Ganpati in celebrity’s House: सेलिब्रेटींचा बाप्पा! कपूर कुटुंबीयांच्या घरी झाले गणपती बाप्पाचे आगमन

यंदा मात्र मुंबईसह संपूर्ण राज्यात अत्यंत आनंदात गणेशोत्सव साजरा होत असल्याने तुषार कपूर यांनी समाधान व्यक्त केले आहे. कपूर घराणे हे बॉलिवूड मधील अत्यंत नामवंत घराणे आहे. त्यांच्याकडे पाच दिवस बाप्पा विराजमान असतात.

Ganpati in celebritys House: सेलिब्रेटींचा बाप्पा! कपूर कुटुंबीयांच्या घरी झाले गणपती बाप्पाचे आगमन
कपूर यांच्या घरी बाप्पाचे आगमन
Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 31, 2022 | 3:33 PM

दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र कपूर (Jitendra Kapoor) यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. यंदाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करत असल्याचे तुषार कपूर (Tushar Kapoor) म्हणाले. गेले दोन वर्ष अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला गेला. यंदा मात्र मुंबईसह संपूर्ण राज्यात अत्यंत आनंदात गणेशोत्सव साजरा होत असल्याने तुषार कपूर यांनी समाधान व्यक्त केले आहे. कपूर घराणे हे बॉलिवूड मधील अत्यंत नामवंत घराणे आहे. त्यांच्याकडे पाच दिवस बाप्पा विराजमान असतात. सेलिब्रेटींसह (Ganpati in celebrity’s House)  अनेक मान्यवर त्यांच्याघरी बाप्पांच्या दर्शनाला येत असतात.

तुषार कपूर म्हणाले की, त्यांच्या जन्मापूर्वीपासून कपूर घराण्यात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गेली दोन वर्षे कोरोना काळात अत्यंत बिकट परिथिती होती. हळूहळू परिथिती सुधारत आहे. कोरोना काळात चित्रपटसृष्टीला मोठा फटका बसला. अनेकांचे रोजगार गेले. या सर्वांची कसर भरून निघावी तसेच गणेशाच्या कृपेने चित्रपटसृष्टीवरचे विघ्न टळो अशी प्रार्थना देखील तुषार कपूर यांनी बापाचरणी केली. याशिवाय साधेपणाने आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन देखील तुषार यांनी यावेळी केले.