शाहरूख खानचा Dunki सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?; वाचा सविस्तर…
Bollywood Actor Shah Rukh Khan movie Dunki will be released on OTT platform : बॉलिवूडचा किंग खान याचा सुपरहिट सिनेमा लवकरच ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. डंकी ही शाहरूखचा सिनेमा लवकरच ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल, वाचा...
मुंबई | 06 फेब्रुवारी 2024 : 21 डिसेंबर 2023 ला एक सिनेमा आला, ज्याने कोट्यावधींची कमाई केली. हा सिनेमा होता डंकी. बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याचा हा सिनेमा मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगली कमाई केली. या सिनेमातील गाण्यांना लोकांनी डोक्यावर घेतलं. शाहरूख खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शाहरूखचा डंकी हा सिनेमा आता ओटीटीवर येणार आहे. लवकरच हा सिनेमा ओटीटीवर पाहायला मिळणार असल्याची माहिती आहे.
डंकी ओटीटीवर येण्याची शक्यता
डंकी सिनेमाची कथा वेगळी होती. या सिनेमाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. थिएटरमध्ये जात लोकांनी सिनेमाला गर्दी केली. आता घरबसल्या तुम्ही हा सिनेमा पाहू शकणार आहात. कारण आता हा सिनेमा ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.येत्या नऊ फेब्रुवारीला हा सिनेमा ओटीटीवर येणार असल्याची माहिती आहे. जिओ या सिनेमाने या सिनेमाचे डिजीटल राईट्स खरेदी केल्याची माहिती आहे.
एक हजार कोटींची कमाई करणारा पठाण हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली. जवान हा सिनेमा नेटफ्लिक्सवर आहे. तर आता डंकी सिनेमा लवकरच ओटीटीवर येणार असल्याची माहिती आहे. या सिनेमाचे डिजिटल राईट्स जिओ सिनेमाकडे असल्याची माहिती आहे. शाहरूख खानचा हा सिनेमा लोकांच्या पसंतीला उतरला. या सिनेमात अभिनेत्री तापसी पन्नू, विकी कौशल या सारखी स्टारकास्ट आहे. डंकी मार्गाने परदेशात जाणाऱ्या लोकांवर आधारित हा सिनेमा आहे. हा सिनेमा आता ओटीटीवर येणार असल्याची माहिती आहे.
बॉक्स ऑफिसवर चाललेले सिनेमे ओटीटीवर
9 फेब्रुवारीला आणखीही काही सिनेमे ओटीटीवर पाहायला मिळणार आहेत. अभिनेता महेश बाबू याचा गुंटूरू कारम हा सिनेमा ओटीटीवर येणार आहे. तर धनुषचा कॅप्टन मिलर हा सिनेमाही ओटीटीवर येणार आहे, आता किंग खानचा डंकी हा सिनेमाही ओटीटीवर येणार असल्याची चर्चा आहे. प्रभासचा सलार हा सिनेमाही नेटफ्लिक्सवर आला. पण आता शाहरूख खानचा डंकीदेखील ओटीटीवर येणार असल्याची माहिती आहे.