Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drug Case | ड्रग्ज प्रकरणी 8 तासांच्या चौकशीनंतर एजाझ खानला अटक, 3 एप्रिलपर्यंत NCB कोठडी

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेता एजाझ खान (Ajaz Khan) याला अटक केली होती आणि आता कोर्टाने एजाझला 3 एप्रिलपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.

Drug Case | ड्रग्ज प्रकरणी 8 तासांच्या चौकशीनंतर एजाझ खानला अटक, 3 एप्रिलपर्यंत NCB कोठडी
एजाझ खान
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 5:22 PM

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेता एजाझ खान (Ajaz Khan) याला अटक केली होती आणि आता कोर्टाने एजाझला 3 एप्रिलपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. मंगळवारी (30 मार्च) एजाझ राजस्थानहून मुंबईला परत आला असता, एनसीबीने त्याला ताब्यात घेतले होते. एनसीबी टीमने एजाझच्या अंधेरी आणि लोखंडवाला येथील अनेक ठिकाणी छापे टाकले (Drug Case Actor Ajaz Khan remanded to NCB custody till April 3).

एजाझला NCB कोठडी!

त्याचवेळी, कोर्टात हजर होण्यापूर्वी अभिनेता म्हणाला होता की, घरावर टाकलेल्या छाप्याच्या दरम्यान 4 झोपेच्या गोळ्या सापडल्या आहेत. या गोळ्या त्याच्या पत्नीला दिल्या गेल्या होत्या. गर्भपात झाल्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती आणि म्हणूनच ती यातली एक गोळी दररोज घ्यायची.

ड्रग पेडलर शादाब बटाटाला (Shadab Batata) अटक झाल्यानंतर एजाझचे नाव या ड्रग्ज प्रकरणात समोर आले होते. एनसीबीच्या टीमला एजाझ खान आणि बटाटा टोळीचे काही धागेदोरे सापडले होते, त्याची चौकशी केल्यानंतर अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने एका मोठ्या कारवाईत मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज तस्कर फरूख बटाटाचा मुलगा शादाब बटाटा याला सुमारे दोन कोटी एमडी ड्रग्जसह अटक केली होती.

कोण आहे शादाब बटाटा?

शादाब बटाटावर बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सना ड्रग्ज पुरवल्याचा आरोप आहे. शादाब मुंबईमधील एक कुख्यात ड्रग पेडलर आहे. शादाबला अटक झाल्यानंतरच एजाझचे नाव समोर आले होते.

कोण आहे एजाझ खान?

– एजाझ खानने रक्तचरित्र, अल्लाह के बंदे यासारख्या बॉलिवूडपटांमध्ये काम केलं आहे

– रहे तेरा आशीर्वाद, कहानी हमारे महाभारत की, करम अपना अपना यासारख्या मालिकांमध्येही अभिनय

– बिग बॉसच्या सातव्या सिझनमुळे वादाच्या भोवऱ्यात

– फिअर फॅक्टर- खतरों के खिलाडी, कॉमेडी नाईट्स विथ कपिलमध्येही सहभाग

– एक्टसी टॅबलेट्सच्या माध्यमातून ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी ऑक्टोबर 2018 मध्येही अटक

– जुलै 2019 मध्ये धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा(Drug Case Actor Ajaz Khan remanded to NCB custody till April 3)

भाजी विक्रेता ते ड्रग्ज डीलर, कोण आहे ‘बटाटा’ टोळी?

NCBने अटक केलेला शादाब बटाटा हा फारूक शेख उर्फ फारुख बटाटा याचा मुलगा आहे. फारुख बटाटा हा जेव्हा सुरुवातीला मुंबईत आला तेव्हा तो बटाटे विकायचा. यामुळे त्याचं नाव फारुख बटाटा अस झालं. बटाटे विकता विकता फारुख मुंबईत ड्रग्स विकणाऱ्या गँगस्टरच्या संपर्कात आला. आणि मग तो ही ड्रग्स विकू लागला.  गेल्या काही वर्षात तो ड्रग्जचा मोठा व्यापारी झाला.

मुंबईत देशभरातून त्याचप्रमाणे परदेशातून मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तस्करी होत असते. हे ड्रग्स फारूक बटाटा याच्याकडे उतरत असत. त्यानंतर ते ड्रग्स फारुख गँगची लोकं इतरत्र वितरित करत असतात. प्रामुख्याने बड्स , गांजा, एल एस डी, एम डी या ड्रग्जच्या पुरवठ्यासाठी फारुख ओळखला जातो.

(Drug Case Actor Ajaz Khan remanded to NCB custody till April 3)

हेही वाचा :

बटाटा विक्रेता ते मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज माफिया; कोण आहे फारुख बटाटा?

शादाब बटाटाने तोंड उघडलं, NCB ने बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई विमानतळावरुन उचललं

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.