Russia Ukraine War : युक्रेनमधल्या शरणार्थींबाबत प्रियांका चोप्राचं जगभरातील नेत्यांना आवाहन, म्हणाली…

प्रियांकाने एक व्हीडिओ शेअर केला आहे. यात ती जगभरातील नेत्यांना आवाहन एक करताना दिसत आहे. युक्रेनमधून इतर देशात आलेल्या लोकांना मदत करण्याचं आवाहन ती व्हिडिओमधून करत आहे.

Russia Ukraine War : युक्रेनमधल्या शरणार्थींबाबत प्रियांका चोप्राचं जगभरातील नेत्यांना आवाहन, म्हणाली...
प्रियांका चोप्रा
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 8:57 AM

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती विविध मुद्द्यांवर भाष्य करताना दिसून येते. सध्या तिने सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केलाय. यात ती रशिया यु्क्रेन युद्ध (Russia Ukraine War) आणि त्यानंतरच्या परिस्थितीवर भाष्य करत आहे. यात ती जगभरातील नेत्यांना आवाहन एक करताना दिसत आहे. युक्रेनमधून इतर देशात आलेल्या लोकांना मदत करण्याचं आवाहन ती व्हिडिओमधून करत आहे. प्रियांकाला युक्रेनमधून एतर देशात आलेल्ये शरणार्थींना मदत करण्याचं आवाहन करत आहे. त्यासाठी तिने जगभरातील नेत्यांना गळ घातलीये. तिच्या या व्हीडिओवर अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिचं कौतुक केलं आहे.

प्रियांकाचं जगभरातील नेत्यांना आवाहन

प्रियांका चोप्राने जागतिक नेत्यांना रशिया-युक्रेन संघर्षामुळे उद्भवलेल्या संकटाला हाताळण्यास मदत करण्याचं आवाहन केलं आहे. प्रियांका म्हणाली की, “जगभरातील नेतेहो, मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करते की आपल्या सगळ्यांच्या मदतीची युक्रेनला गरज आहे. आपण कृपया मदत करावी. पूर्व युरोपात आपण पाहत असलेल्या मानवतावादी आणि निर्वासित संकटाला पाठिंबा देण्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. युक्रेन आणि जगभरातील विस्थापित लोकांना मदत करण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर पावलं उचलावीत, अशी आमची इच्छा आहे.”

पुढे प्रियांकाने युक्रेनच्या शरणार्थींची कैफियत सांगितली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव युक्रेनमधल्या वीस लाखांहून अधिक मुलांना आपल्या सर्वस्वाचा त्याग करत देश सोडावा लागला आहे. “एकट्या युक्रेनमध्ये 2.5 दशलक्ष मुले विस्थापित झाली असून, दुसऱ्या महायुद्धानंतर मुलांचे हे सर्वात मोठे आणि जलद विस्थापन आहे.या मुलांना आपल्या मदतीची गरज आहे आपण सगळ्यांनीच त्यांना मदत करत त्यांना या संकटात साथ दिली पाहिजे”, असं प्रियांका म्हणाली आहे. “या लहान मुलांनी जे पाहिलं, अनुभवलं त्यानंतर त्यांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला.त्यामुळे मी माझ्या चाहत्यांनाही विनंती करते की तुम्हीही तुमच्या परीने होईल तितकी त्यांमा मदत करा”, असंही प्रियांका म्हणाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकाच्या या व्हीडिओवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी या विषयावर बोलल्याबद्दल तिचं कौतुक आणि अभिनंदन केलं आहे. तर काहींनी आम्ही जरूर मदत करू असं प्रियांकाला आश्वासन दिलं आहे.

संबंधित बातम्या

Ayesha Takia Birthday : बॉलिवूडची क्यूट गर्ल आयेशा टाकियाचा वाढदिवस, जाणून घ्या तिच्याविषयी…

Photo Gallery | थोबाडीत मारणे भोवले..! अभिनेता विल स्मिथवर पुढील10 वर्षांसाठी Oscars ने घातली बंदी

Photo gallery | हाय गर्मी…. मौनी रॉयच्या फोटोंनी वाढवली चाहत्यांच्या हृदयाची धडधड

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.