Deepika Padukone | MAMIच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, दीपिका पदुकोणने दिले मोठे कारण…

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukon) हिने नुकताच मुंबई अ‍ॅकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजच्या (MAMI) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. स्वत: दीपिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.

Deepika Padukone | MAMIच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, दीपिका पदुकोणने दिले मोठे कारण...
दीपिका पदुकोण
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 3:06 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukon) हिने नुकताच मुंबई अ‍ॅकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजच्या (MAMI) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. स्वत: दीपिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे की, आपण या पदाचा राजीनामा देत आहे. दीपिकाच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे (Deepika Padukone resign from MAMI Chairperson post).

याविषयी सांगताना दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, ‘एमएएमआयच्या बोर्डवर असणे आणि अध्यक्ष म्हणून काम करणे हा माझ्यासाठी एक विलक्षण अनुभव आहे. एक कलाकार म्हणून सिनेमा आणि माझे कलागुण एकत्र मला माझ्या दुसर्‍या अर्थात मुंबईत घेऊन आले.’

का घेतला मोठा निर्णय?

दीपिका पुढे म्हणाली की, तिच्या उर्वरित प्रकल्पांमुळे तिला यासाठी वेळ काढता येत नाहीय. दीपिकाने लिहिले की, ‘माझ्याकडे सध्या बरीच कामं आली आहेत. त्यामुळे मी MAMIवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीय.’

नवीन वेबसाईट लाँच

गुरुवारी ‘www.deepikapadukone.com’ नावाची एक वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. दीपिका पदुकोण तिच्या वेबसाईटवर तिच्या आगामी प्रोजेक्ट, सामाजिक कार्य आणि इतर सुविधांची माहिती देखील उपलब्ध करुन देईल (Deepika Padukone resign from MAMI Chairperson post).

दीपिकाचे आगामी प्रोजेक्ट

दीपिका लवकरच ‘83’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या सिनेमात, ती पती रणवीर सिंगसोबत लग्नानंतर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ‘83’ हा चित्रपट माजी क्रिकेटर कपिल देव यांच्या जीवनावर आधारित असेल. या चित्रपटात दीपिका पदुकोण, कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे आणि कपिल देव रणवीर सिंग यांची भूमिका साकारणार आहे.

इंटर्नमध्ये ‘बिग बीं’बरोबर दिसणार

याशिवाय दीपिका अमिताभ बच्चन यांच्यासमवेत ‘द इंटर्न’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांनी दीपिकाबरोबर करार केला होता, परंतु त्यांच्या निधनानंतर आता ‘बिग बी’ ती भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट हॉलिवूड फिल्म ‘द इंटर्न’ चा हिंदी रिमेक आहे.

तसेच, अमिताभ आणि दीपिका यांनी यापूर्वी ‘पीकू’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. चित्रपटाच्या अपार यशानंतर पुन्हा एकदा ‘इंटर्न’मध्ये चाहत्यांना दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चन एकत्र दिसणार आहेत. काही काळापूर्वी या चित्रपटाविषयी दीपिका म्हणाली होती की, ‘इंटर्न’ एक सुंदर रिलेशनशिप स्टोरी आहे. चित्रपट हा हलका फुलका विनोदी चित्रपट आहे.

(Deepika Padukone resign from MAMI Chairperson post)

हेही वाचा :

Jamaica To India : ख्रिस गेलच्या डान्स मूव्ह पाहून बॉलिवूडकरही होतील हैराण, नवीन गाण्याचा इंटरनेटवर धुमाकूळ!

फ्लॉप चित्रपटांना वैतागून अभिषेकने घेतला होता मनोरंजन विश्वाचा निरोप घेण्याचा निर्णय, मग अमिताभ म्हणाले…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.