“माझ्या कुंडलीत 2 लग्न, सुनीताने यासाठी तयार रहावं…” दुसऱ्या लग्नाबद्दल गोविंदाने स्वत:च सांगितलं होतं
गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे. गोविंदा 30 वर्षांच्या मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या बातम्या आहेत. यातच आता गोविंदाची जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आली आहे, ज्यात गोविंदाने आपल्या दोन लग्नांविषयी दावा केला होता. त्याच्या कुंडलीत दोन लग्नाचे योग आहे. आणि तो दुसरं लग्न करू शकतो याची हिंट त्याने त्याच मुलाखतीत दिली होती.

बॉलिवूडमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांनंतर आता अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. ही जोडी लवकरच घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. एवढंच नाही तर या चर्चांदरम्यान दोन महत्त्वाच्या गोष्टाही समोर आल्या ते म्हणजे गोविंदा कोणत्यातरी 30 वर्षांच्या मराठी अभिनेत्रीला डेट करतोय, आणि दुसरी म्हणजे त्यांतील हे वाद गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु असून सुनीताने 6 महिन्यांपूर्वीच गोविंदाला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. या गोष्टीचा खुलासा स्वत: गोविंदाच्या वकिलाने केला होता. तसेच ते दोघेही गेल्या कित्येक वर्षांपासून वेगळे राहात असल्याचं सुनीतानेही सांगितले होते.
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान गोविंदाची जुनी मुलाखत चर्चेत
गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान गोविंदाची एक जुनी मुलाखतही आता फार चर्चेत आली आहे. त्या मुलाखतीमध्ये गोविंदाने दोन लग्नांबाबत दावा केला होता. तसेच सुनीता आहुजासोबतच नीलमबाबतही आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या होत्या.
गोविंदाने त्या मुलाखतीत सांगितले होते की, “सुनितासोबतच्या नात्यामध्ये मी गंभीरपणे गुंतू इच्छित नव्हतो. तर मला मौजमजा करण्यासाठी फिरण्यासाठी एका मुलीची सोबत हवी होती. हे अशासाठी की, मी चित्रपटांमध्ये रोमँटिक सीन करताना कम्फर्टेबल होऊ शकत नव्हतो. तेव्हा भाऊ कीर्ती याने मला रियल लाईफमध्ये रोमान्स केलास तर रील लाईफमध्येही व्यवस्थितपणे रोमान्स करता येईल, असं सांगितले. तेव्हा सुनिता हिच्यासोबत माझ्या भेटीगाठी वाढू लागल्या.” असं त्याने सांगितलं.तसेच याच मुलाखतीमध्ये गोविंदाने सांगितले होते की, “सुनितासोबत अफेअर सुरू असतानाच माझी आणि नीलमची भेट झाली होती. मी जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तिला पाहतच राहिलो.” असं म्हणत त्याने नीलमबद्दलचं त्याचं प्रेमही बोलून दाखवलं होतं.
नीलमबद्दलचं प्रेम व्यक्त केलं होतं
त्यानंतर गोविंदाने पुढे सांगितले की, जेव्हा तो नीलमशी बोलताना लग्नाचा विषय काढायतो, तेव्हा ती हा विषय टाळायची. हे लग्न यशस्वी ठरणार नाही याची जाणीव नीलमला होती. दुसरीकडे गोविंदाने सुनितासोबत मंदिरात लग्न केलं होतं. मात्र ही बाब सार्वजनिक केली नव्हती. याबाबत त्याने नीलमलाही अंधारात ठेवले होते. गोविंदाने नीलमवरील आपलं प्रेम उघडपणे व्यक्त केलं होतं. तसेच आपण तिची नेहमी काळजी घेऊ असे तो सांगायचा.
याचमुळे गोविंदा आणि सुनीतामध्येही वाद वाढत चालले होते. एकदा तर हा त्यांचा वाद इतका टोकाला गेला होता की सुनीता नीलमबाबत काहीतरी बोलली. त्यामुळे गोविंदाला तिचा खूप राग आला आणि त्याने सुनितासोबतचं नातं तोडलं होतं. त्यानंतर काही दिवस त्यांच्यात काहीच संभाषण नव्हतं झालं. अखेर सुनीताने पुढाकार घेऊन गोविंदासोबत आपलं नातं वाचवण्याचा प्रयत्न केला.
:माझ्या कुंडलीत 2 लग्न, सुनीताने यासाठी तयार रहावं…”
दरम्यान याच मुलाखतीमध्ये गोविंदाने त्याच्या दोन लग्नांबाबतही उल्लेख केला होता. तो म्हणाला होता की, पुढे कदाचित मी दुसऱ्या कुठल्या तरी मुलीमध्ये गुंतून जाऊ शकतो. त्या मुलीसोबत लग्न करेन. सुनीताने या गोष्टीसाठी तयार राहिलं पाहिजे. तेव्हा ती फ्री राहू शकेल. मी नशिबावर खूप विश्वास ठेवतो. माझ्या कुंडलीमध्ये दुसऱ्या लग्नाचा योग आहे.”असंही गोविंदाने म्हटलं होतं. त्यामुळे कदाचित तेव्हाच गोविंदाने त्याच्या दुसऱ्या लग्नाची नकळतच हिंट दिली होती असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आता हे कितपत खरं होतंय हे पुढे जाऊन समजेलंच