Deepika Padukon : दीपिकाची कान्स फेस्टिव्हलची ज्युरी मेंबर म्हणून निवड, रणवीर म्हणतो, “अपना टाईम कब आयेगा?”
काही दिवसांपूर्वी 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरी मेंबर्सच्या यादी जाहीर झाली. या ज्युरी मेंबर्समध्ये दीपिकाच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे या प्रतिष्ठेच्याच्या सोहळ्यात दीपिकाला मिळालेल्या मानाच्या पानाचं सध्या सर्वत्र कौतुक होतंय.
मुंबई : कान्स फिल्म फेस्टिव्हल (75th Cannes Film Festival) या प्रतिष्ठेच्याच्या सोहळ्यात आपल्यालाही मानाचं पान असावं, अशी अनेकांची इच्छा असते. त्याचा भाग होता यावं, या फेस्टिवलचा माहौल अनुभवता यावा अशी अनेकांची इच्छा असते. अनेक कलाकार या फेस्टिव्हलकडे डोळे लावून बसलेले असतात. याच मानाच्या फेस्टिव्हलच्या ज्युरी मेंबर्सच्या यादी जाहीर झाली. यंदाच्या या यादीत बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणचं (Deepika Padukon) नाव आहे. तिने कष्टाने मिळवलेल्या या सन्मानाचं सर्वत्र कौतुक होतंय. पण या सगळ्यात तिचा पती रणवीर सिंहची (Ranveer Singh) प्रतिक्रिया दिली असेल याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. याचं उत्तर आता मिळालंय. रणवीरने तिचं तोंडभरून कौतुक तर केलंय. शिवाय एक प्रश्न उपस्थित तेला आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
दीपिकाला कान्समध्ये मानाचं पान!
काही दिवसांपूर्वी 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरी मेंबर्सच्या यादी जाहीर झाली. या ज्युरी मेंबर्समध्ये दीपिकाच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे या प्रतिष्ठेच्याच्या सोहळ्यात दीपिकाला मिळालेल्या मानाच्या पानाचं सध्या सर्वत्र कौतुक होतंय.
View this post on Instagram
रणवीर काय म्हणाला?
अभिनेता रणवीर सिंहने यावर दिलेल्या प्रतिक्रियेची सध्या जोरदार चर्चा आहे. “जेव्हा मला कळालं की कान्स फिल्म फेस्टिव्हलची ज्युरी मेंबर म्हणून दीपिकची निवड झाली आहे. तेव्हा मी आनंदानं नाचायला लागलो. मला खूप आनंद झाला. मला याचा अभिमान आहे की माझी बायको आता चित्रपटांचं परिक्षण करणार आहे. यातल्या चांगल्या बाजू आणि चुका यांचं निरिक्षण करून ती त्यापैकी काही चित्रपटांची निवड करणार आहे. हा किती गौरवाचा क्षण आहे. मला याचा सार्थ अभिमान आहे. शिवाय मी खूप जास्त आनंदी आहे. या सगळ्या जल्लोषानंतर मी विचार केला की यारमाझा नंबर कधी येणार? मला ते कधी ज्युरी करतील? मला त्यांनी कधी आमंत्रण दिलं जाईल, अपना टाईम आयेगा लेकीन कब? असं माझ्या मनात येऊन गेलं. पण बघू योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील. त्यामुळे वेट अॅन्ड वॉच!”