मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) तिच्या अभिनयाने सर्वांचीच मनं जिंकते. तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होतं. तिने विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. तिने ऐतिहासिक भूमिका केल्या ज्या लोकप्रिय ठरल्या. यातली बाजीराव मस्तानी (Bajirao Mastani) सिनेमातील मस्तानी ही भूमिका आजही दीपिकाच्या नावाबरोबर डोळ्यासमोर उभी राहते. राणी पद्मावती (Padmavati) या भूमिकेनेही अनेकांची मनं जिंकली. तसंच तिची कॉकटेल (Cocktail) सिनेमातील भूमिका वेगळी होती. छपाक (Chhapak) सिनेमातील तिची भूमिकाही अनेकांना भावली. आता नुकतंच तिचा गेहराईयाँ (gehrayiya) हा सिनेमा आला यातली तिची बोल्ड भूमिका अनेकांना आश्चर्याचा धक्का देऊन गेली. पण अश्या विविध भूमिका साकारणारी दीपिका वैयक्तिक आयुष्यातही विविध गोष्टी करत असते. तिने नुकतंच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. तिने वयाच्या 12 व्या वर्षी लिहीलेली कविता (Poetry) पोस्ट केली आहे. तिच्या या कवितेवर अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दीपिका पदुकोणने इयत्ता सातवीत असताना पहिली कविता लिहिली. त्यावेळी ती केवळ 12 वर्षांची होती. दीपिकाच्या या कवितेचं नाव I Am आहे.ही कविता तिने आज इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. याला तिने “कविता लिहिण्याचा माझा पहिला आणि शेवटचा प्रयत्न! ही कविता मी इयत्ता 7 वीत असताना लिहिली. मी 12 वर्षांची होते. कवितेचं शीर्षक होतं ‘I Am’ पहिले दोन शब्द महत्वाचे… बाकी सर्व इतिहास आहे!”, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. दीपिकाची ही पोस्ट व्हायरल होत आहे.
दीपिकाच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहेत. तिच्या एका चाहत्याने लिहिले आहे की “तू 36 वर्षांची आहेस आणि तरीही तू लहान मुलीसारखीच आहेस.” दुसरीकडे, दीपिकाने वयाच्या बाराव्या वर्षी कविता लिहिल्याचं पाहून अनेकांना धक्का बसला आहे.दीपिकाच्या या पोस्टला लाखो लोकांनी लाईक केले असून अनेकांनी तिच्या प्रतिभेचं कौतुक केलं आहे.
दीपिका ही हरहुन्नरी कलाकार आहे. ती एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच बॅडमिंटनपटू देखील आहे. आता दीपिकाने तिच्या चाहत्यांना आणखी एक टॅलेंट दाखवून दिलं आहे.
संबंधित बातम्या