Diljit Dosanjh | भारताचं ‘दिल जित’णारा पंजाबी छोरा, खेडेगावातला दिलजीत दोसांज स्टार कसा झाला?

पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील दोसांज कलन या छोट्याशा खेडेगावात दलजीतचा जन्म झाला. दिलजीतचं मूळ नाव दलजीत.

Diljit Dosanjh | भारताचं 'दिल जित'णारा पंजाबी छोरा, खेडेगावातला दिलजीत दोसांज स्टार कसा झाला?
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 8:16 AM

मुंबई : ‘उडता पंजाब’ चित्रपटातील सरताज सिंहच्या भूमिकेतून लक्ष वेधून घेणारा पंजाबी छोरा बॉलिवूडमध्ये नाव कमावेल, अशी चुणूक दिसली होती. मात्र रील लाईफसोबतच रिअल लाईफमध्येही दिलजीत दोसांज (Diljit Dosanjh) देश पातळीवर हिरो होईल, असं स्वप्नातही कोणाला वाटलं नसेल. 36 वर्षांचा पंजाबी गायक-गीतकार आणि अभिनेता दिलजीत दोसांजने नावाप्रमाणे ‘दिल जीत’ लिया. (Diljit Dosanjh The Punjabi guy who stole India’s heart)

त्याचं झालं असं की, ट्विटरवरील तोफगोळ्यांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना रनौत हिने दिल्लीच्या सीमेवर निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी गरळ ओकली. शंभर-शंभर रुपये दराने आंदोलक मोदी सरकारविरोधात आंदोलन करत आहेत, असा घणाघाती आरोप कंगनाने केला. इतकंच नाही, तर शाहीन बागेतील आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंदोलक बिल्कीस बानो उर्फ ‘शाहीन बाग दादी’शी मिळतीजुळती चेहरापट्टी असलेल्या वृद्ध महिलेशी कंगनाने गल्लत केली. त्यानंतर बिल्कीस बानोही भाडेतत्त्वावर सरकारविरोधी आंदोलनात सहभागी होतात, असा आरोप तिने केला.

वादाचा भडका कसा उडाला?

कंगनाची चूक सुधारणाऱ्या दिलजीतवर कंगना चांगलीच भडकली. ‘करण जोहरच्या पाळीव माणसा, जी आजी शाहीन बागेत नागरिकत्वासाठी आंदोलन करत होती, तीच बिल्कीस बानो आजी शेतकऱ्यांच्या किमान हमीभावासाठी आंदोलन करताना दिसली. काय नाटकं लावली आहेत, थांबवा लगेच’ अशा शब्दात कंगनाने दरडावलं. त्यानंतर साहजिकच दिलजीतचा इगो दुखावला.

‘तू जितक्या जणांसोबत चित्रपट करतेस, त्यांची तू पाळीव असतेस का? मग तर मालकांची यादी फारच लांब असेल. हे बॉलिवूड नाही, पंजाब आहे.’ असं उत्तर दिलजीतने ट्विटरवर दिलं. मी बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत नाही, बॉलिवूडवाले येऊन मला सर फिल्म करा, अशी विनवणी करतात, असं दिलजीतनेही कंगनाला सुनावलं. दिलजीतने उचलून धरलेली बाजू त्याच्या फॉलोअर्सनी चांगलीच उचलून धरली. ट्विटरवरचे 43 लाख, तर इन्स्टाग्रामवरचे 1 कोटी 7 लाख फॉलोअर्स निश्चितच कंगनाच्या पाठिराख्यांपेक्षा अधिक होती. त्यातच मिका सिंह, अंगद बेदी, हरभजन सिंह यासारख्या पंजाबी सेलिब्रिटींनीही दिलजीतला पाठिंबा दिला.

दिलजीतला मिळालेली यश हे पठडीबाह्य आहे, त्यामुळेच ते मन जिंकणारं आहे. पगडीधारी अभिनेते हे चित्रपटसृष्टीत फारसे दिसत नाहीत, बॉलिवूड तर सोडाच, पण पंजाबी सिनेसृष्टीतही पगडीधारी हिरो नाहीत, अशा शब्दात चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांनी दिलजीतचं कौतुक केलं.

दलजीतचा दिलजीत कसा झाला?

पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील दोसांज कलन या छोट्याशा खेडेगावात दलजीतचा जन्म झाला. दिलजीतचं मूळ नाव दलजीत. मात्र नव्या कलाकाराचे नाव उठून दिसावे, यासाठी निर्मात्याने त्याला नाव बदलून दिलजीत ठेवण्यास सुचवलं. “हे परमात्म्या, मै किसको ना जानू, मुझे सब जाने” अशी प्रार्थना लहानपणी गुरुद्वाऱ्यात केल्याची आठवण दिलजीतने एका मुलाखतीत सांगितली होती. वयाच्या 11 व्या वर्षी त्याच्या आईने त्याला संगीत शिक्षणासाठी काकांकडे पाठवलं. मात्र दिलजीतसाठी हा धक्का होता. आपल्या कुटुंबाने आपल्याला नाकारल्याची भावना त्याच्या मनात रुजली. घर सोडल्यावर मी आईवर खूप चिडलो होतो. दिवाळी मला खूप आवडायची, पण त्यानंतर मी हा सण कधीच साजरा केला नाही, असं दिलजीतने सांगितलं.

…आणि दोसांज गावाचं नाव आडनाव झालं

काकांसोबत राहताना दिलजीत तबला आणि हार्मोनियम शिकलाच, पण कीर्तनासाठीही त्याचा आवाज तयार झाला. 18 व्या वर्षीच तो जाहीर कार्यक्रमात गाणी गायला लागला. इश्क दा उडा अदा या अल्बममधून त्याने पंजाबी मनोरंजन विश्वात दमदार पाऊल ठेवलं. दोसांज कलन गावातील रहिवासी मोठ्या संख्येने कॅनडातील ब्रिटीश कोलंबियात स्थायिक झाले, तेव्हा दिलजीतने आपल्या गावाचं नाव आडनाव म्हणून धारण केलं.

सुखपाल सुख ग्रूमिंग गुरु

पंजाबी संगीतकार सुखपाल सुख यांनी दिलजीत दोसांजचं ग्रूमिंग केलं. स्टाईलिश पगडी कशी घालावी, इथपासून कॅमेरासमोर फाईन-ट्यून परफॉर्मन्स कसा करावा, अशा गोष्टी त्याने दिलजीतला शिकवल्या. यूके, यूएस, कॅनडामध्ये डीजे नाईटच्या ऑफर्स वाढू लागल्या. 2011 मध्ये लायन ऑफ पंजाब हा पहिला सिनेमा केला. मात्र जट अँड ज्युलिएटने त्याला खरी ओळख दिली. त्यानंतर उडता पंजाब, फिलौरी, गुड न्यूज आणि नुकताच आलेला सुरज पे मंगल भारी या सिनेमातून तो बॉलिवूडमध्ये नाव कमावू लागला. स्टार झाल्यानंतरही मातीशी नाळ जोडून ठेवण्याची वृत्ती दिलजीतचं नाव उंचावणारी आहे, यात शंका नाही.

संबंधित बातम्या :

कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन; स्वेटर्स आणि ब्लँकेटस खरेदी करण्यासाठी दिलजित दोसांझकडून 1 कोटीची देणगी

शेतकरी आंदोलनावरुन कंगना रनौत आणि दिलजित दोसांझमध्ये ट्विटर वॉर

(Diljit Dosanjh The Punjabi guy who stole India’s heart)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.