वाह…! सासू असावी तर अशी, अभिषेकच्या लग्नापूर्वीच जया बच्चन यांनी घेतला होता सून ऐश्वर्याबाबत मोठा निर्णय, वाचून तुम्हीही कौतुक कराल
अमिताभ बच्चन यांचं कुटुंब कायमच कोणत्या न कोणत्या कारणासाठी चर्चेत राहिलं आहे. सध्या अभिषेक आणि ऐशवर्याच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
अमिताभ बच्चन यांचं कुटुंब कायमच कोणत्या न कोणत्या कारणासाठी चर्चेत राहिलं आहे. अमिताभ बच्च यांच्या कुटुंबानं आयुष्यात खूप -चढ उतार पाहिले आहेत.मात्र या सर्व परिस्थितीला तोंड देत आपल्याला जग महानायक का म्हणतं हे अमिताभने सिद्ध केलं. अमिताभ बच्चन हे कधीही परिस्थितीला शरण गेले नाहीत, आयुष्यात अनेक संकट आले मात्र त्यावर मात करून ते आज 1600 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंब पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलं आहे, त्याचं कारण म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटास्फोटाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र त्यानंतर आता अनेकदा अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये सगळं सुरुळीत सुरू आहे, असं मानलं जात आहे.
याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे जया बच्चन यांना आपल्या मुलाच्या लग्नानंतर लगेचच सर्व जबाबदारी आपली सून ऐश्वर्यावर सोपवायची होती. मात्र ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांच्यामध्ये ऐश्वर्याची नणंद श्वेता बच्चन यांची एण्ट्री झाली. असं मानलं गेलं की श्वेतानेच जया बच्चन यांना तसं न करण्याचा सल्ला दिला. मात्र समोर आलेल्या या कथीत बातम्यांवर बच्चन कुटुंबाकडून कधीही कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
ही गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचं लग्न होणार होतं. त्यापूर्वी जया बच्चन या आपली मुलगी श्वेता बच्चन सोबत ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांना होणाऱ्या सुनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, तिच्यावर तुम्ही कुटुंबाची जबाबदारी सोपवणार का? असा तो प्रश्न होता. तेव्हा जया बच्चन यांनी म्हटलं होतं की मी तिच्यावर संपूर्ण जबाबदारी सोपवून या सर्वांमधून मुक्त होण्याचा विचार करत आहे. तेव्हा जया बच्चन यांच्या मुलीला मात्र त्यांचा हा निर्णय आवडला नव्हता, तीने त्याचवेळी त्यांना सल्ला दिला होता की, ऐश्वर्यावर आत्ताच कोणतीही जबाबदारी देऊ नकोस, हळूहळू जबाबदारी सोपव असं श्वेता यांनी म्हटलं होतं.