Big Investment | अमिताभ बच्चन बनणार सनी लिओनीचे शेजारी, मुंबईत खरेदी केले 31 कोटींचे घर!

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अभिनयाप्रमाणेच गुंतवणूकीतही आघाडीवर आहेत. बिग बींनी अलीकडेच पुन्हा एकदा मुंबईत एक मोठे आलिशान घर विकत घेतले आहे, जे आता चर्चेत विषय बनले आहे.

Big Investment | अमिताभ बच्चन बनणार सनी लिओनीचे शेजारी, मुंबईत खरेदी केले 31 कोटींचे घर!
सनी लिओनी, अमिताभ बच्चन
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 6:15 PM

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अभिनयाप्रमाणेच गुंतवणूकीतही आघाडीवर आहेत. बिग बींनी अलीकडेच पुन्हा एकदा मुंबईत एक मोठे आलिशान घर विकत घेतले आहे, जे आता चर्चेत विषय बनले आहे. अमिताभ बच्चन यांनी मुंबईत तब्बल 5,184 चौरस फुटांचे नवीन घर 31 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. क्रिस्टल ग्रुप प्रोजेक्टमध्ये महानायकाने ही नवीन प्रॉपर्टी विकत घेतली आहे. Zapkey.comच्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन गेल्या बऱ्याच दिवसांपासून स्वत:साठी चांगला गुंतवणूक पर्याय शोधत होते. मात्र, आता त्यांचा हा शोध आता संपला आहे (Big Investment Amitabh Bachchan bought 31 cr flat in Mumbai).

आपली वार्षिक संपत्ती आणि मानधनामुळे अमिताभ बच्चन चर्चेत असतात. या वयातही ते अतिशय उत्साहाने काम करताना दिसतात. आता देखील त्यांच्या हातात अनेक प्रोजेक्ट्स असून, ते कामात पूर्णपणे व्यस्त आहेत.

कसं आहे महानायकाचं घर?

2020च्या डिसेंबर महिन्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी ही संपत्ती विकत घेतली आहे. मात्र, एप्रिल 2018मध्येच त्यांनी ही मालमत्ता नोंदवली होती. त्यावेळी अभिनेत्याने घरासाठी 2 टक्के मुद्रांक शुल्क भरले होते आणि 62 लाख रुपये देखील भरले होते. अमिताभ बच्चन यांच्या या मालमत्तेची प्रति चौरस फूट किंमत सुमारे 60,000 रुपये प्रति चौरस आहे. या मालमत्तेत अमिताभ बच्चन यांना सहा कार पार्किंग मिळाल्या आहेत. त्यांचे नवीन घर 27 आणि 28 व्या मजल्यावर आहे (Big Investment Amitabh Bachchan bought 31 cr flat in Mumbai).

सनी लिओनी बनणार शेजारी

लॉकडाऊन दरम्यान, मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणार्‍यांची मागणी वाढत असल्याचे दिसते आहे. इतकेच नाही तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अमिताभ बच्चनच्या या इमारतीत अभिनेत्री सनी लिओनीचेही घर असणार आहे. सनी लिओनीने या इमारतीच्या 12 व्या मजल्यावर स्वत:साठी नवीन घर घेतले आहे. जिथे ती आपल्या कुटूंबियांसमवेत राहायला येणार आहे. अभिनेत्रीच्या या घराची किंमत तब्बल 16 कोटी रुपये आहे.

आनंद एल. राय यांची देखील गुंतवणूक!

त्याचबरोबर बॉलिवूड चित्रपटांचे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आनंद एल राय यांनीही या संपत्तीत आपले पैसे गुंतवले आहेत. दिग्दर्शकानेही स्वत:साठी एक डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. या घराची एकूण किंमत 25 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. ही सर्व घरे अद्याप बांधली गेलेली नाहीत, परंतु लवकरच त्यांच्यावर काम सुरू होईल, या इमारतीत केवळ 34 घरे असतील. ज्यामध्ये मुंबईतील उच्चभ्रू लोक स्थायिक होताना दिसतील.

(Big Investment Amitabh Bachchan bought 31 cr flat in Mumbai)

  हेही वाचा :

नाते नव्हे, देश आणि धर्म पहिला! मायदेशाची थट्टा केल्याने अभिनेत्रीने थेट मोडले लग्न

‘पीएम नरेंद्र मोदी’ फेम संदीप सिंह बनवणार ‘स्वातंत्रवीर सावरकरां’वर चित्रपट, महेश मांजरेकर सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.