अलिया, दीपिका, ऐश्वर्या रायच्या नावाने फसवणूक, लाखो रुपयांचा Fraud! बॉलिवूडमध्ये खळबळ, कुणी केली तक्रार?
Alia Bhatt, Dipika Padukone, Aishwarya ray | बॉलिवूड कलाकार आणि क्रिकेट जगातील सेलिब्रेटिजच्या नावाने लाखो रुपयांची फसवणूक उघड. सायबर पोलिसांनी मोठी कारवाई
मुंबई | मुंबई आणि बॉलिवूडला (Bolliwood) हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या नावाने क्रेडिट कार्ड बनवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. सायबर सेलने या टोळीचा पर्दाफाश केला आहे. फिल्मी स्टार्सच्या नावाने बनावट क्रेटिड कार्ड तयार करून या टोळक्याने बँकांना लाखो रुपयांचा चुना लावण्याचं उघडकीस आलंय. यात आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय, शिल्पा शेट्टी आणि सोनम कपूर यांच्यासह एकूण ९८ सेलिब्रेटिजची नावं समाविष्ट आहेत. या गँगने आतापर्यंत ९० लाखांहून अधिक फ्रॉड केल्याची माहिती पोलिसांना तपासाअंती मिळाली आहे.
कोणत्या सेलिब्रेटींची नावं?
या फसवणुकीसाठी टोळक्याने अभिनेत्री आलिया भट्ट, दीपिका पादुकोण,ऐश्वर्या राय बच्चन, एम एस धोनी, अभिषेक बच्चन, सोनव कपूर, सचिन तेंडुलकर, सैफ अली खान, हृतिक रोशन, शिल्पा शेट्टी आणि इतर अनेक व्यक्तींच्या नावाचा आणि वलयाचा वापर करून घेतला आहे. या हायप्रोफाइल सेलिब्रिटींच्या नावाखाली सायबर फ्रॉड सुरु होता.
बनावट पॅन-आधार कार्डचा खेळ
या सेलिब्रेटीजच्या नावावर आधी गैर मार्गाने सरकारी ओळखपत्र जसे की, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर दस्तावेज तयार केले जात होते. त्यानंतर हेच दस्तावेज फसवणुकीसासठी वापरले जात होते. सेलिब्रेटींच्या नावाने विविध बँकांकडून कर्ज घेण्याचे प्रकार मागील दोन वर्षांपासून सुरु होते. क्रेडिट कार्ड बनवून बँकांना हे लोक फसवत होते.
पुण्यातल्या कंपनीची तक्रार
बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकाराची तक्रार पुण्यातून आली. पुण्यातील मेसर्स एफपीएल टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी शेखावत यांनी सायबर सेलकडे या प्रकरणाची तक्रार केली होती. एक कंपनी व्हर्चुअल कार्ड आणि क्रेडिट कार्ड तयार करते. सेलिब्रेटिजचे बनावट पॅन कार्ड आणि आधार कार्ड तयार करून त्याद्वारे क्रेडिट कार्ड तयार केले जातात. या कंपनीला या गँगने २१.३१ लाख रुपयांचा चुना लावण्याचा आरोप कंपनी व्यवस्थापनाने केला आहे.
५ जण अटकेत
पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. पकडलेल्या आरोपींपैकी एक जण बीटेक आहे. त्यांच्याकडे २५ पेक्षा जास्त बनावट आधारकार्ड, ४० क्रेटिड कार्ट, १० मोबाइल, १ लॅपटॉप, ४२ सिमकार्ड, ३४ बनावट कार्डसहित पाच चेकबुक जप्त करण्यात आले आहेत. मागील २ वर्षांमध्ये या गँगने आतापर्यंत ९० लाख रुपयांची फसवणुक केल्याची कबूली आरोपींनी दिली आहे.