Breakup Story | विवाहित अभिनेत्यावर भाळली होती तब्बू, अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ‘या’ कारणामुळे तुटले नाते!

बॉलिवूड स्टार्स बर्‍याचदा आपल्या सहकलाकरांच्या प्रेमात पडतात. या जोड्यांच्या प्रेमाची बरीच चर्चाही होते. परंतु, बर्‍याच वेळा प्रेमात पडल्यानंतर काही काळाने या कलाकारांना ब्रेकअपची वेदना सहन करावी लागत आहे. या यादीमध्ये अभिनेत्री तब्बू (Tabu) हिचा देखील समावेश आहे.

Breakup Story | विवाहित अभिनेत्यावर भाळली होती तब्बू, अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ‘या’ कारणामुळे तुटले नाते!
तब्बू-नागार्जुन
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 9:46 AM

मुंबई : बॉलिवूड स्टार्स बर्‍याचदा आपल्या सहकलाकरांच्या प्रेमात पडतात. या जोड्यांच्या प्रेमाची बरीच चर्चाही होते. परंतु, बर्‍याच वेळा प्रेमात पडल्यानंतर काही काळाने या कलाकारांना ब्रेकअपची वेदना सहन करावी लागत आहे. या यादीमध्ये अभिनेत्री तब्बू (Tabu) हिचा देखील समावेश आहे. कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या तब्बूच्या हृदयावर मात्र दक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन (Nagarjuna) याने जवळपास 10 वर्षे राज्य केले. परंतु, यानंतर ते दोघे वेगळे झाले (Breakup Story of Actress Tabu and south superstar Nagarjuna).

तब्बू आणि नागार्जुन दोघेही त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. एक काळ असा होता की, तब्बूचे हृदय आधीच विवाहित असलेल्या नागार्जुनवर भाळले होते. दोघांचे हे नाते देखील खूप चर्चेत होते. मात्र, इतक्या वर्षांच्या प्रेमानंतरही दोघांचे नाते यशस्वी होऊ शकले नाही आणि त्यांना ब्रेकअपची वेदना सहन करावी लागली.

विवाहित नागार्जुन भाळली तब्बू!

प्रेमाच्या बाबतीत तब्बू नेहमीच अपयशी ठरली होती. एक वेळ अशी आली होती की, जेव्हा तिचे मन विवाहित साऊथ स्टार अक्किनेनी नागार्जुनवर आले होते. नागार्जुन आणि तब्बूचे अफेअर सुमारे 10 वर्षे चालले. मात्र, या दोघांनी कधीही त्यांच्या नात्यावर उघडपणे चर्चा केले नाही. त्यांच्या अफेअरच्या बातम्या बऱ्याच चर्चेत आल्या होत्या, दोघेही बर्‍याच वेळा एकत्र दिसले होते.

दोघांची पहिली भेट

नागार्जुन आणि तब्बूची भेट Ninne Pelladata या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. यावेळी ते दोघे केवळ कामाच्या संदर्भात भेटले. पण हळूहळू दोघे एकमेकांच्या अगदी जवळ आले. असे म्हणतात की, जेव्हा त्यांचे अफेअर सुरू झाले, तेव्हा अभिनेत्याच्या पत्नीला याची कल्पना नव्हती. पण हळूहळू जेव्हा त्यांच्या प्रेमाच्या चर्चा वाढल्या, तेव्हा ही बातमी सर्वांसोबतच त्यांच्या कानांवर देखील गेली (Breakup Story of Actress Tabu and south superstar Nagarjuna).

नागार्जुनच्या जवळ राहण्यासाठी हैदराबादमध्ये खरेदी केले घर

दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते की, बर्‍याचदा तब्बू हैदराबादला अभिनेत्याला भेटायला जात असे, मग नागार्जुनसुद्धा त्याला मुंबईत भेटायला येत असे. इतकेच नाही तर, मुंबईत काम सुरु असताना देखील नागार्जुनबरोबर वेळ घालवण्यासाठी तिने हैदराबादमध्ये घर खरेदी केले. नागार्जुनचे तब्बूवर खूप प्रेम होते, पण पत्नीला सोडून जाण्याची त्यांची इच्छा नव्हती. म्हणूनच तब्बूने नागार्जुनपासून स्वत:ला दूर केले. असे म्हटले जाते की, या दोघांचा 2012मध्ये ब्रेकअप झाला होता.

नागार्जुन आणि आमला नागार्जुन यांचे वक्तव्य

नागार्जुनने ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तब्बू नेहमीच त्याची एक चांगली ‘मैत्रीण’ राहील. अभिनेत्याने तब्बूला स्वतःची केवळ एक चांगली मैत्रीण म्हणून वर्णन केले. इतकेच नाही तर, नागार्जुनची पत्नी अमला अक्केनेनी हिने देखील तिच्या पतीचे तब्बूशी असलेले संबंध केवळ अफवा असल्याचे म्हटले होते. तिनेही टीओआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तब्बू आणि तिचा नवरा खूप चांगले मित्र आहेत. तथापि, तब्बूने देखील कधीही त्यांच्या प्रेम आणि ब्रेकअपबद्दल काहीही सांगितले नाही. चाहत्यांना असेही वाटते की, नागार्जुनमुळे तब्बूने आजपर्यंत कोणाशीही लग्न केले नाही.

(Breakup Story of Actress Tabu and south superstar Nagarjuna)

हेही वाचा :

Video | ‘शेरनी’मध्ये विद्या बालन दिसणार धडाकेबाज वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत, पाहा जबरदस्त टीझर

कंगना रनौतच्या वैयक्तिक अंगरक्षकाला बेड्या, लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण आणि फसवणूक केल्याचा आरोप

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.