एवढे सुपरहिट सिनेमे देणाऱ्या अक्षय कुमारला त्याचा कोणता सर्वात जास्त सिनेमा आवडतो?

Actor Akshay Kumar on His Favorite Movie : अभिनेता अक्षय कुमार याने एकाहून एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. या सिनेमांमधील अक्षय कुमारचा आवडता सिनेमा कोणता? या सगळ्या सिनेमांमधून अक्षयला कोणता सिनेमा अधिक प्रिय आहे? याबाबत तो बोलता झाला. वाचा सविस्तर...

एवढे सुपरहिट सिनेमे देणाऱ्या अक्षय कुमारला त्याचा कोणता सर्वात जास्त सिनेमा आवडतो?
अक्षय कुमार, अभिनेताImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jul 09, 2024 | 8:08 PM

अक्षय कुमार बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीतील मोठं नाव… अक्षय कुमारने आजवर अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण इतके सुपरहिट सिनेमे करणाऱ्या अक्षयला त्याचा कोणता सिनेमा आवडला? यावर अक्षय कुमारने भाष्य केलं आहे. येत्या 12 जुलैला अक्षय कुमारचा ‘सरफिरा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं अक्षय प्रमोशन करतो आहे. दिल्ली आणि पुण्यात त्याने या सिनेमाचं प्रमोशन केलं. शहरांमध्ये काही खास स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा त्याने त्यांच्या आवडत्या सिनेमावर भाष्य केलं.

अक्षयचा आवडता सिनेमा कोणता?

‘सरफिरा’ हा माझा 150 वा चित्रपट आहे आणि हा माझा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. मला हा चित्रपट आणि त्यात भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल मी सुधाचा खूप आभारी आहे, असं अक्षय कुमार म्हणाला. ‘सरफिरा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनवेळी अक्षयने ‘सरफिरा’ सर्वोत्कृष्ट चित्रपट असल्याचं आणि त्याला आवडल्याचं म्हटलं आहे.

ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती

‘सरफिरा’ सिनेमांचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. . ‘सरफिरा’ चित्रपटाने सर्वात उत्कंठावर्धक चित्रपट म्हणून आयएमडीबीच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. इंडियन 2 आणि बॅड न्यूज या चित्रपटांना मागे टाकत पाहिले स्थान पटकावलं आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला ‘सरफिरा’चा ट्रेलर यूट्यूबवर रिलीज झाल्याच्या 24 तासात सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपटाचा ट्रेलर ठरला आहे.

‘सरफिरा’ हा जीआर गोपीनाथ यांच्या खऱ्या जीवनातील कथेवर आधारित आहे. ज्यांनी सर्वसामान्यांसाठी किफायतशीर विमान वाहतूक शक्य केली. सुधा कोंगारा दिग्दर्शित हा चित्रपट 5 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सूरराई पोत्रू या चित्रपटाचं अधिकृत रूपांतर आहे. सुधा आणि शालिनी उषादेवी संवाद यांनी लिहिले आहेत. पूजा तोलानी आणि जी.व्ही. प्रकाश कुमार यांनी संगीतबद्ध केलंय. तर चित्रपटाची निर्मिती केप ऑफ गुड फिल्म्सच्या अरुणा भाटिया यांनी केलीय. दक्षिण सुपरस्टार सूर्या आणि ज्योतिका आणि विक्रम मल्होत्रा यांनी केली आहे. येत्या 12 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाबद्दल अक्षयच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.