Theater Release Films | ‘गंगूबाई काठियावाडी’पासून ते ‘अटॅक’पर्यंत, ‘हे’ चित्रपट थिएटरमध्येच होणार रिलीज!
कोरोना व्हायरसमुळे जगभरात मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. बऱ्याच काळापासून अनेक मोठे चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद झाल्यामुळे चित्रपटांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे जगभरात मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. बऱ्याच काळापासून अनेक मोठे चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद झाल्यामुळे चित्रपटांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. अशा स्थितीत ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) आणि ‘चेहरे’ (Chehere) नंतर आता आणखी काही चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहेत.
चित्रपट उद्योगासाठी आजचा दिवस खूप खास आहे. अलीकडेच काही आगामी चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’(Gangubai Kathiyawadi), ‘अटॅक’ (Attack) आणि ‘आरआरआर’ (RRR) या आगामी चित्रपटाबद्दल एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. निर्मात्यांनी बुधवारी (8 सप्टेंबर) चित्रपटाच्या रिलीज संदर्भात एक अपडेट जाहीर केली आहे.
या अपडेटनुसार, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘अटॅक’ आणि ‘आरआरआर’ हे चित्रपट फक्त चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. खूप दिवसांपासून अशी चर्चा सुरु होती की, मेकर्स हे चित्रपट OTT वर रिलीज करण्याचा विचार करत आहेत, परंतु आता निर्मात्यांनी हे स्पष्ट केले आहे की या गोष्टी केवळ अफवा आहेत.
निवेदन केले जारी
यावर पेन स्टुडिओने एक निवेदन जारी केले आहे. पेन स्टुडिओचे अध्यक्ष डॉ.जयंतीलाल गडा यांच्या वतीने ट्विट करून असे लिहिले गेले आहे की, ‘आम्ही कळवू इच्छितो की गंगूबाई काठीवाडी, आरआरआर आणि अटॅक हे चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होतील. अफवा होत्या की, हे चित्रपट चित्रपटगृहांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जातील, ज्या चुकीच्या आहेत. हे मॅग्नम ओपस चित्रपट मोठ्या पडद्याच्या अनुभवासाठी बनवले गेले आहेत आणि चित्रपटगृहांमध्येचा प्रदर्शित होतील.’
पाहा पोस्ट
We would like to clarify that Gangubai Kathiawadi, RRR and Attack will release in cinemas.
– Dr Jayantilal Gada Chairman and MD Pen Studios#gangubaikathiawadi #rrrmovie #attack #penmovies #penstudios pic.twitter.com/23gz9PRIa3
— PEN INDIA LTD. (@PenMovies) September 8, 2021
गंगूबाई काठियावाडी
गंगूबाईमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. संजय लीला भन्साळी हा चित्रपट बनवत आहेत. आलिया व्यतिरिक्त अजय देवगणनेही या चित्रपटात प्रवेश केला आहे. अजय चित्रपटात गँगस्टर करीम लालाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर खूप पूर्वी रिलीज झाला आहे. चाहते आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अटॅक आणि आरआरआर
‘आरआरआर’ आणि ‘अटॅक’ या दोघांचे चाहते बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत. आलिया भट्ट ‘आरआरआर’मध्येही दिसणार आहे, तर जॉन अब्राहम ‘अटॅक’मध्ये दिसणार आहे. अटॅकमधून लक्ष्यराज आनंद दिग्दर्शित पदार्पण, तर पेन स्टुडिओज, जॉन अब्राहमचे जेए एंटरटेनमेंट आणि अजय कपूर याची निर्मिती करत आहेत.
हेही वाचा :
आईच्या अतिशय जवळ होता अभिनेता अक्षय कुमार, पाहा माय-लेकाचे काही खास फोटो…
बोल्ड टॉपमध्ये ईशा गुप्ताच्या दिलखेचक अदा, नव्या फोटोंमध्ये दिसला अभिनेत्रीचा ग्लॅमरस अवतार!