Mira Rajput | आलिया-दीपिका नव्हे सोशल मीडियावर मीरा राजपूतची चर्चा, ‘स्विमसूट’मध्ये बोल्ड अंदाजात दिसली शाहिदची पत्नी!

र्वी मीरा सोशल मीडियावर फारशी अ‍ॅक्टिव नव्हती, आता मात्र ती तिचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यापूर्वीही मीराने आपल्या ग्लॅमरस स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

Mira Rajput | आलिया-दीपिका नव्हे सोशल मीडियावर मीरा राजपूतची चर्चा, ‘स्विमसूट’मध्ये बोल्ड अंदाजात दिसली शाहिदची पत्नी!
मीरा राजपूत-शाहिद कपूर
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 11:58 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) याची पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) मनोरंजन क्षेत्रा सक्रिय नसली, तरी ती हळूहळू या इंडस्ट्रीच्या रंगात रंगत आहे. पूर्वी मीरा सोशल मीडियावर फारशी अ‍ॅक्टिव नव्हती, आता मात्र ती तिचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यापूर्वीही मीराने आपल्या ग्लॅमरस स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि आता नुकताच मीराने एक हॉट फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे सोशल मीडिया तिची चर्चा सुरु झाली आहे (Bollywood Actor Shahid Kapoor Wife Mira Rajput share bold photo on social media).

वास्तविक मीराने तिचा स्विमसूट मधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मीराची ही स्टाईल पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत. मीरा सध्या आपल्या बोल्ड लूकने बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींना तगडी स्पर्धा देत आहे. या फोटोत मीरा खूप फिट आणि हॉट दिसत आहे. सध्या मीरा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी, पती शाहिद कपूरसमवेत जिममध्ये जाऊ लागली आहे. तथापि, आता कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हे दोघेही घरीच वर्कआऊट करतात.

पाहा मीरा राजपूतचा बोल्ड अंदाज

यापूर्वी शाहिद कपूरने त्याचाही एक फोटो शेअर केला होता, ज्यात तो पूलमध्ये दिसला होता. या दोघांच्या पोस्टवरून असे दिसते की, पती-पत्नी दोघेही सध्या सुट्टीचा आनंद घेत आहेत आणि दोघेही या व्हेकेशन ट्रीपचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत आहेत.

पाहा शाहिद कपूरचा फोटो

 (Bollywood Actor Shahid Kapoor Wife Mira Rajput share bold photo on social media)

यापूर्वी दोघांनीही होळीच्या सणाला धमाल मस्ती केली होती. इतकेच नाही तर, शाहिदने मीराबरोबरचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघे एकमेकांवर रंगांची उधळण करताना दिसले होते. दोघांचाही हा व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.

मीरा आणि शाहिदच्या लग्नाला 6 वर्ष झाली आहेत. दोघांनाही एक मुलगी ‘मिशा’ आणि एक मुलगा ‘जैन’, अशी दोन अपत्ये आहेत. शाहिद एक परिपूर्ण फॅमिली मॅन आहे. जेव्हा जेव्हा त्याला कामातून मोकळा वेळ मिळतो, तेव्हा तो कुटुंबासमवेत वेळ घालवतो. शाहिदला बाहेर पार्टी करायला आवडत नाही. तो अधिकाधिक वेळा मीराबरोबरच लंच किंवा डिनरला जातो.

‘जर्सी’तून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

शाहिद कपूरच्या व्यावसायिक जीवनाविषयी बोलायचे तर, तो लवकरच ‘जर्सी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो एका क्रिकेटरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात शाहिदसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि अभिनेते पंकज कपूर दिसणार आहेत. शाहिदने सराव सत्राचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

‘जर्सी’ ही एक अशा व्यक्तीची कहाणी आहे, जो खूप हुशार आहे, परंतु अयशस्वी क्रिकेटपटू आहे. हा चित्रपट ‘जर्सी’ या तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. शाहिदचा हा चित्रपट यंदा दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.

(Bollywood Actor Shahid Kapoor Wife Mira Rajput share bold photo on social media)

हेही वाचा :

Kapil Sharma | कपिल शर्माच्या मुलाचं नाव ऐकलंत का? ‘या’ नावाचा ‘विजया’शी आहे खास संबंध!

Happy Birthday Rashmika Mandanna | ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदनाचेही तुटले होते हृदय, ‘या’ अभिनेत्यासोबत मोडला साखरपुडा!

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.