महाराष्ट्रातील ‘नाईट कर्फ्यू’चा ‘सायना’च्या कमाईवर परिणाम! बिग बींचा ‘चेहरे’ लांबणीवर पडणार?
देशभरात पुन्हा कोरोनाची प्रकरणे (Corona Virus) वाढू लागली आहेत. दररोज हजारो लोक या विषाणूला बळी पडत आहेत. महाराष्ट्रात दररोज कोरोना केसेस झपाट्याने वाढत आहेत.
मुंबई : देशभरात पुन्हा कोरोनाची प्रकरणे (Corona Virus) वाढू लागली आहेत. दररोज हजारो लोक या विषाणूला बळी पडत आहेत. महाराष्ट्रात दररोज कोरोना केसेस झपाट्याने वाढत आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सही गेल्या काही दिवसांत या विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता काही निर्मात्यांनी आगामी चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बंटी और बबली’, ‘डी कंपनी’, ‘हाथी मेरे साथी’ यासारख्या चित्रपटांचे प्रकाशन पुढे ढकलण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणाचा फटका शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या ‘सायना’ या चित्रपटावर दिसला आहे (Corona Night curfew will affect on box office Amitabh bachchan starrer chehre release will postpone).
बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा बायोपिक ‘सायना’ शुक्रवारी रिलीज झाला आहे. पण कोव्हिडच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा प्रभाव त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाला आहे. आता महाराष्ट्रातही 15 एप्रिलपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रिलीज होणाऱ्या अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांचा चित्रपट ‘चेहरे’ देखील प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे सध्या हा चित्रपट पुढे ढकलला जाण्याची शक्यता वर्वण्यात येत आहे.
निर्मात्यांना चित्रपट फ्लॉप होण्याची भीती!
अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मीचा चित्रपट ‘चेहरे’ 9 एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. पण आता निर्मात्यांनी या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा विचार केला आहे. स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, चित्रपटाचे निर्माता आनंद पंडित म्हणाले की, ‘होळीनंतर आम्ही संबंधितांशी चर्चा करू आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत निर्णय घेऊ’ (Corona Night curfew will affect on box office Amitabh bachchan starrer chehre release will postpone).
गूढ-थ्रिलर चित्रपट
‘चेहरे’ हा एक गूढ-थ्रिलर चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन रूमी जाफरी यांनी केले आहे. या वर्षाचा सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपट म्हणून ‘चेहरे’चे नाव घेतले जात आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी व्यतिरिक्त अन्नू कपूर, क्रिस्टल डिसूझा, धृतिमान चक्रवर्ती, रघुबीर यादव आणि सिद्धांत कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित याच्या मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड केली आहे. हा चित्रपट आता 9 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
कोरोनामुळे चित्रपट लांबणीवर
कोरोना साथीच्या रोगामुळे मागील वर्षी ‘चेहरे’ प्रदर्शित होऊ शकला नाही. चित्रपटाची घोषणा 11 एप्रिल 2019 रोजी झाली होती आणि त्याचे शूटिंग 10 मे रोजी सुरू झाले. गेल्या वर्षी 17 जुलै रोजी हा चित्रपट रिलीज होणार होता, पण कोरोनामुळे रिलीजला ब्रेक लागला.
पोस्टर्सवरून हटवलेल्या रियाला निर्मात्यांची साथ
जेव्हा चित्रपटाच्या पोस्टर्सवर रियाला जागा दिली जात नव्हती तेव्हा बर्याच चित्रपट निर्मात्यांनी रियाचे समर्थन केले. एका चित्रपट निर्मात्याने म्हटले होते की, ‘मला नक्कीच रियाबरोबर काम करायचं आहे. ती सुंदर आणि प्रतिभावान आहे आणि आता लोकांनाही तिला मोठ्या पडद्यावर बघायचे आहे. मला तिच्याबरोबर काम करण्यात काहीच अडचण नाही.’
(Corona Night curfew will affect on box office Amitabh bachchan starrer chehre release will postpone)
हेही वाचा :
सलमान ते सारा, ‘देवमाणूस’ मालिकेतील मायराचे सुपरस्टार कनेक्शन, मिमीचार्वी खडसेचा अनोखा अंदाज
Avika Gor | ‘बालिका वधू’ने गुपचूप उरकलं लग्न? सोशल मीडियावरील फोटोमुळे चर्चेला उधाण!#AvikaGor | #aadilkhan | #Entertainment | #wedding https://t.co/fyspuZRZdt
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 28, 2021