Riteish-Genelia | ‘कपल गोल्स’, दुखापतग्रस्त पत्नीची सेवा करतोय रितेश देशमुख, पाहा त्यांचा क्युट Video

बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसुझाने (Genelia Dsouza ) एक क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये रितेश देशमुख (Riteish Deshmukh) तिचे केस बांधताना दिसत आहे.

Riteish-Genelia | ‘कपल गोल्स’, दुखापतग्रस्त पत्नीची सेवा करतोय रितेश देशमुख, पाहा त्यांचा क्युट Video
जेनेलिया आणि रितेश देशमुख
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 7:39 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसुझाने (Genelia Dsouza ) एक क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये रितेश देशमुख (Riteish Deshmukh) तिचे केस बांधताना दिसत आहे. खरं तर, सध्या जेनेलियाच्या हाताला दुखापत झाली आहे आणि तिचा नवरा या नात्याने रितेश शक्य ती सगळी मदत करत आहे (Genelia Dsouza share cute vide on instagram giving couple goals).

जेनेलियाने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जेनेलिया खुर्चीवर बसून मजा करत आहे आणि तिच्या हाताला ‘आर्म सपोर्ट’ लावलेला दिसत आहे. व्हिडीओमध्ये जेनेलिया मजेशीर एक्स्प्रेशन देत ​​आहे. रितेश देशमुख तिच्या पाठीमागे उभा राहून, पत्नी जेनेलियाचे केस बांधताना दिसत आहे.

पाहा जेनिलिया-रितेशचा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

व्हिडीओ शेअर करताना जेनेलियाने लिहिले की, ‘मला माझ्या वाईट काळातही माझ्यावर प्रेम करणारी एखादी व्यक्ती हवी आहे.’ हे लिहिताना जेनेलियाने रितेश देशमुख याला देखील टॅग केले आहे. चाहत्यांनाया दोघांचा हा व्हिडीओ खूप आवडला असून, रितेशचा हा ‘बायकोची काळजी’ असणारा स्वभाव त्यांच्या चाहत्यांना आवडत आहे. रितेशच्या या काळजीवाहू आणि प्रेमळ स्वभावामुळे त्याचे चाहते आणखीनच खुश झाले आहेत (Genelia Dsouza share cute vide on instagram giving couple goals).

कशी झाली जेनेलियाच्या हाताला दुखापत?

वास्तविक, जेनेलियाला आपल्या मुलांना प्रेरणा देण्यासाठी स्वत: स्केटिंग करायची होती आणि असे करत असताना ती पडली आणि तिच्या हाताला आणि कोपरात थोडीशी दुखापत झाली.

यासंदर्भात माहिती देत व्हिडीओ शेअर करताना जेनेलियाने लिहिले की, ‘काही आठवड्यांपूर्वी मी स्केटिंग शिकण्याचे ठरवले कारण मला वाटले की, मी माझ्या मुलांसाठी प्रेरणा बनू शकेन आणि त्यांचे समर्थन करू शकेन. मला वाटलं की, जेव्हा मी शिकेन, तेव्हा मी इन्स्टाग्रामवर एक मस्त व्हिडीओ शेअर करेन. परंतु, मला असे वाटले की, मी हाच व्हिडीओ शेअर केला पाहिजे, कारण प्रत्येकजण त्यांच्या यशाची कहाणी इन्स्टाग्रामवर शेअर करतो, परंतु जेव्हा आपण अयशस्वी होतो तेव्हा काय करावे? अनेक वेळा मोठी झेप घेण्यापूर्वी आपल्याला खाली पडावे लागते. माझे अपयश असूनही माझ्या हृदयाने अद्याप हार मानलेली नाही. मी यशस्वी होईपर्यंत प्रयत्न करणार आणि हा प्रयत्न करणे महत्वाचे आहे.’

बॉलिवूडमध्येही या जोडीचं एकत्र पदार्पण

रितेश आणि जेनेलिया यांनी 2003 मध्ये टतुझे मेरी कसमट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. दोघांचा हा पहिलाच सिनेमा होता. मोठ्या पडद्यावर एकत्र झळकलेली जोडी चाहत्यांना भावली. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा यांची भेट झाली होती. आणि काहीच दिवसात ते दोघे खूप चांगले मित्र बनले आणि मग दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. 3 फेब्रुवारी 2012 रोजी दोघांचे लग्न झाले. नोव्हेंबर 2014 रोजी, जेनेलियाने त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव त्यांनी दोघांनी ‘रायन’ ठेवले. या दोघांच्या दुसर्‍या मुलाचा जन्म जून 2016मध्ये झाला आणि त्याचे नाव रहाल असे ठेवले आहे.

(Genelia Dsouza share cute vide on instagram giving couple goals)

हेही वाचा :

Picasso : वडील आणि मुलाच्‍या नात्याची कथा सोबतच कोकणातल्या लोकजीवनाची झलक, ‘पिकासो’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

1232 KMS Trailer Out | लॉकडाऊनच्या काळातील स्थलांतरित मजुरांचा संघर्ष दाखवणारी डॉक्यूमेंट्री, पाहा तिची छोटी झलक…

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.