मी महिन्यात दोन किंवा तीनवेळा…’; बॉयफ्रेंडबद्दल जान्हवी कपूर हे काय बोलून गेली
जान्हवी कपूर हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना जान्हवी कपूर ही दिसलीये. पहिल्यांदाच जान्हवी कपूर ही आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलली.
अभिनेत्री जान्हवी कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. जान्हवी कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. मात्र, म्हणावा तसा धमाका करण्यात जान्हवी कपूरच्या चित्रपटांना यश मिळत नाहीये. जान्हवी कपूर ही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात धमाल करताना दिसली. अनंत अंबानीच्या लग्नातील जान्हवी कपूरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले. एका व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर ही बॉयफ्रेंड शिखर पहाडिया याच्यासोबत खास डान्स करताना दिसली. अनंतच्या लग्नातील जान्हवीच्या लूकचीही चर्चा जोरदार रंगताना दिसली.
जान्हवी कपूर ही गेल्या काही वर्षांपासून शिखर पहाडिया याला डेट करत आहे. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचे फोटो आणि व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी सर्वांच्या गुपचूप साखरपुडा केल्याचे सांगितले जात होते. बोनी कपूर आणि शिखर पहाडिया हे काही दिवसांपूर्वीच विमानतळावर स्पॉट झाले. जान्हवी कपूर हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना जान्हवी कपूर ही दिसलीये. पहिल्यांदाच जान्हवी कपूर ही आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसली. जान्हवी कपूर म्हणाली की, महिन्यातून एकदा मी बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप करत असते. तसे मी एकदाच मनापासून दु:खी झाले आणि माझं हर्टब्रेक एकदाच झालेलं.
मी महिन्यातून एकदा बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप करते. दोन तीन दिवस बोलायचे नाही आणि रडत बसायचे. परत त्याला सॉरी म्हणत त्याच्याकडे जायचे. विशेष म्हणजे तो सुद्धा ठीक आहे म्हणत परत येतो. जान्हवी कपूरच्या या विधानाची जोरदार चर्चा होत आहे. मात्र, जान्हवी कपूरने जे सांगितले ते शिखर पहाडिया याच्याबद्दल होते की, इतर कोणाबद्दल हे समजू शकले नाही.
जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना जान्हवी कपूर दिसते. जान्हवी कपूर हिला काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. जान्हवी कपूर हिच्यावर उपचार सुरू होते. आपल्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी कपूर ही दिसत आहे. जान्हवी कपूर मोठ्या संपत्तीची मालकीन आहे.