मुंबई : शाहरुख खान याचा पठाण चित्रपट रिलीजच्या 37 व्या दिवशीही बाॅक्स आॅफिसवर चांगली कमाई करताना दिसला. अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा सेल्फी हा चित्रपट 24 फेब्रुवारी रोजी रिलीज झालाय. मात्र, या चित्रपटाच्या कमाईपेक्षा पठाण चित्रपटाची कमाई बाॅक्स आॅफिसवर जास्त आहे. अक्षय कुमार याच्या सेल्फी अगोदर कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याचा शहजादा हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, हा देखील चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेलाय. विशेष म्हणजे पठाण चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठी खेळी केलीये. ज्यामुळे पठाण चित्रपट पाहण्यावर प्रेक्षकांनी जोर दिलाय. कसेही करून पठाणच्या निर्मात्यांना बाहुबलीचे रेकाॅर्ड तोडायचा आहे.
गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाल करताना दिसत नाहीयेत. एका मागून एक असे तब्बल पाच चित्रपट अक्षय कुमार याचे यापूर्वी फ्लाॅप गेले आहेत. आता त्यामध्ये सेल्फी या चित्रपटाचा देखील समावेश झालाय. मुळात म्हणजे कोरोनानंतर अक्षय कुमार याच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलीये.
कार्तिक आर्यन याने शहजादा या चित्रपटाच्या अगोदर तब्बल तीन चित्रपट हिट दिले आहेत .मात्र, शहजादा हा त्याचा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेलाय. ज्यादिवशी शदजादा हा चित्रपट रिलीज झाला, त्यादिवशी पठाणच्या चित्रपट निर्मात्यांनी तिकिट दरामध्ये मोठी कपात केली होती आणि याचाच फटका हा शहजादा या चित्रपटाला बसला आहे.
शहजादा आणि सेल्फी या दोन्ही चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यानंतर आता या चित्रपटांचे शो बंद करून थिएटर मालकांनी पठाणचे शो सुरू केले आहेत. यादरम्यान शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाचे तिकिट दरही कमी करण्यात आले आहेत. बाहुबली चित्रपटाचा रेकाॅर्ड मोडण्यासाठी तिकिट दर कमी करण्यात आल्याचे सांगण्यात येतंय.
अक्षय कुमार याच्या सेल्फी चित्रपटाने सात दिवसांमध्ये 14.68 कोटीचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले आहे. दुसरीकडे कार्तिक आर्यन याच्या चित्रपटाने दोन आठवड्यामध्ये 30.55 कोटीचे कलेक्शन केले. पठाण चित्रपटाने 503 कोटींच्या पुढे कमाई भारतामध्ये केलीये. विदेशातही पठाण चित्रपटाने मोठी कमाई केलीये.
शहजादा आणि सेल्फी चित्रपट रिलीज झाल्यानंतर पठाण चित्रपटाच्या तिकिट दरामध्ये कपात करण्यात आल्याने याचा फटका दोन्ही चित्रपटांना बसल्याचे सांगण्यात येतंय. कारण पठाण चित्रपटाच्या तुलनेत सेल्फी आणि शहजादाचे तिकिट दर जास्त असल्याने प्रेक्षकांनी स्वस्तामध्ये पठाण पाहणे पसंद केले. शाहरुख खान याच्यामुळेच अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटाला फटका बसल्याचे बोलले जातंय.