिकेविषयी आणि या प्रवासाविषय सांगताना संगय म्हणतो, सलमानच्या चाहत्याला आणखी काय हवंय? आपल्या आयडॉलसोबत काम करायला मिळणं खूप भाग्याचं आहे.

(Bhutan ex army officer Sangay Tsheltrim got role in Radhe)

हेही वाचा :

Arijit Singh | प्रख्यात पार्श्वगायक अरिजीत सिंहच्या आईचे निधन, कोरोनाशी झुंज अपयशी

मांजरेकर, दामले, कोठारेंसह 50 दिग्गज कलाकारांशी चर्चा, राज ठाकरे म्हणाले, तुमच्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत नेतो

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...