Birth Anniversary | दक्षिणात्य चित्रपट सृष्टीचे ‘कादल मन्नान’, वाचा अभिनेते जेमिनी गणेशन यांच्याबद्दल…

बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री रेखाचे वडील म्हणून जरी आपली पिढी त्यांना ओळखत असली, तरी जेमिनी गणेशन यांची मुलगी म्हणून भानूरेखाला ओळखणारे अनेक लोक आजही त्यांची भारदस्त कारकीर्द सांगताना तो काळ अक्षरशः डोळ्यांसमोर उभा करतात.

Birth Anniversary | दक्षिणात्य चित्रपट सृष्टीचे ‘कादल मन्नान’, वाचा अभिनेते जेमिनी गणेशन यांच्याबद्दल...
Gemini Ganesan
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 8:00 AM

मुंबई : बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री रेखाचे वडील म्हणून जरी आपली पिढी त्यांना ओळखत असली, तरी जेमिनी गणेशन यांची मुलगी म्हणून भानूरेखाला ओळखणारे अनेक लोक आजही त्यांची भारदस्त कारकीर्द सांगताना तो काळ अक्षरशः डोळ्यांसमोर उभा करतात. 17 नोव्हेंबर 1920 रोजी जेमिनी गणेशन (Gemini Ganesan) यांचा जन्म झाला.

आज चेन्नईमध्ये जिथे ‘द पार्क’ नावाचे पंचतारांकित हॉटेल उभे आहे, तिथे एका काळी प्रसिद्ध चित्रपट स्टुडीओ उभा होता. 1940-50च्या दशकातला सुप्रसिद्ध ‘जेमिनी’ चित्रपट स्टुडीओ! याच स्टुडीओने पुढे चित्रपटसृष्टीला ‘जेमिनी गणेशन’ नावाचा हिरा दिला. ‘पुष्पावल्ली’ ही जेमिनी स्टुडीओची ‘टॉप’ची अभिनेत्री होती. पुष्पवल्लीला दोन अपत्ये होती. त्यानंतरही ती ‘जेमिनी’चे मालक वासन यांच्यासोबत नात्यात होती. वासनचेही पुष्पवल्लीवर प्रेम होते. परंतु, तो तिच्याशी लग्न करण्यास तयार नव्हता. पुष्पवल्लीला पैसा, संपत्ती, ऐशोआराम सगळे काही पायाशी लोळण घालायला तयार होते. मात्र, वासनने तिला आपले नाव देण्यास नकार दिला. पत्नी ऐवजी तिला नेहमीच ‘दुसऱ्या बाई’चा दर्जा गेला होता.

केमिस्ट्री लेक्चररची पावलं ‘जेमिनी’कडे वळली!

याच काळात मद्रास ख्रिस्ती कॉलेजमधल्या एका तरुण आणि देखण्या केमिस्ट्री लेक्चररचे अभ्यासातून मन उडून चालले होते. सिल्वर स्क्रीनच्या ओढीने त्याची पावले ‘जेमिनी स्टुडीओ’कडे वळायला लागली होती. या देखण्या लेक्चररला ‘जेमिनी’च्या टॉपच्या अभिनेत्रीसोबत म्हणजेच पुष्पवल्लीसह काम करण्याची संधी मिळाली. ‘मिस मालिनी’ या चित्रपटात त्याने पुष्पवल्लीसोबत काम केले. या चित्रपटादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढायला लागली. एकीकडे पुष्पवल्ली ‘जेमिनी’ गाजवत होती. तर, दुसरीकडे तिचे लेक्चररसोबतची जवळीक वाढत होती. वासनने आता मुंबईच्या दिशेने कूच करण्यास सुरुवात केली होती. आपल्या आगामी चित्रपटासाठी त्याने दिलीप कुमार आणि देव आनंद यांची निवड केली होती. या चित्रपटाची नायिका असणार होती अर्थात पुष्पावल्ली.

यादरम्यान वासनला पुष्पवल्ली आणि लेक्चररच्या वाढत्या जवळीकी संदर्भात कुणकुण लागली होती. त्याने थेट पुष्पवल्लीला धमकी देत, तिला निर्णय घेण्यास सांगितले. वासनने पुष्पवल्लीसमोर दोन पर्याय ठेवले होते. एक होते तिचे चमकते करिअर, तर दुसरे म्हणजे तो लेक्चरर. पुष्पवल्ली प्रेमात अक्षरशः बुडाली होती. तिने मागचा पुढचा विचार न करता त्या मुलाची निवड केली. त्या मुलाचे अर्थात त्या लेक्चररचे नाव होते रामस्वामी गणेशन.

आणि रामस्वामी ‘जेमिनी’ झाला!

गणेशन यालाही जेमिनी स्टुडीओला ‘रामराम’ म्हणावा लागला होता. मात्र, बाहेर पडताना त्याने थेट स्टुडीओच्या नावालाच धारण केले. रामस्वामी गणेशन तमिळ चित्रपटसृष्टीत ‘जेमिनी गणेशन’ या नावाने प्रसिद्ध झाले. त्याकाळी सगळ्यात रोमँटिक अभिनेता म्हणून जेमिनी गणेशनचे नाव होते. चित्रपटांच्या पडद्यावरच नव्हेतर खऱ्या आयुष्यात देखील जेमिनी प्रेमवीर बनला होता. त्याच्या एका हास्यावर लाखो तरुणी घायाळ व्हायच्या. जेमिनीचे सुंदर, मोठेमोठे डोळे चाहत्यांचे मने जिंकत होती.

पुष्पवल्लीशी लग्नाची चर्चा

‘जेमिनी’मधून बाहेर पडले असले तरी, जेमिनी आणि पुष्पवल्ली एकत्र काम करत होते. त्या दोघांची जोडी सर्वत्र गाजत होती. त्याचवेळी दोघांमध्ये प्रेमदेखील फुलत होते. मात्र, जेमिनीचे लग्न आधीच झाले होते. तरीही, त्यांनी देवळात जाऊन पुष्पवल्लीशी लग्न केल्याचे वृत्त सर्वत्र पसरले होते. मात्र, याचा कुठलाही पुरावा नव्हता. पुष्पवल्लीला पतीची साथ आणि त्याचे नाव हवे होते. मात्र, जेमिनीनेही या गोष्टीला नकार दिला. पुन्हा एकदा पुष्पवल्लीच्या पदरी निराशा पडली होती. या सगळ्यासाठीच तर ती ‘जेमिनी’ सोडून या जेमिनीकडे आली होती. परंतु जेमिनीनेही या गोष्टी नाकारल्या होत्या. तरीही केवळ प्रेमापोटी पुष्पवल्ली जेमिनीसोबत नांदत होती. त्या दोघांच्या प्रेम वेलीवर पहिले फुल उमलले. ते सुंदर फुल म्हणजे सौंदर्यवती रेखा… भानुरेखा गणेशन!

रेखाच्या जन्मापूर्वी जेमिनीच्या आयुष्यात आणखी एका अभिनेत्रीची एंट्री

रेखाच्या जन्मावेळी जेमिनी ‘मनम्पोल मंगलायम’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री होती ‘सावित्री’. जेमिनी आणि सावित्रीची जोडी चित्रपटांमध्ये आणि खऱ्या आयुष्यातही हिट ठरत होती. एकीकडे जेमिनी पुन्हा चर्चेत येत होता, तर दुसरीकडे पुष्पवल्ली आणि तिच्या मुलांपासून जेमिनी अंतर राखायला लागला होता. एक दिवस अचानक सावित्री आणि जेमिनीच्या लग्नाची बातमी येऊन धडकली. यानंतर सावित्रीने थेट गणेशन आडनाव लावायला सुरुवात केली. ज्या गोष्टीसाठी पुष्पवल्ली इतकी वर्ष वाट बघत होती, ती गोष्ट तिच्या ऐवजी सावित्रीला मिळाली होती.

एकपत्नी असल्याचा जेमिनीचा दावा

डॉक्टर बनण्याचे स्वप्न बाळगणारा जेमिनी त्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची त्याची तयारी होती. एप्रिल 1940मध्ये ते टी. आर. अलामेलु यांच्या भेटीसाठी गेले होते. आलमेलु यांच्या वडिलांनी त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्याबदल्यात त्यांनी जेमिनीला वैद्यकीय पदावर नेमणूक करण्याची लाच देऊ केली होती. या गोष्टीसाठी मंजुरी दर्शवत त्याने अलामेलुशी विवाह केला. परंतु, लग्नाच्या पहिल्या महिन्यातच अलामेलुच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे जेमिनीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न तुटले. परिणामी रस्त्यांवर आलेल्या जेमिनीला उदरनिर्वाहासाठी नोकरी शोधण्याची गरज भासू लागली. त्याचवेळी त्याला भारतीय वायू दलात नोकरी मिळाली. अलामेलुचा नकार असतानादेखील जेमिनी दिल्लीला रवाना झाला. दिल्लीत त्याने काका नारायणस्वामीची भेट घेतली. काकांनीच त्याला शिक्षक होण्याचा सल्ला दिला होता. तिथूनच पुढे त्याच्या नावासोबत ‘जेमिनी’ जोडले गेले आणि पुष्पवल्ली आणि सावित्री त्यांच्या आयुष्यात आल्या.

जेमिनीची प्रेमप्रकरणे गाजत होती. सावित्रीसह त्याचं नातं पुढच्या वळणावर पोहोचलं होतं. मात्र, अशातच त्याने खुलासा केला की, त्याची केवळ एकच पत्नी आहे. जिच्याशी त्याने लग्न केले आहे. सावित्री आणि पुष्पावल्ली त्याच्या पत्नी असल्याच्या वृत्ताला त्याने फेटाळून लावले. दरम्यान सावित्रीने त्याच्या दोन मुलांना जन्म दिला होता.

‘जेमिनी’ तमिळ चित्रपटसृष्टीतले मोठे नाव

वैयक्तिक आयुष्यात कोलाहल मजला होता. परंतु, जेमिनी गणेशन यांनी तामिळ चित्रपटसृष्टीत स्वतःचे मजबूत स्थान तयार केले होते. ‘रोमान्स’सह ‘अॅक्शन’ अभिनेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. जेमिनी तमिळ आभिनेत्याच्या 3 महत्त्वाच्या अभिनेत्यांपैकी एक होता. एमजी रामचंद्रन आणि शिवाजी गणेशन हे या तिकडीतले दोन अभिनेते होते. शिवाजी गणेशन हे नाटक सदृश चित्रपटांनमध्ये अग्रगणी होता. एमजी रामचंद्र ‘मारधाड’ असलेल्या चित्रपटात गाजत होते. तर, जेमिनी गणेशन ‘रोमान्स’ किंग म्हणून गाजत होते. हृदय तुटलेल्या प्रेमी व्यक्तीचा अभिनय करण्यात ते पटाईत होते.

‘कादल मन्नान’ म्हणून प्रसिद्ध!

प्रेक्षकांमध्ये ते ‘कादल मन्नान’ अर्थात ‘रोमान्सचा बादशाह’ म्हणूनच प्रसिद्ध होते. 1950 ते 1970 या दोन दशकांत जेमिनी सलग सुपरहिट चित्रपट देऊन, यशाच्या शिखरावर पोहोचले होते. 1971मध्ये भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्यांच्या या क्षेत्रातील योगदानाचा सन्मान करण्यात आला होता. मोठ्या पडद्यावर ए.एम.राजा, पी. बी. श्रीनिवासन यांच्यासारखे प्रतिभावान गायक त्यांचा आवज बनले. पुढे पी. बी. श्रीनिवासन यांची अनेक गाणी जेमिनी गणेशन यांनी आपल्या अभिनयाने समृद्ध केली. पार्श्व गायिका एस. जानकी यांच्या साथीने श्रीनिवासन यांनी अनेक अजरामर युगुल गीते तयार केली. ही गाणी आजही तमिळ भाषिकांमध्ये लोकप्रिय आहेत. पी. बी. श्रीनिवासन यांचा सुमधुर आवाज आणि जेमिनी गणेशनवर चित्रित झालेले ‘कलंगलिल अवल वसंथम’ हे गीत आजही रसिकांना जेमिनी गणेशन यांची आठवण करून देते.

चित्रपट कारकिर्दीत त्यांनी अनेक मोठ्या नायिकांसोबत काम केले. विशेषतः पुष्पवल्ली, सावित्री, अंजलीदेवी, भानुमती, पद्मिनी, सरोजा देवी, वैजयंती माला, सावकार जानकी, के. आर. विजया, देविका आणि जयललिता यांच्यासोबत त्यांची जोडी विशेष गाजली.

हेही वाचा :

Chhorii | शूटिंगच्या आधीपासूनच प्रेग्नंट बॉडी सूट घालण्यास सुरुवात, नुसरत भरुचाने ‘छोरी’ चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी अशी केली तयारी!

नाव न घेता अतुल कुलकर्णींची विक्रम गोखलेंवर टीका, अवघ्या एका ओळीचं ‘ते’ ट्वीट तुफान चर्चेत!

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.