Gadar Sequel | पुन्हा एकदा ऐकू येणार ‘हिंदुस्थान जिंदाबाद’चा नारा, ‘गदर’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

जेव्हा चित्रपटाचा सिक्वेल बनतो, तेव्हाबऱ्याचदा लीडची जोडी बदलते. पण ‘गदर’च्या पार्ट 2मध्ये सनी देओल आणि अमीषा पटेलच लीड रोलमध्ये दिसतील.

Gadar Sequel | पुन्हा एकदा ऐकू येणार ‘हिंदुस्थान जिंदाबाद’चा नारा, ‘गदर’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
गदर : एक प्रेम कथा
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 8:29 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol), अभिनेत्री अमीषा पटेल (Ameesha Patel) आणि अमरीश पुरी अभिनित सुपरहिट फिल्म ‘गदर : एक प्रेम कथा’ (Gadar: Ek Prem Katha) आजपर्यंत प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. तरच,  प्रत्येकजण या चित्रपटाचा भाग 2 तयार होण्याची वाट पाहत आहे. अशी अपेक्षा आहे की, लवकरच त्यांची ही प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. मेकर्स या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याचा विचार करत आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा सनी आणि अमीषाची जबरदस्त केमिस्ट्री प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येईल (Director Anil Sharma working on sunny deol starrer film Gadar sequel).

‘गदर’ चित्रपटाचे नाव उच्चारले की, तो हँडपंप उखडण्याचा सीन प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतो. हा सीन पाहून प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला होता. असेच काहीतरी पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी आता याचा खुलासा केला आहे. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, ‘गदर’ चे निर्माते यावेळी तयार होणारा सिक्वेल लक्षात घेऊन प्लॉट आणि स्क्रिप्टवर काम करत आहेत.

मुख्य जोडी म्हणून सनी-अमीषाच आघाडीवर!

जेव्हा चित्रपटाचा सिक्वेल बनतो, तेव्हाबऱ्याचदा लीडची जोडी बदलते. पण ‘गदर’च्या पार्ट 2मध्ये सनी देओल आणि अमीषा पटेलच लीड रोलमध्ये दिसतील. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु निर्मात्यांनी आत्ताच त्याबद्दलची योजना आखली आहे. याशिवाय चित्रपटाशी संबंधित अन्य कलाकारांशीही संपर्क साधला जात आहे.

उत्कर्ष देखील साकारणार महत्त्वाची भूमिका

मीडिया रिपोर्टनुसार दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्षही यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. असं म्हणतात की, चित्रपटाच्या पहिल्या भागात उत्कर्षने सनी आणि अमीषाचा मुलगा जीता याची भूमिका साकारली होती. अभिनेता म्हणून त्याने वर्ष 2018मध्ये ‘जीनियस’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते (Director Anil Sharma working on sunny deol starrer film Gadar sequel).

सनीला पाहून संवाद विसरायची अमीषा

2001मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’मधील सनी देओलसोबत अमीषा पटेलची केमिस्ट्री लोकांना चांगलीच आवडली होती. पण अभिनेत्री अमीषा शूटच्या वेळी सनी देओलसोबत सीन करायला खूप घाबरत असे. सनीला पाहून ती आपले संवाद विसरत होती. सनी देओलसोबतच्या एका दृश्यात तिला जवळपास 17-18 रीटेक्स द्यावे लागायचे.

‘अपने-2’चे काम सुरु

सध्या धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल आणि करण देओल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘अपने-2’ या प्रोजेक्टच्या प्री-प्रॉडक्शनमध्ये दिग्दर्शक सध्या व्यस्त आहे. लॉकडाऊन दरम्यान चित्रपटाच्या कल्पनेविषयी अनिल यांनी सांगितले की, ‘या लॉकडाऊन दरम्यान, आपल्या सर्वांनाच आपल्या कुटुंबाचे महत्त्व जाणवले. आपल्या प्रियजनांबद्दलचे महत्त्व आपल्याला जाणवले. या भावनिक बंधनाने मला ‘अपने 2′ सोबत येण्याची कल्पना दिली. मला वाटतं कौटुंबिक प्रेमाबद्दल चित्रपट बनवण्याची हीच ती योग्य वेळ आहे.’

(Director Anil Sharma working on sunny deol starrer film Gadar sequel)

हेही वाचा :

‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’च्या स्पर्धकाला चक्क प्रेक्षकानेच देऊ केली नोकरी, वाचा दीपक हुलसुरेची संघर्ष कथा…

The Big Bull Teaser | शेअर मार्केटची झलक दाखवणारा ‘द बिग बुल’चा जबरदस्त टीझर, पाहा अभिषेक बच्चनचा नवा लूक…

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.