Video | आधी दुवा, मग हात जोडून अखेरचं दर्शन, नंतर शाहरुख थुंकला? पूर्ण व्हिडीओ पहा काय घडलं
Didi Shahrukh Khan Spitting at Lata Mangeshkar Funeral : काहींच्या मते शाहरुख खानं असं करुन लता मंगेशकर यांचा अपमान केला असल्याची टीकाही केली आहे. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलंय. पण खरंच शाहरुख खाननं असं केलंय का?
मुंबई : सुपरस्टार शाहरुख खान (King Khan Shahrukh Khan trolled) यानं लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनावेळी केलेली कृती चांगलीच गाजतेय. अनेकांनी शाहरुख खानला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओही टीव्ही 9 मराठीनं समोर आणला आहे. लता मंगेशकर यांच शुक्रवारी निधन (Lata Mangeshkar is no more) झालं. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अनेक दिग्गजांची हजेरी शिवाजी पार्कवर पाहायला मिळाली. यावेळी शाहरुख खान पत्नी गौरीसह लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी आला होता. तेव्हा त्यानं दोन्ही हात फैलावून आधी लता मंगेशकर यांच्यासाठी दुवा मागितली. यानंतर मास्क खाली करुन तो काहीतरी करताना दिसला. मग दोन्ही हात जोडून शाहरुख खाननं लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला प्रदक्षिण घातला. या संपूर्ण प्रकारावरुन सोशल मीडियात एका नवा वाद चर्चिला जातो आहे. शाहरुख खाननं दुवा मागितल्यानंतर मास्क खाली करुन केलेली कृती ही थुंकण्याचा प्रकार होता, असा आरोप अनेकांनी ट्वीट करत केला आहे. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड (New controversy of Shahrukh Khan) फुटलंय. नेमकं यावेळी काय झालं ते आधी पाहून घेऊन आणि मग हा सगळा प्रकार काय होता, ते देखील जाणून घेऊ…
पाहा शाहरुख खानचा तो वादग्रस्त संपूर्ण व्हिडीओ –
अनेकांनी ट्वीटरवर पोस्ट करत शाहरुख खाननं मास्क खाली करुन लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनावेळी तो थुंकला असा दावा केला आहे. काहींच्या मते शाहरुख खानं असं करुन लता मंगेशकर यांचा अपमान केला असल्याची टीकाही केली आहे. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलंय. पण खरंच शाहरुख खाननं असं केलंय? तो खरंच थु्ंकलाय का? नेमकं यावेळी काय झालं आहे, ते ही जाणून घ्यायल हवंच..
वाचा ट्वीटरवर नेमके युजर्सनी काय आरोप केलेत?
Today IT CELL tried to do a lot of negativity against #SRK But common people defended him like anything.
Which shows that no amount of fake news can decrease the love and respect the neutral audience has for #ShahRukhKhan pic.twitter.com/b5azhnFOOK
— ? ᴿᵒⁿⁱᵗ |THE BATMAN ? (@avgcinephile) February 6, 2022
खरंच तो थुंकलाय का?
अगदीच थेट सांगायचं, तर शाहरुख खान हा थुंकलेला नाही. थुंकना आणि फुंकना यात जमीन अस्मानाचा फरक असतो, हे वेगळं सांगायचा नकोच. पण दोन्ही गोष्टी करताना आपल्या ओठांची होत असलेली रचना सारखी असल्यामुळे अनेकांचा गैरसमज झाला. पण ही गोष्ट अनेकांनी समजून घेण्याच्या आधीच विखारी टीका शाहरुख खानवर करण्यास सुरुवात केली.
The Symbol of Love @iamsrk we love you ❤️ #ShahRukhKhan pic.twitter.com/ZWFKfHlKgU
— ???? Nikhil ???? (@jasoos_world) February 6, 2022
थुंकना आणि फूंकना यातील फरक
शाहरुख खानला ट्रोल करणाऱ्यांना अनेक मुस्लिम युजर्सनी चांगलंच सुनावलंय. शाहरुखने केलेल्या कृतीला फूंकना असं म्हणतात, असं रुबिना लियाकन या ट्वीटर युजननं म्हटलंय. रुबिका यांनी केलेल्या दाव्यानुसार शाहरुख केलेली कृती म्हणते फातिहा पढणं असतं. याला आदरांजली वाहणं असही म्हणता येऊ शकेल.
पाहा रुबिना यांचं ट्विट :
अरुण जी इसे थूकना नहीं फ़ातिहा पढ़ना कहते हैं… दुआएँ पढ़कर फूंकना कहते हैं…. ? https://t.co/vVSS495NZA
— Rubika Liyaquat (@RubikaLiyaquat) February 6, 2022
दुआ म्हटल्यानंतर हळूवार फुंकर घालायची, असी रीत मुस्लिम बांधवांमध्ये असते. शाहरुखनं नेमकं तेच केलं होतं. पण याच गोष्टीवरुन अनेकांनी गैरसमज परसवण्याचा कित्ताच सुरु केल्याचं ट्वीटरवर पाहायला मिळतंय. अनेकांनी शाहरुखला अत्यंत वाईट प्रकारे ट्रोल केलं असल्याचं दिसून आलं असून Shahrukh Khan याच गोष्टीमुळे ट्वीटरवर ट्रेन्ड होतोय. पण या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी ही संपूर्ण घटना, त्याचा अर्थ हेदेखील समजून घेणं, तितकंच गरजेचचं आहे.
No fake social media help for their condolence message like other starts. Physically present in their funeral. Emotion is real.#ShahRukhKhan pic.twitter.com/SSdDK7DuIG
— Ꮪanket ᭄ w (@iamSanket123) February 6, 2022